Author: दीपक मोहिते

दीपक मोहीते, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने महाराष्ट्राला दिलासा ; राज्यातील निवडणुकांचा मार्ग मोकळा… राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थाच्या आरक्षणा संदर्भात झालेल्या सुनावणीत सर्वोच्च न्यायालयाने हे प्रकरण तीन न्यायाधीशांकडे सुनावणीसाठी पाठवण्याचा निर्णय घेतला आहे.पुढील सुनावणी २१ जाने.रोजी ठेवण्यात आली आहे.तसेच स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांना स्थगिती देण्यात आली नाही.त्यामुळे महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. राज्यातील २८८ नगरपरिषदा,नगरपंचायतींच्या निवडणुका होत आहेत.५० टक्क्यांची आरक्षण मर्यादा ओलांडलेल्या निवडणुका आदेशाधीन राहणार,असं सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे.राज्यातील ४० नगरपरिषदा आणि १७ नगरपंचायतींमध्ये ५० टक्के आरक्षणाची मर्यादा ओलांडली गेल्याची कबुली राज्य निवडणूक आयोगाने सर्वोच्च न्यायालयात दिली होती.त्यानंतर आज सर्वोच्च न्यायालयात महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांशी संबंधित…

Read More

दिपक मोहिते, ” हल्लाबोल,” स्था.स्व.सं.च्या निवडणुकांमध्ये ” ठाकरे ब्रँड,” टिकणार का ? स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणूकीत ” ठाकरे ब्रँड,” टिकणार की नाही,हे ठरणार आहे.त्यामुळे उद्धव व राज ठाकरे,या दोघांचे या निवडणुकीत सर्वस्व पणाला लागणार आहे.ज्या बाळासाहेब ठाकरे या ब्रँडमुळे राष्ट्रीकृत बँका, रेल्वे व सरकारी आस्थापनामध्ये मराठी माणूस पाहायला मिळतो,तो भविष्यात दिसेल का ? असा प्रश्न साहजिकच मराठी माणसाच्या मनात आता उभा राहू लागला आहे. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात मराठी माणसाने जे स्वप्न उराशी बाळगले होते,ते तत्कालीन नेत्यानी आपले अथक प्रयत्न तसेच १०५ हुताम्यांच्या बलिदानाने मिळवून दिले. बाळासाहेबांचे वडील प्रबोधनकार ठाकरे,प्र.के.अत्रे,थोर समाजवादी नेते एसेम व अन्य नेत्यानी त्यावेळी झालेल्या संघर्षात आपल्या…

Read More

दिपक मोहिते, ” हल्लाबोल,” ऐन निवडणुकीच्या तोंडावर भाजपने विरोधकांना घेरण्यास सुरुवात केली.. महंगारपालिकेचे बिगुल अद्याप वाजले नसताना भाजपने आपल्या विरोधकांच्या बदनामीचा भोंगा वाजवण्यास सुरुवात केली आहे.बहुजन विकास आघाडीच्या एका नेत्यांचे जुने जमीन हडप प्रकरण उजागर करून भाजपने आपल्या प्रमुख विरोधकाला अडचणीत आणले आहे.या पहिल्या दणक्यानंतर आणखी काही नेते त्यांच्या रडारवर आहेत.कोट्यवधी रु.ची सरकारी जमीन या माणसाने कशी हडप केली व त्यावर कारवाई कशी होत नव्हती,हे परवा रात्री चार जणावर गुन्हा दाखल झाल्यानंतर वसईकर जनतेला कळले. या जमीन हडप प्रकरणी वसई विरार शहर महानगरपालिकेचे दोन माजी आयुक्त,नगर रचनाकार व अन्य एक जण,अशा चार जणांवर गुन्हे दाखल झाले आहेत.गेल्या तीन ते चार…

