- Home
- Uncategorized
- आंदोलन
- कृषी
- गुन्हेगारी
- चालू घडामोडी
- जागतिकीकरण
- राजकारण
- शैक्षणिक
- संपादकीय
- क्रीडा
- निवडणूक
- मनोरंजन
- विदेश
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
- मान्सून राज्याच्या उंबरठ्यावर : खरीप हंगामाला सुगीचे दिवस येणार….
- ग्रामीण भागात रस्तेबांधणीच्या कामाला प्राधान्य देण्याची गरज,
- भारतीय संविधानाचे देशाच्या विकासामध्ये मोठे योगदान,
- मनरेगा कामातील बजबजपुरीमुळे आदिवासी स्थिरावतोय अन्य क्षेत्रात,
- प्रादेशिक अस्मितेत लक्षणीय वाढ ; राष्ट्रीय एकात्मकतेला हानिकारक….
- अमेरिकेची दादागिरी अखेर इराणने संपवली,
- ममता बॅनर्जीचा राजीनामा देण्यास नकार, कलम ३५६ चा वापर होण्याची शक्यता,
- कितीही प्रयत्न करा, पण आता परिस्थिती हाताबाहेर गेली आहे,
Author: दीपक मोहिते
दीपक मोहिते, निसर्गाची अवकृपा, पिडीत शेतकऱ्यांना आधाराची गरज,अन्यथा राज्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढणार… यंदा पावसाने प्रचंड धुमाकूळ घातला असून मराठवाडा,रायगड व पालघर जिल्ह्यातील शेती व बागायतीचे होत्याचे नव्हते झाले आहे.पावसाचा रुद्रावतार व शेतीची झालेली नासाडी,लक्षात घेऊन सरकारने तातडीने ओला दुष्काळ जाहीर करायला हवा,पण आपले सरकार हे सध्या बघ्याच्या भूमिकेत आहे.त्यामुळे ग्रामीण भागातील शेतकरी आता आत्महत्येच्या मार्गावर जाईल,अशी भिती व्यक्त करण्यात येत आहे.केंद्र व राज्य सरकारने राज्याच्या ग्रामीण भागात निरीक्षण पथके पाठवून तातडीने नुकसानीची पाहणी करावी व लवकरात लवकर पिडीत शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी,अशी मागणी करण्यात येत आहे. यंदा मे महिन्यात सुरू झालेला पाऊस अद्याप थांबायचे नाव घेत नाही,त्यामुळे बळीराजा पार धायकुतीला…
दीपक मोहिते, निवडणूक पर्व – प्रभाग क्र.२१, परप्रांतीय मतदारांवर भाजपची भिस्त… सदर प्रभाग हा वसई व नालासोपारा पूर्व भागात पसरला असून बाहेरून येथे स्थायिक होणाऱ्या नागरिकांची संख्या सर्वाधिक आहे.या प्रभागात खारटन जमिनीचे क्षेत्र प्रचंड असूनही १९८० च्या दशकात येथे मोठ्याप्रमाणात बांधकाम परवानग्या दिल्या गेल्या.त्यामुळे अल्पावधीत या प्रभागातील लोकसंख्या गगनावर पोहोचली.अनेक नागरी वसाहती सरसकट खारटन जमिनीवर उभ्या राहिल्या.या वसाहतीमध्ये राहायला आलेल्या नागरिकांना १९८० ते २०००,अशी दोन दशके नागरी सुविधाअभावी अनेक यातना सहन कराव्या लागल्या.२००० साली सुर्या पाणीप्रकल्पाच्या टप्पा – १ मधून पाणी मिळू लागल्यानंतर मात्र या नागरी संकुलातील रहिवाश्याना काही अंशी दिलासा मिळाला. त्यानंतरच्या काळातही सिडको प्राधिकरणाने बांधकाम परवानग्या देण्याचा सपाटा…
वसंत भोईर,वाडा अन्यायकारक करवाढ मागे घ्या,अन्यथा तीव्र आंदोलन, वाडा नगरपंचायतीने अलीकडेच निवासी व व्यापारी मालमत्तेच्या सुधारित कर आकारणीच्या नोटीसीचे वाटप सुरु केले आहे.अचानक झालेल्या करवाढीने येथील नागरिक हवालदिल झाले असुन नागरिक व व्यापारी यांच्यावर अतिरिक्त कराचा बोजा पडला आहे.वाढीव करवाढ शिथिल करा,अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा महाविकास आघाडीने नगरपंचायत प्रशासनाला दिला आहे. महाविकास आघाडीच्या शिष्टमंडळाने मुख्याधिकारी मनोज पष्टे यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले आहे.वाडा नगरपंचायत ही नव्याने स्थापन झालेली नगरपंचायत असून त्यावर मालमत्ता व दिवाबत्ती करासोबतच वृक्ष कर,शिक्षण कर,रोजगार हमी कर,अग्निशमन कर,उपयोग कर्ता,अशा अतिरिक्त करांचीही वाढ झाली आहे.या वाढीव करामुळे नागरिक व व्यापारी यांच्या करामध्ये अवाढव्य वाढ…
