नदीम शेख,पालघर,
पालघर येथे शिवसेनेतर्फे भव्य तिरंगा रॅली
ऑपरेशन सिंदूर अंतर्गत भारतीय सैन्याने केलेल्या शौर्याला मानवंदना देण्याकरता महाराष्ट्राचे लोकाभिमुख नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेने पूर्ण महाराष्ट्रभर तिरंगा रॅलीचे आयोजन केले आहे,त्याच पार्श्वभूमीवर पालघर येथेही शिवसेनेतर्फे छत्रपती शिवाजी चौक ते पाच बत्ती हुतात्मा चौक दरम्यान तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.
शिवसेनेने आयोजित केलेला तिरंगा रॅलीत हजारोच्या संख्येने शिवसैनिक तसेच पालघरवासीय सहभागी झाले होते.आपल्या देशाचा अभिमान असलेला आपला तिरंगा झेंडा फडकवत तसेच उपस्थित शेकडो पालघर वासियांनी भारतीय तिरंग्याला आपली मानवंदना दिली.
आज झालेल्या या तिरंगा रॅलीत बोईसर विधानसभेचे आ.विलास तरे,पालघर शिवसेना जिल्हाप्रमुख कुंदन संखे,जिल्हाप्रमुख वसंत चव्हाण,सहसंपर्कप्रमुख केदार काळे,माजी आ.मनीषा निमकर,माजी आ.अमित घोडा,जिल्हा संघटिका वैष्णवी राहणे,जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा भारती कामडी, हजारो नागरिक सहभागी झाले होते.

