- Home
- Uncategorized
- आंदोलन
- कृषी
- गुन्हेगारी
- चालू घडामोडी
- जागतिकीकरण
- राजकारण
- शैक्षणिक
- संपादकीय
- क्रीडा
- निवडणूक
- मनोरंजन
- विदेश
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
- १९८० चा अटलबिहारी यांचा भाजप आता पाहायला मिळणार नाही…
- ” अल निनो,” हे नैसर्गिक संकट असून कृषी क्षेत्राला मारक आहे…
- केंद्र सरकारच्या नाकर्तेपणामुळे शिक्षण क्षेत्राची वाताहत,
- इराणने अमेरिकेचा नक्षा चांगलाच उतरवला,
- महिलांना डावलणे ; देवाभाऊंचे, ” गरज सरो आणि वैद्य मरो, ” धोरण,
- कॉक्रोच जनता पार्टीला सरकार व गोदी मिडिया, अशा दोन आघाड्यावर लढावे लागणार आहे,
- डोनाल्ड ट्रम्प ; … तर असा मित्र नसलेलाच बरा,
- पूर्वी कार्यकर्त्यांची ओळख ” पायपुसणी, ” अशी होती, आता ” अंधभक्त,” अशी झाली आहे…
Author: दीपक मोहिते
दीपक मोहिते, वसई तालुक्याच्या स्वयं पुनर्विकासाला सुरुवात, लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद, स्वयंपुनर्विकास हे जनआंदोलन म्हणून पुढे आले आहे.ठाणे,पनवेल,घणसोली येथे या योजनेची शिबीरे, सभा,बैठका झाल्या. शिवधनुष्य पेलवणे फार अवघड असते,पण स्वयंपुनर्विकासाचे हे शिवधनुष्य आम्ही उचलले आहे आणि ते पेलवणार आहोत,असा विश्वास भाजपचे गटनेते व मुंबई जिल्हा बँकेचे अध्यक्ष आ. प्रवीण दरेकर यांनी वसई येथे झालेल्या शिबिरात व्यक्त केला. वसई येथे भाजपा आमदार स्नेहा दुबे पंडित यांच्या पुढाकाराने स्वयंपुनर्विकास मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.याप्रसंगी नालासोपाऱ्याचे आ.राजन नाईक,वसई विरार शहर महानगरपालिका नगर रचना विभाग प्रभाग उपसंचालक शेखर दिघावकर,प्रांत अधिकारी शेखर घाडगे, सहकारी संस्था पालघर जिल्हा उपनिबंधक शिरीष कुलकर्णी, सहकारी संस्था उपनिबंधक वसई अमर…
दीपक मोहिते, महाविकास आघाडीसमवेत बविआने युती केल्यास फटका बसण्याची शक्यता… वसई विरार शहर महानगरपालिकेच्या आगामी निवडणुका बहुजन विकास आघाडी व महाविकास आघाडी एकत्रितपणे लढतील,असे संकेत मिळत आहेत.गेल्या काही दिवसापासून भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे विजय पाटील व माजी आ.हितेंद्र ठाकूर यांची जवळीक वाढत चालल्यामुळे आगामी निवडणुका आ.ठाकूर महाविकास आघाडीच्या माध्यमातून लढवतील,अशा चर्चाना उधाण आले आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचे विजय पाटील यांना वसई मधून लक्षणीय मते मिळाली होती.तर महायुतीच्या उमेदवार स्नेहा दुबे पंडित यांना केवळ अडीच ते तीन हजार मताचे मताधिक्य मिळाले होते.विजय पाटील व हितेंद्र ठाकूर यांना मिळालेल्या मतांची बेरीज ही स्नेहा दुबे यांना मिळालेल्या एकूण मतापेक्षा कैक पटीने अधिक होती.ती…
वसंत भोईर,वाडा वाड्यात शाळाबाह्य विद्यार्थ्यांच्या सर्वेक्षणाला सुरुवात, राज्यातील शाळाबाह्य मुलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शिक्षण विभाग दरवर्षी शाळाबाह्य विद्यार्थ्यांचे सर्वेक्षण अभियान राबवत असते.या शैक्षणिक वर्षांत देखील राज्य प्राथमिक शिक्षण संचालनालयातर्फे ५ ते २० जुलै २०२५ दरम्यान हे सर्वेक्षण राबवण्यात येत आहे. त्यासाठी राज्याचे प्राथमिक शिक्षण संचालक शरद गोसावी यांनी सर्व जिल्हा व तालुका शिक्षण अधिकाऱ्यांना आवश्यक ती तयारी करून सर्वेक्षण प्रभावीपणे राबवण्याचे आदेश दिले आहेत. या सर्वेक्षणाचा मुख्य उद्देश शाळाबाह्य आणि स्थलांतरित कामगारांच्या बालकांचा शोध घेणे आणि त्यांना पुन्हा शाळेच्या मुख्य प्रवाहात सामावून घेणे,असा आहे.अनेक वेळा विविध सामाजिक,आर्थिक व स्थलांतराच्या कारणांमुळे लहान मुले शिक्षणापासून वंचित राहतात.या मुलांना शोधून त्यांचा शिक्षणाचा…