वसंत भोईर, वज्रेश्वरीचे मूळ स्थान भागीरथी माता ; निसर्गरम्य पण दुर्लक्षित वाडा तालुक्यातील गुंजकाठी येथे पांडवकालीन अधि प्राचीन भागीरथी मातेचे मंदिर आहे.निसर्गरम्य, डोंगराळ भागात वसलेले हे मंदिर सध्या दुर्लक्षित अवस्थेत आहे. तालुक्यातील गुंज काटी येथील मंदाकिनी पर्वतावर भगवान परशुराम व त्याची माता भागीरथी आज ही तपश्चर्या करीत आहेत.अशी भाविकांची समजूत आहे. पांडव अज्ञातवासात असताना ते येथे आले होते.त्यांनी देवतांसाठी मंदिर उभे करावे या हेतूने मंदिर बांधावयास घेतले.उंदीराची मूर्ती पूर्ण होण्याआधी कोंबडा आरवल्याने ( पहाट ) झाल्यामुळे त्यांनी बांधकाम थांबवले.अपूर्ण मंदिराचे अवशेष आजही गुंजकाटी येथे आढळतात.त्याचप्रमाणे येथे शिवमंदिराचे अवशेष, देवतांच्या पालना घराचे अवशेष आहेत.मंदिर पूर्ण न झाल्याने तेथील देवता आश्रयासाठी भागीरथी…
दीपक मोहिते, जागतिक पर्यटन दिन ; देशात पर्यटनाला चांगला वाव आहे, आज जगभरात जागतिक पर्यटन दिन उत्साहात साजरा होत आहे.पाच वर्षांपूर्वी कोरोनामुळे पर्यटन क्षेत्राची अक्षरशः वाताहत झाली होती.परकीय चलन मिळवून देणारा हा व्यवसाय,अद्याप सावरलेला नाही.या व्यवसायाला पुन्हा सुगीचे दिवस येण्यासाठी किमान ५ वर्षे लागणार आहेत.कोरोनाचा प्रभाव नाहीसा झाल्यामुळे पर्यटन विकासाला हळूहळू गती मिळू लागली व आज हा व्यवसाय बऱ्यापैकी स्थिरावला आहे.त्यामुळे पर्यटन व्यवसायिकांना आशेचा किरण दिसू लागला आहे. देशाच्या आर्थिक विकासामध्ये पर्यटनाचे फार मोठे योगदान आहे.आपले राज्य,पर्यटन क्षेत्रात अव्वल क्रमांकावर असून बऱ्यापैकी परकीय चलन मिळवून देणारे आहे.महाराष्ट्र हे राज्य पर्यटन स्थळांनी समृद्ध,असे राज्य आहे.इतर राज्यातही बऱ्यापैकी पर्यटनस्थळे आहेत.उदा.राजस्थान, तेलंगणा,केरळ,काश्मीर, हिमाचल…
दीपक मोहिते, निवडणूक पर्व, वसई विरार शहर महानगरपालिका निवडणुका ; वेळीच सावध व्हा,अन्यथा कपाळमोक्ष ठरला आहे… स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम कोणत्याही क्षणी जाहीर होऊ शकतो,त्यामुळे काही राजकीय पक्ष जुळवाजुळवीच्या कामाला लागले आहेत.जिल्ह्यात वसई-विरार शहर महानगरपालिका ही एकमेव महानगरपालिका आहे,जी राजकीय पक्षाची आर्थिक गरज भागवू शकते.त्यामुळे ही महानगरपालिका आपल्या ताब्यात यावी,यासाठी सर्वच राजकीय पक्ष आपले देव पाण्यात टाकून बसले आहेत.पाण्यात टाकलेले देव कोणाला पावतात,हे येत्या जाने.महिन्यात स्पष्ट होणार आहे. या महानगरपालिकेच्या ११५ जागांवर निवडणुका लढवण्यासाठी प्रत्येक उमेदवाराला किमान १ कोटी रु.चा निधी आवश्यक आहे.त्यासाठी प्रत्येक राजकीय पक्ष जमेल त्या मार्गाने गोळा करण्याच्या कामात गर्क आहे.अनधिकृत बांधकाम व्यवसायिक,ठेकेदार, विकासक,मनपाचे वरिष्ठ अधिकारी,उद्योजक…
