सचिन सावंत,वसई
वसई शिवसेनेचे ( उबाठा ) तहसीलदाराना निवेदन,
वसई तालुका शिवसेनेच्या ( उबाठा ) शिष्टमंडळाने काल वसईचे तहसीलदार अविनाश कोष्टी यांची भेट घेऊन त्यांना विविध मागण्याचे निवेदन देण्यात आले.तहसीलदाराना भेटण्यास गेलेल्या या शिष्टमंडळाचे नेतृत्व जिल्हाप्रमुख प्रवीण म्हाप्रळकर यांनी केले.
तहसीलदाराना देण्यात आलेल्या मागण्याच्या निवेदनात राज्यातील दुष्काळ, शेतकऱ्यांच्या कर्जमाफी प्रकरणी शासनाकडून सतत होणारी चालढकल,अवकाळी पाऊस,गारपीटी,हमीभाव,शेतकऱ्यांच्या आत्महत्याच्या घटनामध्ये झालेली वाढ,नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत,शेतकऱ्यांची सरसकट कर्जमुक्ती करणे व पीक विमा योजनेच्या जाचक अटी शिथिल करणे,इ.मागण्यांचा समावेश आहे.शिष्टमंडळात जिल्हा संघटक किरण चेंदवणकर,तालुकाप्रमुख काकासाहेब मोटे व पक्षाच्या विविध पदाधिकाऱ्यांचा समावेश होता.