जव्हार प्रतिनिधी, जव्हार अर्बन बँकेकडून ग्राहकांसाठी महत्वाचा निर्णय, ग्रामीण भागातील जनतेचा आधार म्हणून ओळखली जाणारी आणि सर्वसामान्यांच्या आर्थिक गरजा पूर्ण करणारी दि जव्हार अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लि.जव्हारने आपल्या ग्राहकांसाठी दिलासादायक पाऊल उचलले आहे.संचालक मंडळाने व्यावसायिक, शेतकरी,तरुण उद्योजक आणि लघुउद्योजकांना आर्थिक पाठबळ देण्यासाठी कर्ज व्यवहारात मोठा बदल जाहीर केला आहे. ग्राहकांच्या वाढत्या गरजा लक्षात घेऊन बँकेने कर्जाचे व्याजदर कमी केले असून, विविध कर्ज योजनांची मर्यादा वाढवून अधिक रकमेचे कर्ज देण्याचा निर्णय घेतला आहे. यासोबतच त्वरित कर्ज मंजुरीसाठी सोपी प्रक्रिया आणि परवडणारे व्याजदर यामुळे ग्राहकांसाठी नवी दालने खुली झाली आहेत, अशी माहिती बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रसाद बाबुराव मुकणे यांनी दिली. घर…
दीपक मोहिते, ” हल्लाबोल,” महायुती सरकारची लोकप्रियता उतरणीला… राज्य मंत्रीमंडळाची सध्याची अवस्था पाहिल्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना किमान चार ते पाच मंत्र्यांच्या हाती नारळ द्यावा लागणार आहे. मंत्रिमंडळाची सध्याची अवस्था ही ” जोकरांची सर्कस,” अशी झाली आहे.या सरकारमधील लफडेबाज मंत्र्यांची एकामागोमाग लफडी बाहेर येत आहेत.त्यामुळे भाजपचे वरिष्ठ नेते पार वैतागून गेले आहेत. कँटीन मॅनेजरला मारहाण करणारे आ.संजय गायकवाड,घोटाळेबाज मंत्री संजय शिरसाठ,घरात होमहवन करणारे व सभागृहात बाजूच्या आमदाराकडून तंबाखू घेऊन स्वतःच्या तोंडात कोंबणारे भरत गोगावले,सभागृहात मोबाईलवर रमी खेळणारे माणिकराव कोकाटे,दारूच्या आर्थिक घोटाळ्यात आकंठ बुडालेले खा.संदीपन भुमरे व आपल्या विभागाच्या निविदा घोटाळ्यात अडकलेले,संजय राठोड या सर्वांच्या उपदव्यापाने देवेंद्र फडणवीस पार त्रासून गेले…
वसंत भोईर,वाडा नाल्यातील बांधकामामुळे भातशेतीचे नुकसान, वाडा तालुक्यातील कुडूस ग्रामपंचायत हद्दीतील कोका-कोला कंपनी शेतकऱ्यांच्या मुळावर उठली आहे.येथे असलेल्या नैसर्गिक नाल्यात या कंपनीने संरक्षक भिंत बांधल्यामुळे नाल्याचे संपूर्ण पाणी भातशेतीत जात असून भातशेतीचे मोठे नुकसान झाले आहे. यासंदर्भात प्रशासनाने या कंपनीवर कारवाईचा बडगा उभारून शेतकऱ्यांना न्याय द्यावा,अशी मागणी एका निवेदनाद्वारे तहसीलदारांकडे करण्यात आली आहे. नैसर्गिक नाल्यांमध्येच बांधकाम केल्यामुळे हे संपूर्ण पाणी भातशेतीत जाऊन शेतीची नासाडी झाली आहे. त्यामुळे या शेतकऱ्यांचे संसार उघड्यावर पडणार आहेत.या कुटुंबीयांचा उदरनिर्वांचा प्रश्न निर्माण झाला आहे.या नैसर्गिक नाल्याचा प्रवाह बदलला आहे.नालाच अरुंद केल्याने नाल्याच्या पाण्याचा व्यवस्थित निचरा होत नाही. त्यामुळे पूर्णपणे शेत जमिनीची नासाडी झाली आहे.प्रशासनाने सदर…
