- Home
- Uncategorized
- आंदोलन
- कृषी
- गुन्हेगारी
- चालू घडामोडी
- जागतिकीकरण
- राजकारण
- शैक्षणिक
- संपादकीय
- क्रीडा
- निवडणूक
- मनोरंजन
- विदेश
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
- मी ज्या नालासोपारा मतदारसंघातून येतो…
- ठाणे जिल्हा मध्य.सह.बँक निवडणूक ; सहकार पॅनलचे निर्विवाद वर्चस्व,
- राजकारण्यांनी पत्रकारांची किंमत केली आहे,
- ” सांगताही येत नाही आणि सहनही होत नाही, “
- २५ जून १९७५ ; आणीबाणीच्या कटू आठवणीना उजाळा,
- ठाकूर यांचा संताप ; हार्दिक राऊत यांच्या पथ्यावर पडणार ?
- ठाकूरको आखिर गुस्सा क्यों आया ?
- देशात श्रीमंत – गरीब, दरी सतत रुंदावतेय ; आर्थिक व सामाजिक विषमता अत्यंत धोकादायक…
Author: दीपक मोहिते
सुरेश वैद्य,सफाळे विरार – सफाळे दरम्यान प्रायोगिक तत्वावर रो रो सेवा सुरु, विरार-पालघर दरम्यानचा प्रवास जलदगतीने व्हावा, असा उद्देश डोळ्यासमोर ठेवून खारवाडेश्री (जलसार ) ते मारंबळपाडा ( विरार प.) दरम्यान कालपासून फेरीबोट रो-रो सेवा प्रायोगिक तत्त्वावर सुरू करण्यात आली.त्यामुळे विरार ते पालघर तालुक्यातील प्रवास कमी वेळेत करणे शक्य होणार आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून हा प्रकल्प कार्यान्वित होण्यासाठी प्रयत्न सुरू होते.खारवाडेश्री येथे स्लोपिंग रॅम अर्थात उतार असलेली हंगामी जेट्टीचे काम पूर्ण झाल्याने दोन तालुक्या दरम्यान रो-रो सेवा,सुरु करण्यात आली आहे. केंद्र सरकारच्या सागरमाला योजनेअंतर्गत या प्रकल्पाची आखणी करण्यात आली होती.या प्रकल्पाला २६ ऑक्टो.२०१७ रोजी १२.९२ कोटी रु.च्या खर्चाला प्रशासकीय मंजुरी देण्यात…
दीपक मोहिते राज्याच्या ग्रामीण भागात हंडाभर पाण्यासाठी महिलांची पायपीट सुरू.. राज्यात सर्वत्र भीषण पाणीटंचाईने डोके वर काढले आहे.ग्रामीण भागातील विहिरी,तलाव,बोअरिंग यातील पाण्याची पातळी खाली गेली असून महिला जीव धोक्यात घालून हंडाभर पाण्यासाठी विहिरीत उतरत आहेत. पण स्थानिक प्रशासनाना त्याची चाड नाही.अद्याप साखरझोपेत असल्याचे पाहायला मिळत आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दररोज आपल्या भाषणात, पाणीटंचाई संपुष्टात आणण्यासाठी शासन कटिबद्ध असून जलजीवन मिशन,हर घर जल,जल शिवार,अशा वारेमाप घोषणा करत सुटले आहे.पण यवतमाळ व पालघर जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील महिला हंडाभर पाण्यासाठी वणवण फिरत आहेत. जव्हार तालुक्यातील अतिदुर्गम भागात असणाऱ्या वावर – वांगणी ग्रामपंचायत हद्दीतील सागपाणी व रिठीपाडा गावात हंडाभर पाणी भरण्यासाठी…
दीपक मोहिते, ” हल्लाबोल, ” राजला टाळी दिल्यास ती उद्धव ठाकरे यांची घोडचूक ठरेल… शिवसेनेने गेल्या पाच दशकात अनेक चढउतार पाहिले. आजवर अनेक फुटीचे प्रसंग अनुभवले.छगन भुजबळ, नारायण राणे यांच्यासारखे पहिल्या फळीतले नेते शिवसेनेला सोडून गेले.काही काळ पक्षात चलबिचल निर्माण झाली.पण या अशा संकटातून पक्ष प्रत्येकवेळी सावरला गेला.काही वर्षांपूर्वी राज यांनी पक्षाला सोडचिट्ठी देत स्वतःचा पक्ष स्थापन केला.तेंव्हा राजकीय विश्लेषकानी बाळासाहेबांची शिवसेना संपल्याची हाकाटी सुरु केली.पण उद्धव ठाकरे यांनी पक्षप्रमुख या नात्याने पक्षाची धुरा समर्थपणे पेलली.तीन वर्षांपूर्वी एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे शिवसेनेत उभी फूट पडली,त्यामुळे बाळासाहेब ठाकरे यांची नक्की शिवसेना कोणती असा वाद उभा ठाकला.मात्र त्या संकटातून उद्धव ठाकरे व…
