दिपक मोहिते,
पालघर जिल्हा मुख्यालयात बॉम्ब ठेवल्याचा इमेल,
पालघर जिल्हा मुख्यालयात संकुलामध्ये बॉम्ब ठेवल्याचा निनावी ईमेल आल्यामुळे मुख्यालय संकुलात प्रचंड गोंधळ उडाला.ईमेल खरा असल्याचे पोलिसांची खात्री पडल्यानंतर पोलीस यंत्रणेने जिल्हा मुख्यालय संकुलातील सर्व इमारती रिकामी करण्यास सुरुवात केली.
आज सकाळी अकराच्या सुमारास पालघर शहराच्या पश्चिमेस असलेल्या जिल्हाधिकारी कार्यालयात एका निनावी ईमेलद्वारे जिल्हाधिकारी कार्यालय संकुलात बॉम्ब ठेवल्याची माहिती मिळाली.पालघर पोलिसांकडून या ईमेलची तपासणी केल्यानंतर हा ई-मेल खरा असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर जिल्हा प्रशासन तसेच आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सक्रिय झाली.
जिल्हा मुख्यालयातील जिल्हाधिकारी कार्यालय, दोन्ही प्रशासकीय इमारती तसेच जिल्हा परिषद कार्यालय रिकामी करण्यास आरंभ केला.अधिकारी,कर्मचारी तसेच कामानिमित्त आलेल्या नागरिकांना या कार्यालयांपासून काही अंतरावर हलवण्यात आले आहे.या सर्व इमारतींच्या परिसरात पोलीस बंदोबस वाढवण्यात आला आहे. रॅपिड अँक्शन फोर्स,बॉम्ब शोध पथक व इतर पोलिसांचे विभाग कामाला लागली.या इमारतीच्या परिसरातk एनडीआरएफला देखील पाचरण करण्यात आले असून संपूर्ण जिल्ह्यात सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
दरम्यान बॉम्ब शोध पथक व पोलिसांकडून संपूर्ण कार्यालयांची कसून तपासणी सुरू झाली असून नागरिकांमध्ये एक भीतीचे वातावरण पसरले आहे.पालघर जिल्ह्यात तारापूर अणुऊर्जा केंद्रासह अनेक महत्त्वपूर्ण आस्थापने आहेत.जिल्हा मुख्यालयाला बॉम्ब ठेवण्यात आल्याच्या माहितीवरून संपूर्ण जिल्ह्यात सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
दरम्यान पोलीस यंत्रणेने कसून तपासणी करण्यास सुरुवात केली आहे,तसेच नागरिकांनी अफ़वावर विश्वास ठेवू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.