दीपक मोहिते, ” हल्लाबोल,” वसई-विरार मनपातून २९ गावे वगळण्यासंदर्भात राज्य सरकार उदासीन…. वसई – विरार शहर महानगरपालिकेतील २९ गावे वगळण्यासंदर्भात असलेला तिढा सुटणे कठीण आहे. सुमारे १५ वर्षे या गावांचा प्रश्न मुंबई उच्च न्यायालयात प्रलंबित असुन तो लवकर सुटेल,अशी शक्यता नजीकच्या काळात अपेक्षित नाही.दोन वर्षांपूर्वी गावे वगळण्यात यावीत,यासाठी लढणाऱ्यानी गळ्यात हार घालत,गुलाल उधळत गावे वगळण्यात आली,म्हणून जल्लोष देखील केला होता. पण हा प्रकार वसईकर नागरिकांच्या डोळ्यात धूळफेक करणारा होता. महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर काही राजकारणी मंडळीनी तो आता पुन्हा ऐरणीवर आणला आहे.सध्या या गावातही होणारे शहरीकरण लक्षात घेता,उच्च न्यायालय ही गावे महानगरपालिकेतच राहू देतील,असे वाटते.ही गावे का वगळण्यात यावीत,याविषयी याचिकाकर्त्याकडे ठोस…
धनदांडगे,लुटेरे व नोकरशाही यांची अभद्र युती.. बँक राष्ट्रीयीकरणाची ५६ वर्षे, दीपक मोहिते, १९ जुलै १९६९ या दिवसाला भारताच्या बँकिंग क्षेत्रामध्ये अनन्यसाधारण महत्त्व आहे.५६ वर्षांपूर्वी दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी देशातील १४ खाजगी बँकांचे राष्ट्रीयीकरण याच दिवशी केले.त्यांच्या या निर्णयाचे पडसाद देशभरात उमटले.देशाच्या अर्थकारणाला वेगळा आयाम देण्याचा त्यांचा हा प्रयत्न होता,व तो काही अंशी यशस्वीही ठरला.त्याकाळी या निर्णयाचे सर्वाधिक पडसाद काँग्रेसच्या अंतर्गत राजकारणात उमटले.या निर्णयाची अंमलबजावणी होण्यापूर्वी १० दिवस अगोदर बंगरुळू येथे झालेल्या ( ९ जुलै १९६९ ) काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीत या निर्णयावरून प्रचंड गदारोळ उठला होता.इंदिराजींच्या या निर्णयाविरोधात काँग्रेसमधील ज्येष्ठ नेत्यांच्या गटाने त्यावेळी उचल खाल्ली व या प्रश्नी तीव्र मतभेद…
जव्हार,प्रतिनिधी, जव्हार येथे वीस हजार वृक्षलागवडीचा संकल्प, प्रकल्प अधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी डॉ.अपूर्वा बासुर ( भा. प्र. से.)यांच्या संकल्पनेतून कार्यक्षेत्रांतर्गत येत असलेल्या ३० शासकीय आश्रम शाळा, १८ अनुदानित आश्रम शाळा व दोन एकलव्य मॉडेल निवासी स्कूल आणि १६ शासकीय मुला मुलींची वसतिगृह येथे ” एक झाड धरती आंबासाठी, ” या उपक्रमांतर्गत २० हजार वृक्ष लागवडीच्या संकल्पची सुरुवात करण्यात आली. यामध्ये सर्व शाळा व वसतिगृह आपल्या शाळेमध्ये व परिसरात झाडे लावण्याबाबतचा लक्षांक निश्चित करण्यात आला आहे. त्यानुसार वृक्ष लागवड करण्याचे आवाहन कार्यालयातर्फे मुख्याध्यापक व गृहपाल यांना करण्यात आले आहे. या सर्वानी कालपासून वृक्ष लागवड करून या अभियानाची सुरुवात केली आहे.त्याचबरोबर एक…
दीपक मोहिते, जनसुरक्षा विधेयक २०२४ ; नव्या आणीबाणीची चाहूल, राज्यसरकारने नुकत्याच पार पडलेल्या पावसाळी अधिवेशनात जनसुरक्षा विधेयक २०२५ बहुमताने मंजूर केले.या विधेयकाला केवळ मार्क्स.कम्यु.पक्षाने विरोध केला.इतर सर्व विरोधकांनी या विधेयकाला मूकसंमती दिली.समाजाला घातक असलेल्या या विधेयकाला विरोधी पक्षाने विरोध न करणे,संशयास्पदच होते.त्यामुळे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने त्यांच्या नेत्यांना नोटीस बजावली आहे.या नोटीसा मिळाल्यानंतर विरोधकांनी राज्यपालांची भेट घेऊन या विधेयकावर स्वाक्षरी करू नका,अशी विनंती केली आहे.पण राज्यपाल त्यांची विनंती डावलून या विधेयकावर स्वाक्षरी करतील. विरोधकांची ही कृती देखील संशयास्पदच आहे.” अर्बन नक्षलवाद,” मोडून काढण्यासाठी राज्यसरकारने केंद्राच्या निर्देशानुसार हे विधेयक मंजूर करून घेतले आहे.या विधेयकामुळे नागरिकांच्या हक्कावर गदा येणार आहे,तसेच प्रसिद्धी माध्यमाची सरकारकडून…
