दीपक मोहिते,
नागपूर येथे ” मराठाभुषण,” पुरस्कार सोहळा थाटात संपन्न,
अखिल भारतीय मराठा महासंघाला यंदा १२५ वर्षे पूर्ण झाली.त्यानिमित्ताने नागपूर येथे गुरुदेव सेवा मंडळ,नागपूर येथे नुकतेच मराठाभूषण पुरस्कार सोहोळ्याचे आयोजन करण्यात आले होते.या पुरस्कार वितरण सोहोळ्यात समाज व अन्य क्षेत्रात महत्वाची कामगिरी करणाऱ्या कर्तव्यनिष्ठ व्यक्तींचा ” मराठाभूषण,” पुरस्कार देऊन यथोचित सत्कार करण्यात आला.
या पुरस्कार वितरण सोहळ्यास राष्ट्रीय अध्यक्ष दिलीप जगताप,राष्ट्रीय सरचिटणीस संभाजीराजे दहातोंडे,राष्ट्रीय उपाध्यक्ष संतोष नानवटे,राष्ट्रीय संपर्क प्रमुख दिलीप धंद्रे,राष्ट्रीय समन्वयक राजेश निंबाळकर, प्रदेश महिला अध्यक्षा वंदना रोटकर,प्रदेश युवा सचिव गौरव होणे,राम मुळ्ये, अकोला,पालघर,कोल्हापूर,व महाराष्ट्रातील इ.मान्यवर व मोठ्या संख्येने पदाधिकारी उपस्थित होते. सामाजिक,उद्योजक,क्रीडा,
साहित्य क्षेत्रात बहुमोल कामगिरी केलेल्या तेरा व्यक्तींची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली. त्यामध्ये रामनारायण,पानिपत, हरियाणा,अविनाश खळतकर,नागपूर,सचिन नाईक,नागपूर,प्रकाश खडांगळे,नागपूर,यश मोहिते, अविनाश घांगरेकर,पृथ्वीराज धवड,नागपूर,कविता भोसले,नागपूर,मीना इंगळे, वर्धा,शैलजाताई साळुंके,वर्धा, वंदना रोटकर,नागपूर,१३ तृषाली चौधरी,यांचा मराठा भूषण पुरस्कार सत्कार करण्यात आला.
सदर कार्यक्रमाचे आयोजन अखिल भारतीय मराठा महासंघ,नागपूर शहर यांनी केले.या पुरस्कार सोहोळ्यास राज्यभरातील मराठ्यांची लक्षणीय उपस्थिती होती. पुरस्कार विजेत्यांवर राज्यभरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे.