दीपक मोहिते, ” हल्लाबोल,” मणिपूर /लेह/लडाख हिंसाचार ; केंद्र सरकारने आत्मपरीक्षण करायला हवे, दोन आठवड्यापूर्वी लेह/ लडाखमध्ये जो काही हिंसाचार झाला,त्यावरून केंद्र सरकारने बोध घ्यायला हवा.एरवी शांत असलेला चीनच्या सीमेवर असलेला व कायम महात्मा गांधींच्या अहिंसेचा पुरस्कार करणारा हा प्रदेश या थराला कसा काय गेला,याविषयी पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शहा या दोघांनी आत्मचिंतन करायला हवे.ते न करता सरकारने नेहमीप्रमाणे आंदोलनाचे नेते सोनम वांगचुक व भारतीय राष्ट्रीय काँग्रेस या दोघांमुळे हा हिंसाचार झाल्याचा आरोप करत सरकारने सोनम वांगचुक यांना आता अटक केली आहे.सोनम वांगचुक हे गांधीवादी नेते असून त्यांनी आपले प्रत्येक आंदोलन अहिंसेच्या मार्गाने चालवले.पण आज केंद्र सरकारने त्यांना…
दीपक मोहिते, वसईच्या विकासासाठी आ.स्नेहा दुबे पंडित यांचा जोरदार पाठपुरावा, वसई तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी आ.स्नेहा दुबे पंडित यांच्या पुढाकारातून महत्त्वपूर्ण रस्ते,उड्डाणपूल व रेल्वे ओव्हर ब्रिज संदर्भातील विकास कामांचा वेग वाढवण्यासाठी वसई विरार शहर महानगरपालिका मुख्यालयात एमएमआरडीएच्या अधिकाऱ्यांसोबत नुकतीच बैठक पार पडली. बैठकीत खालील रस्त्यांचे काँक्रिटीकरण करण्याचा निर्णय झाला : बाफाने फाटा–उमेळा फाटा,वसई फाटा–वसई गाव, सातिवली फाटा–रेंज ऑफिस,तिवरी फाटा – वामन ढाबा,तसेच,गोखिवारा रेंज ऑफिस,एव्हरशाई – वसंत नगरी व माणिकपूर नाका येथील उड्डाणपुलांचे डिझाईन व अलाइनमेंट निश्चित करण्याबाबत चर्चा झाली.ही तिन्ही कामे आठवड्याभरात प्रस्तावित होणार आहेत. याशिवाय,उमेळमान–नायगावसह चार महत्त्वाच्या रेल्वे ओव्हर ब्रिजच्या कामांचा समावेश शासनाकडे पाठवण्यात येणार आहे. या बैठकीमुळे वसईतील पायाभूत…
वाडा प्रतिनिधी, वाडा येथे शिंदीचा पाडा रस्त्याची दुरावस्था, तालुक्यातील खरीवली ग्रामपंचायत हद्दीत शिंदीचा पाडा या गावाकडे जाणारा मुख्य रस्ता अत्यंत खराब अवस्थेत असून,संपूर्ण रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत.सध्या सुरू असलेल्या नवरात्र उत्सवाच्या पार्श्वभूमीवर,भाविकांची मोठ्या प्रमाणावर या रस्त्यावरून ये-जा सुरू आहे. मात्र खराब रस्त्यामुळे हा प्रवास त्रासदायक ठरत आहे. सालाबादप्रमाणे यंदाही शिंदीचा पाडा येथे देवीचा नवरात्र उत्सव मोठ्या भक्तिभावाने साजरा करण्यात येत आहे.परिसरातील तसेच इतर गावांतील असंख्य भाविक येथे देवीच्या दर्शनासाठी येत आहेत.परंतु, रस्त्याची दुरवस्था ही त्यांच्यासाठी मनस्ताप ठरली आहे.वाहनचालकांना व पादचाऱ्यांना खड्ड्यांमधून प्रवास करावा लागत आहे. स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, ” गेल्या अनेक वर्षांपासून या रस्त्याची अवस्था अशीच आहे. पावसाळ्यात तर…
दीपक मोहिते, जिल्हा परिषद / पंचायत समिती,रणसंग्राम जव्हार तालुका, जव्हार तालुका ; सरकारचे तालुक्याच्या विकासासंदर्भात अक्षम्य दुर्लक्ष, ज्या तालुक्याच्या नावाने आता नवीन जिल्हा स्थापन होणार आहे,असा हा जव्हार तालुका निसर्गरम्य तालुका आहे.तालुका डोंगर माथ्यावर वसला असल्यामुळे येथील वातावरण हे महाबळेश्वरच्या तोडीचे आहे,त्यामुळे या परिसराला मिनी महाबळेश्वर म्हणून ओळखले जाते.मात्र गेल्या काही वर्षात या तालुक्यात नागरीकरणाला प्रचंड वेग आला व या तालुक्याचा चेहरा मोहरा पार बदलून गेला.या परिसराला पर्यटनाचा दर्जा देण्यात यावा,अशी मागणी स्थानिक ग्रामस्थांनी गेल्या अनेक वर्षांपासून लावून धरली आहे.पण त्याविषयी सरकार पातळीवर कोणतीही हालचाल होऊ शकली नाही.दरम्यान तालुक्यात बांधकामांना चांगलाच वेग आला.जव्हार नगरपरीषदेच्या माध्यमातून शहरी तर जिल्हा परिषद/ पंचायत…
