वसंत भोईर,वाडा
खानिवली येथे मोरीला भगदाड,
तालुक्यातील खानिवली-कंचाड मार्गावरील आनंद लक्ष्मण चंदावरकर हायस्कूल जवळ असलेल्या खानिवली येथील मोरीला दोन भगदाड पडले असून हा रहदारीचा मार्ग बंद पडण्याची भीती नागरिक व्यक्त करीत आहेत.आंबिस्ते,पालसई, गौरापूर,देवघर,बोरांडा, घोडमाळ,रावाचा पाडा, आसनस कलंभई,खरीवली, भोपिवली,देवळी,आपटी, तसेच आजूबाजूच्या २५ गाव पाड्यांतील ग्रामस्थांचा दररोज ये-जा करण्याचा एकमेव हा रस्ता आहे.हा मार्ग पुढे कंचाड वरून वाडा- मनोर महामार्गाला जोडला जातो. तेथून तो घोडमाळमार्गे दुर्वेश वरून अहमदाबाद महामार्गाला जोडतो.ही मोरी फार जुनी असुन या मोरीचा पाईप पूर्णपणे फुटला आहे. त्याला सध्या दोन मोठे भगदाडे पडली आहेत.त्यामुळे या रस्त्यावरील वाहतूक बंद पडण्याची भीती नागरिक व्यक्त करीत आहेत.
यासंदर्भात सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता संजय डोंगरे यांच्याशी संपर्क साधला असता तो होऊ शकला नाही.

