जव्हार,प्रतिनिधी,
जव्हार येथे वीस हजार वृक्षलागवडीचा संकल्प,
प्रकल्प अधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी डॉ.अपूर्वा बासुर ( भा. प्र. से.)यांच्या संकल्पनेतून कार्यक्षेत्रांतर्गत येत असलेल्या ३० शासकीय आश्रम शाळा, १८ अनुदानित आश्रम शाळा व दोन एकलव्य मॉडेल निवासी स्कूल आणि १६ शासकीय मुला मुलींची वसतिगृह येथे ” एक झाड धरती आंबासाठी, ” या उपक्रमांतर्गत २० हजार वृक्ष लागवडीच्या संकल्पची सुरुवात करण्यात आली. यामध्ये सर्व शाळा व वसतिगृह आपल्या शाळेमध्ये व परिसरात झाडे लावण्याबाबतचा लक्षांक निश्चित करण्यात आला आहे. त्यानुसार वृक्ष लागवड करण्याचे आवाहन कार्यालयातर्फे मुख्याध्यापक व गृहपाल यांना करण्यात आले आहे.
या सर्वानी कालपासून वृक्ष लागवड करून या अभियानाची सुरुवात केली आहे.त्याचबरोबर एक झाड धरती आबांसाठी या उपक्रमांतर्गत झाडे लावून रॅली व पालक सभा घेऊन प्रधानमंत्री धरती आबा जनजातीय ग्रामउत्कर्ष अभियान व वृक्ष संगोपन तथा संवर्धन याविषयी जनजागृती करण्यात आली.हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रकल्प अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक प्रकल्प अधिकारी सुभाष परदेशी,सहाय्यक प्रकल्प अधिकारी दीपक टिके,तिरूपती सांगवीकर नियोजन अधिकारी सतिश रास्ते,कनिष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी शेवाळे,देवरे इ. पालक अधिकारी मुख्याध्यापक व गृहपाल यांनी विशेष प्रयत्न केले.या उपक्रमाचे सर्व स्तरावरून विशेष कौतुक होत आहे.आज कार्यक्षेत्रांतर्गत पाच वसतीगृहामध्ये धरती आबा संगणक कक्षाचे नामकरण सुद्धा करण्यात आले असून यासाठी आदिवासी विकास निरीक्षकांनी प्रयत्न केले.

