- Home
- Uncategorized
- आंदोलन
- कृषी
- गुन्हेगारी
- चालू घडामोडी
- जागतिकीकरण
- राजकारण
- शैक्षणिक
- संपादकीय
- क्रीडा
- निवडणूक
- मनोरंजन
- विदेश
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
- मी ज्या नालासोपारा मतदारसंघातून येतो…
- ठाणे जिल्हा मध्य.सह.बँक निवडणूक ; सहकार पॅनलचे निर्विवाद वर्चस्व,
- राजकारण्यांनी पत्रकारांची किंमत केली आहे,
- ” सांगताही येत नाही आणि सहनही होत नाही, “
- २५ जून १९७५ ; आणीबाणीच्या कटू आठवणीना उजाळा,
- ठाकूर यांचा संताप ; हार्दिक राऊत यांच्या पथ्यावर पडणार ?
- ठाकूरको आखिर गुस्सा क्यों आया ?
- देशात श्रीमंत – गरीब, दरी सतत रुंदावतेय ; आर्थिक व सामाजिक विषमता अत्यंत धोकादायक…
Author: दीपक मोहिते
दीपक मोहिते, ” हल्लाबोल,” वादग्रस्त भुजबळ यांना ओबीसी समाजाने तारले, राज्याचे वादग्रस्त नेते छगन भुजबळ यांची राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांनी काल मंत्रीपदावर वर्णी लावल्यामुळे भुजबळ यांचा आनंद सध्या गगनात मावेनासा झाला आहे.हा निर्णय घेताना अजित पवार यांनी नैतिकता गुंडाळून ठेवत,त्यांची माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्या जागी वर्णी लावली आहे.या घटनेचे वर्णन करायचे झाल्यास एक वादग्रस्त बाहेर पडला,तर दुसरा वाजतगाजत त्याच्या मंत्रीपदावर विराजमान झाले,असे वर्णन केल्यास ते चुकीचे ठरू नये. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या टोळीत स्वतः अजित पवार,खा.सुनील तटकरे, खा.प्रफुल्ल पटेल,हसन मुश्रीफ,माणिकराव कोकाटे,व आता छगन भुजबळ यांची वर्णी लावून त्यांनी भ्रष्ट राजकीय नेत्यांचे एक वर्तुळ पूर्ण केले आहे.अजित पवार…
दीपक मोहिते, अस्मानी संकट, अवकाळी पावसामुळे पालघर जिल्ह्यातील अनेक व्यवसाय डबघाईला, गेल्या आठवड्यात वादळी वाऱ्यासह पडलेल्या अवकाळी पावसाने सुमारे अडीच हजार हे. जमिनीवरील कृषी क्षेत्राचे प्रचंड नुकसान झाले.तर पाचशेहून अधिक वीटभट्ट्या आणि पन्नास ते साठ मिठागर मालकांना प्रचंड आर्थिक फटका बसला आहे. तसेच या नैसर्गिक संकटातून मच्छिमारही सुटू शकले नाहीत.डहाणू तालुक्यातील डहाणू,धाकटी डहाणू,चिंचणी व बोर्डी येथील दहा मासेमारी बोटींचे नुकसान झाले आहे. या अस्मानी संकटात सुक्या मासळी व्यवसायासह मच्छिमारांचे साठ कोटी रु.चे आर्थिक नुकसान झाले आहे. पालघर जिल्ह्यात शेतकरी, बागायतदार,मच्छिमार, वीटभट्टी व मिठागर व्यवसाय मोठ्याप्रमाणात करण्यात येतो.ऐन उत्पादनाच्या हंगामात वळवाचा पाऊस झाल्यामुळे मीठ उत्पादकांनाही मोठ्या प्रमाणात फटका बसला आहे. केळवे…
नवीन पाटील,सफाळे बॉम्बची ती धमकी अखेर ठरली अफवा… लघर जिल्हाधिकारी कार्यालयात बॉम्ब ठेवण्यात आल्याचा ई-मेल आल्यामुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली.हा सर्व प्रकार ” मॉक ड्रिल,” चा प्रकार असावा,असे सुरुवातीला वाटत होते.परंतु नंतर जिल्हाधिकारी कार्यालयात आकाश भास्करन डीएमके केविंग केअर,या नावाने हा ई-मेल आल्याचे अधिकृतपणे सांगण्यात झाले.अखेर बॉम्ब ठेवल्याची अफवा असल्याचे सायं.पाच वाजता निष्पन्न झाल्यावर दिवसभरातील घडामोडीवर अखेर पडदा पडला.त्यानंतर शासकीय कर्मचाऱ्यांना त्यांच्या कार्यालयात जाण्याची मुभा देण्यात आली. मुंबईतील ताजमहल हॉटेल आणि विमानतळ बॉम्बस्फोटाने उडवून देण्याची धमकी गेल्या दोन दिवसांपूर्वीच मिळाली होती. त्यानंतर आता पालघर जिल्हा मुख्यालयात बॉम्ब ठेवल्याचा ई-मेल आल्याने आणि हा ई-मेल खरा असल्याचे स्पष्ट झाले व मुख्यालय संकुलातील…
