दीपक मोहिते,
” फ्रंटलाईन,”
युद्धाचे मार्केटिंग नको…
भारत-पाक युद्धात शस्त्रसंधी होऊन आता जवळपास आठवडा उलटून गेला आहे.या युद्धात केवळ युद्धविराम झाला आहे.विजय कोणाचा झाला,हे सांगणे सध्या तरी कठीणच आहे.भारतीय हवाई दलाने या युद्धात शत्रूराष्ट्राचे अनेक तळ उध्वस्त केले.त्यांच्याकडून झालेले हल्ले आपल्या पायदळाने यशस्वीरीत्या परतवून लावले.आपल्या जवानांनी या युद्धात जे शौर्य व धाडस दाखवले,त्याला तोड नाही.नियोजनबद्ध आखणी,लक्ष्य व शस्त्रसज्जता,या अशा तीन स्तरावर आपण शत्रूराष्ट्राला भारी पडलो.त्यामुळे आपल्या सैन्याचे कौतुक करावे,तेवढे थोडेच….
तीन ते चार दिवस सुरू राहिलेल्या युद्धात अचानक युद्धविराम झाल्यामुळे दोन्ही देशात संशयाचा धूर पसरला.अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी शस्त्रसंधी घडवून आणण्यात महत्वाची भूमिका पार पाडली,अशी कबुली स्वतः ट्रम्प यांनी दिल्यामुळे पडद्याच्या मागे नक्की काय घडलं ? याविषयी सर्वत्र विचारणा होऊ लागली आहे.दोन्ही देशात अणूयुद्ध होऊ नये,यासाठी ही शस्त्रसंधी आपण घडवून आणल्याचे ट्रम्प वारंवार सांगत सुटले आहेत.जर त्यांच्या म्हणण्यात तथ्य असेल तर तो दोन देशाच्या अंतर्गत कारभारामध्ये तिसऱ्या देशाचा हस्तक्षेप आहे,असे म्हंटल्यास ते वावगे ठरू नये.रशिया – युक्रेन या दोन राष्ट्रामध्ये सुरू असलेल्या युद्धात देखील या ट्रम्प महाशयांनी नाक खुपसण्याचा प्रकार केला होता.पण युक्रेनचे राष्ट्रपती झेलेन्स्की यांनी ट्रम्प यांना खडे बोल सुनावत,बाहेरचा रस्ता दाखवला होता.तसा करारीपणा आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दाखवायला हवा होता.ते न झाल्यामुळे डोनाल्ड ट्रम्प हे दररोज फुशारक्या मारत सुटले आहेत.ही घटना म्हणजे आपल्या परराष्ट्र धोरणाचा पराभव असल्याचे मानले जात आहे.जर ट्रम्प यांच्या म्हणण्यानुसार अशाप्रकारे युद्धविराम झाला असेल तर आपला विजय झाला म्हणून ऊर बडवून घेणे,कितपत योग्य आहे ? हे सारे घडल्यानंतर या युद्धाचे राजकीय पक्ष व वृत्तवाहिन्यांनी ज्या पद्धतीने मार्केटिंग चालवले आहे,ते निषधार्ह तर आहेच,पण ज्या दिलेरीने आपले जवान लढले,त्यांच्या असामान्य कामगिरीचे उपमर्द करण्यासारखे आहे.युद्धाचे मार्केटिंग करणे,हे नितीमत्तेला धरून नाही.या युद्धात आपण शत्रूराष्ट्राला जेरीस आणले होते.त्यामध्ये आपल्या सैन्याचा सिंहाचा वाटा आहे.त्यांचे श्रेय त्यांना देण्याऐवजी आपले राजकीय पक्ष आज सर्वत्र तिरंगा रॅली काढत आपली राजकीय पोळी भाजू पाहत आहेत.दुसरीकडे वृत्तवाहिन्या देखील टीआरपीसाठी वेगवान पद्धतीने मार्केटिंग करण्यात मश्गुल आहेत.
Trending
- पर्यटकांची जरूर काळजी घ्या, पण शहरातील करदात्यांना वाऱ्यावर सोडू नका,
- सक्रिय नसलेल्या राजकीय पक्षाना हजारो कोटी रु. च्या देणग्या,
- दादांच्या जाण्यावर कोणी राजकारण करू नये – सुनेत्राताई पवार,
- वाढवण बंदर ; तिढा अधिक जटील होत चालला आहे,
- ग्रामीण भागातील खेडी समृद्ध होण्यासाठी शाश्वत विकासाची गरज,
- विरोधी पक्षाकडून ७.८ टक्के जीडीपी वाढीच्या आकडेवारीवर संशय व्यक्त,
- वसईत स्मार्ट मीटर विरोधात ७ सप्टें. रोजी सर्वपक्षीय आंदोलन,
- पालघर जिल्हा परिषदेत शिक्षक प्रक्रिया वेगात सुरु,