Read More

दीपक मोहिते, ” हल्लाबोल,” पालघर जिल्ह्यात महायुतीच्या घटक पक्षाच्या वेगवेगळ्या चुली, गेल्या विधानसभा निवडणुकीत मिळालेले प्रथितयश व एकूण २८८ जागांपैकी १२० जागांवर भाजपला चांगले मताधिक्य मिळाले.ते लक्षात घेऊन भाजपने अवघ्या काही दिवसात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढण्याचे संकेत देण्यास सुरुवात केली होती.त्यानुसार त्यांनी आता पावले टाकण्यास सुरुवात केली आहे.मुंबई,ठाणे,भिवंडी, नवी मुंबई,उल्हासनगर व कल्याण – डोंबिवली व वसई – विरार शहर,या महत्वाच्या महानगरपालिकासह नगरपरिषदा व नगरपंचायतीच्या निवडणुका स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला आहे.राज्याच्या ग्रामीण भागात भाजपची ताकद काहीशी कमी असून शहरी भागात मात्र भाजपने गेल्या काही वर्षात चांगलेच पाय रोवले आहेत.शहरी भागातील मतदार,प्रत्येक निवडणुकीत आपल्या पाठीशी खंबीरपणे उभा राहतो,असा अनुभव असल्यामुळे…

Read More

दीपक मोहिते, प्रगल्भ लोकशाही भारतीय संविधान ; पाच दशकानंतर पुन्हा ढग जमू लागले आहेत… संविधान दिन किंवा राष्ट्रीय विधी दिन हा २६ नोव्हें.रोजी भारतभर साजरा करण्यात येत असतो.२९ ऑगस्ट १९४७ रोजी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली भारतीय संविधानाच्या निर्मितीसाठी मसूदा समिती स्थापन झाली.अनेक बैठका व चर्चासत्रानंतर या समितीने सादर केलेला अंतिम मसुदा २६ नोव्हें.१९४९ रोजी संविधान सभेने स्विकारला.त्यामुळे २६ नोव्हें. हा दिवस संविधान दिन म्हणून साजरा केला जातो.परंतु आता पाच दशकानंतर पुन्हा काळे ढग जमु लागले आहेत.त्यामुळे भारतीय जनतेने सजग राहण्याची गरज आहे. भारतीय संविधान आणि घटनाकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या सन्मानार्थ हा ” भारतीय संविधान दिन,” साजरा केला जातो.भारत सरकारने आंबेडकरांचे…

Read More

दीपक मोहिते, निवडणूक रणसंग्राम, मतदार नोंदणी प्रभावीपणे व्हायला हवी, २ डिसें.रोजी होऊ घातलेल्या पालघर,डहाणू व जव्हार,या तीन नगरपरिषदा व वाडा नगरपंचायतीच्या निवडणुकीत १ लाख १६ हजार ६६० मतदार आपला हक्क बजावणार आहेत.या चारही शहराची लोकसंख्या लक्षात घेता मतदारांची संख्या इतकी कमी का ? असा प्रश्न साहजिकच मनात उभा राहतो.दरवर्षी राज्य निवडणूक आयोग,राज्यात मतदार नोंदणीचा कार्यक्रम सतत राबवत असतो.” मतदान हे पवित्र काम असून ते पार पाडले पाहिजे,” असे आवाहन त्यांच्याकडून करण्यात येत असते.पण,आयोग या महत्वाच्या आवाहनाचे स्वतः पालन करत नसल्याचे स्पष्ट झाले आहे. गेल्या काही वर्षात रेल्वेला लागून असलेल्या वसई,पालघर व डहाणू तालुक्यात नागरीकरणाला प्रचंड वेग आला व या तिन्ही…

Read More

दीपक मोहिते, आम्ही वसईकर खरंच दुर्देवी, तिघांची तोंडे तीन दिशेने ; विकासकामाना अद्याप वेग नाही… स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुका नजीक आल्या असून सारे राजकीय पक्ष आता कामाला लागले आहेत.नगरपरिषदा व नगरपंचायतीच्या निवडणुका आटोपल्या की दुसऱ्या टप्प्यात जिल्हा परिषदा व पंचायत समित्याच्या निवडणुका होतील.त्यानंतर महानगरपालिकेच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होतील. महानगरपालिकेच्या निवडणुका साधारणपणे फेब्रु.महिन्यात होतील,असा अंदाज आहे. या सर्व पार्श्वभूमीवर गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात झालेल्या निवडणुकामध्ये नव्याने निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींकडून वर्षभरात लोकहिताची किती कामे झाली ? प्रलंबित विकासकामाना चालना मिळाली का ? व लोकांच्या अपेक्षा १०० % नाही तर वर्षभरात किमान १० ते १५ % कामे झाली का याविषयचा लेखाजोगा लोकांसमोर…