वसंत भोईर,वाडा वनशक्ती संस्थेच्या उन्हाळी शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद,निसर्गाशी जोडणारा उपक्रम संपन्न, वनशक्ती संस्थेमार्फत दिनांक १६ ते २० मे २०२५ या कालावधीत ७ ते १५ वयोगटातील मुलांसाठी पाच दिवसीय उन्हाळी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.या शिबिरात एकूण ४२ विद्यार्थी सहभगी झाले होते. विद्यार्थ्यांसह पालकांनीही या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.निसर्गाच्या सान्निध्यात अनुभवातून शिकण्याची संधी मिळावी,हे शिबिराचे मुख्य उद्दिष्ट होते. या शिबिरात मुलांनी भाजीपाला शेतीचे प्रत्यक्ष प्रशिक्षण घेतले. नैसर्गिक साहित्याचा वापर करून हस्तकला तयार करणे, सकाळी ध्यानधारणा करणे व पक्षीनाद निरीक्षण,नदी परिसंस्थेचा अभ्यास, जलशुद्धीकरणाच्या नैसर्गिक पद्धती,वनस्पती व कीटक निरीक्षण,तसेच स्थानिक रोपवाटिकेला भेट देणे,असे अनेक उपक्रम राबवण्यात आले.रोपवाटिकेत कंपोस्ट निर्मिती, रोपांची लागवड व कुंडी…
दिपक मोहिते, पालघर जिल्हा मुख्यालयात बॉम्ब ठेवल्याचा इमेल, पालघर जिल्हा मुख्यालयात संकुलामध्ये बॉम्ब ठेवल्याचा निनावी ईमेल आल्यामुळे मुख्यालय संकुलात प्रचंड गोंधळ उडाला.ईमेल खरा असल्याचे पोलिसांची खात्री पडल्यानंतर पोलीस यंत्रणेने जिल्हा मुख्यालय संकुलातील सर्व इमारती रिकामी करण्यास सुरुवात केली. आज सकाळी अकराच्या सुमारास पालघर शहराच्या पश्चिमेस असलेल्या जिल्हाधिकारी कार्यालयात एका निनावी ईमेलद्वारे जिल्हाधिकारी कार्यालय संकुलात बॉम्ब ठेवल्याची माहिती मिळाली.पालघर पोलिसांकडून या ईमेलची तपासणी केल्यानंतर हा ई-मेल खरा असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर जिल्हा प्रशासन तसेच आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सक्रिय झाली. जिल्हा मुख्यालयातील जिल्हाधिकारी कार्यालय, दोन्ही प्रशासकीय इमारती तसेच जिल्हा परिषद कार्यालय रिकामी करण्यास आरंभ केला.अधिकारी,कर्मचारी तसेच कामानिमित्त आलेल्या नागरिकांना या कार्यालयांपासून काही अंतरावर…
दीपक मोहिते, बुलेट ट्रेन : ” ब्यू-ग्रीन,” इकॉनॉमीच्या तत्त्वावर विरार स्थानकाचा मास्टर प्लान, विरार येथील ” हायस्पीड रेल, ” ( बुलेट ट्रेन ) रेल्वे स्थानकांसाठी योजना ( एल.ए.पी. ) तयार करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. ” जिका,” सोबत झालेल्या बैठकीत स्थानिक क्षेत्र विकास योजना ( एल.ए.पी.) करता ब्यू-ग्रीन इकॉनॉमीच्या तत्त्वाचा उपयोग करून परिपूर्ण असा मास्टर प्लान व डिझाइन तयार करण्याच्या सूचना देण्यात आल्यामुळे वसई-विरार महापालिका अंर्तगत नगरविकास विभागाने या कामासाठी आंतरराष्ट्रीय अनुभव असलेले बी-आर्च व एम-आर्च पात्रताधारक दोन आर्किटेक्ट नेमण्याचा निर्णय घेतला आहे. ” हायस्पीड रेल, ” ( बुलेट ट्रेन ) स्टेशन क्षेत्र विकास ‘प्रोजेक्ट स्मार्ट` अंतर्गत ठाणे,…