Read More

दीपक मोहिते, निवडणूक रणसंग्राम, पालघर नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत चुरशीची लढत, नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत सेनेचे ( उबाठा ) उत्तम पिंपळे,भाजपचे कैलाश म्हात्रे व शिवसेनेचे ( शिंदे गट ) उत्तम घरत हे तिघेजण आपले नशीब अजमावत आहे. वास्तविक हे तिघेही पूर्वाश्रमीचे शिवसैनिक आहेत. या तिघांपैकी उत्तम घरत यांनी चारवेळा उपगराध्यक्ष तर उत्तम पिंपळे यांनी नगराध्यक्षपद भूषवले आहे.या निवडणुकीत हे तिघेही एकमेकांसमोर दंड थोपटून उभे आहेत. त्यामुळे पालघर शहरातील राजकीय समीकरणे आगामी काळात बदलण्याची दाट शक्यता आहे.पालघरच्या शहरी भागात शिवसेनेला वाखणण्याजोगा जनाधार होता.पण पक्षफुटीनंतर या जनाधारचे विभाजन झाले.त्याचा फायदा या निवडणुकीत भाजपला होण्याची शक्यता आहे.भाजपने,शिवसेनेच्या कैलाश म्हात्रे यांना रिंगणात उतरवून आपण या निवडणुका स्वबळावर लढवण्याचे…

Read More

दीपक मोहिते, दीपक मोहिते, पालकमंत्र्यांचे जनता दरबार व जिल्ह्याचे दौरे ; काहीही निष्पन्न होणार नाही… पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री गणेश नाईक,हे गेले वर्षभर जिल्ह्याचे धावते दौरे करत आहेत.त्यांचे हे दौरे,केवळ एकप्रकारचे इव्हेंटच ठरले आहेत.दौऱ्यामागचे उद्देश तडीला जातात का ? याविषयी पालघरवासियांच्या मनात संभ्रमावस्था आहे.पण हे दौरे फार महत्वाचे आहेत,असे त्यांना वाटत असले तरी या दौऱ्याचे फलित काय ? असा जर कोणी प्रश्न विचारला तर त्या प्रश्नाचे उत्तर केवळ ” माहीत नाही,” असेच मिळते. प्रशासन त्यांच्या दौऱ्यावर वारेमाप खर्च करत असते,हा पैसा खरोखरच कारणी लागतो का ? मध्यंतरी पालघर येथे झालेल्या जनता दरबाराला लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला होता.आपल्या समस्यांची सोडवणूक होईल,अशी भाबडी…

Read More

दीपक मोहिते, ” हल्लाबोल,” भूमिपूजनाचा सुळसुळाट व पाहणी दौऱ्याचा सुकाळ,प्रत्यक्षात सर्वत्र शुकशुकाट, गेल्या वर्षभरात वसईकर नागरिक,हे भूमिपूजनाचा सुळसुळाट व पाहणी दौऱ्याचा सुकाळ पाहून अक्षरशः कंटाळून गेले आहेत.दर दोन दिवसाने अमुक तमुक विकासकामांना देवाभाऊंनी कोट्यवधी रु.दिल्याच्या रील्स पाहून डोके अक्षरशः भणाणून गेले आहे.त्यामुळे सध्या वसईकर नागरिकांची स्थिती ” सहनही होत नाही आणि सांगताही येत नाही,” अशी झाली आहे. गेल्या वर्षाभरात वसई तालुक्यातील प्रलंबित विकासकामापैकी एकही विकासकाम मार्गी लागू शकले नाही,असे यापूर्वी कधीच घडले नव्हते.केवळ रील्स बनवून प्रसिद्धी माध्यमावर पोस्ट करणे,हे सर्वसामान्य नागरिकांची फसवणूक करण्यासारखे आहे.आज तालुक्यातील हैराण झाली आहेत,कारण त्यांची लहानसहान कामेही वेळेवर होत नाहीत.लोकप्रतिधीनीचे साधे पत्र मिळण्यासाठी जर नागरिकांना पंधरा…

Read More