दीपक मोहिते, ” हल्लाबोल,” पालघर जिल्ह्यात महायुतीतील शिवसेना – भाजपच्या वेगवेगळ्या चुली, काल पालघर जिल्ह्यात भाजप व शिंदे गटातर्फे दोन वेगवेगळ्या तिरंगा रॅली निघाल्या.भाजपच्या रॅलीचे नेतृत्व पालकमंत्री गणेश नाईक यांच्याकडे होते.त्यामुळे शिंदे गटाने आपली वेगळी चूल मांडली.महायुतीमधील दोन पक्ष समोरासमोर उभे ठाकल्याचे चित्र निर्माण झाले आहे. जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी गणेश नाईक यांची वर्णी लागल्यापासून जिल्ह्याच्या राजकारणात भाजप- शिंदे गटात अंतर्गत धुसफूस सुरू झाली आहे.एकमेकांवर कुरघोडी करण्याची एकही संधी उभयपक्ष सोडत. नाहीत.गणेश नाईक यांच्या कार्यकाळात आपल्या गटाला न्याय मिळू शकणार नाही,हे लक्षात घेऊन एकनाथ शिंदे यांनी आपले विश्वासू सहकारी परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांची जिल्ह्याच्या संपर्कमंत्रीपदी वर्णी लावली.त्यानी पदाची सूत्रे. हाती घेताच गणेश…
दीपक मोहिते, ” फ्रंटलाईन,” युद्धाचे मार्केटिंग नको… भारत-पाक युद्धात शस्त्रसंधी होऊन आता जवळपास आठवडा उलटून गेला आहे.या युद्धात केवळ युद्धविराम झाला आहे.विजय कोणाचा झाला,हे सांगणे सध्या तरी कठीणच आहे.भारतीय हवाई दलाने या युद्धात शत्रूराष्ट्राचे अनेक तळ उध्वस्त केले.त्यांच्याकडून झालेले हल्ले आपल्या पायदळाने यशस्वीरीत्या परतवून लावले.आपल्या जवानांनी या युद्धात जे शौर्य व धाडस दाखवले,त्याला तोड नाही.नियोजनबद्ध आखणी,लक्ष्य व शस्त्रसज्जता,या अशा तीन स्तरावर आपण शत्रूराष्ट्राला भारी पडलो.त्यामुळे आपल्या सैन्याचे कौतुक करावे,तेवढे थोडेच…. तीन ते चार दिवस सुरू राहिलेल्या युद्धात अचानक युद्धविराम झाल्यामुळे दोन्ही देशात संशयाचा धूर पसरला.अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी शस्त्रसंधी घडवून आणण्यात महत्वाची भूमिका पार पाडली,अशी कबुली स्वतः ट्रम्प यांनी…
नदीम शेख,पालघर, पालघर येथे शिवसेनेतर्फे भव्य तिरंगा रॅली ऑपरेशन सिंदूर अंतर्गत भारतीय सैन्याने केलेल्या शौर्याला मानवंदना देण्याकरता महाराष्ट्राचे लोकाभिमुख नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेने पूर्ण महाराष्ट्रभर तिरंगा रॅलीचे आयोजन केले आहे,त्याच पार्श्वभूमीवर पालघर येथेही शिवसेनेतर्फे छत्रपती शिवाजी चौक ते पाच बत्ती हुतात्मा चौक दरम्यान तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. शिवसेनेने आयोजित केलेला तिरंगा रॅलीत हजारोच्या संख्येने शिवसैनिक तसेच पालघरवासीय सहभागी झाले होते.आपल्या देशाचा अभिमान असलेला आपला तिरंगा झेंडा फडकवत तसेच उपस्थित शेकडो पालघर वासियांनी भारतीय तिरंग्याला आपली मानवंदना दिली. आज झालेल्या या तिरंगा रॅलीत बोईसर विधानसभेचे आ.विलास तरे,पालघर शिवसेना जिल्हाप्रमुख कुंदन संखे,जिल्हाप्रमुख वसंत चव्हाण,सहसंपर्कप्रमुख केदार काळे,माजी आ.मनीषा…
जव्हार प्रतिनिधी, जव्हार – तुळजापूर येथे गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव सोहळा संपन्न, जव्हार तालुक्यातील तुळजापूर येथे ग्रामस्थ मंडळातर्फे गावातील एकूण २१ गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गोपाळ बोरसे सर होते,प्रमुख पाहुणे म्हणून मातोश्री हॉस्पिटल,जव्हार येथील डॉ. प्रविण भोये,डॉ.धावजी धूम, डॉ.धनंजय धूम,तसेच जीएसटी विभागातील अधिकारी सखाराम पाचकूडवा,अधीक्षक आनंद टोपले,एमएसईबी चे रमेश गवळी,ट्रॅफिक पोलीस अधिकारी नितीन बोरसे, तंटामुक्ती अध्यक्ष हनुमंत बोरसे,ग्रामपंचायत सदस्या लता गवळी आणि बसचालक रमेश तुंबडा इ. मान्यवर उपस्थित होते. डॉ.प्रविण भोये यांनी विद्यार्थ्यांना जीवनातील संघर्ष आणि शिक्षणाचे महत्त्व याविषयी आपले अनुभव सांगत व्यसनमुक्त जीवनाचे आणि उच्च शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले.त्यांनी यावेळी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन…