वसंत भोईर,वाडा वाडा एसटी आगाराच्या बसवाहक व चालकाचा प्रामाणिकपणा, वाडा बस आगारातील महीला वाहक गीतांजली गणेश घाटाळ या ठाणे – वाडा बसवर कर्तव्यावर असतांना त्यांना बसमध्ये एक राखाडी रंगाची बॅग कुणीतरी प्रवासी विसरल्याचे लक्षात आले. सदर बॅग महीला वाहक गीतांजली घाटाळ व चालक संतोष एम.गुट्टे यांनी प्रामाणिकपणा दाखवत तसेच आपल्या कर्तव्याशी एकनिष्ठ राहून गाडी वाडा बस आगारात पोहचताच तात्काळ जमा केली. ठाणे ते वाडा बसने प्रवास करणा-या सुनीता विलास दिवा,ही महीला प्रवासी बॅगेची चौकशी करण्यासाठी काही वेळातच वाडा बस आगारात आल्या.तेथे आल्यानंतर आपली राखाडी रंगाची बॅग आगारात जमा असल्याचे त्यांना समजले.सदर महीला प्रवासीची ओळख पटवून खात्री झाल्यावर सोन्याच्या गंठणसह…
वसंत भोईर,वाडा क्रशर मशीन अचानकपणे पुन्हा सुरु झाल्यामुळे ग्रामस्थांनी पाच तास रोखला रस्ता, तालुक्यातील गुहिर ग्रामपंचायत हद्दीत असलेली केशर मशीन ग्रामस्थांनी अर्ज विनंत्या करून बंद केली होती. ती अचानक पुन्हा सुरू झाल्याने ग्रामस्थांनी आक्रमक पवित्रा घेत हमरापूर – गाळत रे रस्ता पाच तास रोखून धरला. प्रशासनाच्या ढिसाळ कारभारा विरोधात प्रचंड संताप व्यक्त केला. गुहिर येथील ग्रामस्थांच्या आरोग्यास हानिकारक व शेतीस विनाशकारी ठरलेली क्रशर मशीन ग्रामस्थांच्या तक्रारीनंतर बंद करण्यात आली होती.ती निवृत्त जिल्हाधिकारी गोविंद बोडके यांनी २९ मार्च रोजी निवृत्त होण्याअगोदर परवानगी देऊन चालू केली असल्याचा आरोप करत ग्रामस्थांनी रास्ता रोको केला.यावेळी सुमारे पाच तास मार्ग रोखून धरला होता.या क्रशर मशीनमुळे…
शशिकांत ठाकूर,कासा आईस्क्रीम विक्रीमधून मिळतो अनेकांना रोजगार, दर उन्हाळ्यात थंडगार वस्तूची मागणी वाढत असते. गेल्या महिन्यापासून उन्हाचा पारा वाढत असून ग्रामीण भागातील नागरिक उकाड्याने हैराण झाले आहेत,वाढत्या गर्मीमुळे ग्रामीण भागातील मुले दररोज कुल्फीची अगदी आतुरतेने वाट पाहात असताना दिसतात . डहाणू तालुक्यातील ग्रामीण भागात सध्या आईस्क्रीम विक्रेत्यांचा धंदा तेजीत असून आपल्या पोटापाण्यासाठी मोठ्या प्रमाणावर मोटारसायकल,सायकल व पायी आईस्क्रीम,कुल्फीची विक्री करणारे विक्रेते फिरत असून दिवसाकाठी ते सहाशे ते साडेसहाशे रु.कमाई होत असल्याचे मोहम्मद पठाण आणि सुनिल यादव या कुल्फी विक्रेत्यांनी सांगितले.लहान मुले गारेगार थंडगार कुल्फीला पसंती देत आहेत.आपण १०ते १५ रु. पर्यन्त किमतीची कुल्फी विक्री करत असून दररोज सात ते आठ…
जव्हार प्रतिनिधी, जव्हारमध्ये नैसर्गिक शेती प्रशिक्षण कार्यशाळेला उत्स्फूर्त प्रतिसाद, जेएसडब्ल्यू फाउंडेशन फेलोशिप प्रोजेक्ट अंतर्गत, एटीएमए विभाग आणि तालुका कृषी अधिकारी, जव्हार यांच्या सहकार्याने नैसर्गिक शेतीवर आधारित प्रशिक्षण व जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.पिंपळशेत व वनवासी या गावांमध्ये झालेल्या दोन सत्रांत एकूण १५० हून अधिक शेतकरी सहभागी झाले होते.तालुका कृषी विभागाचे ब्लॉक टेक्नॉलॉजी मॅनेजर सुनील महाला यांच्या मार्गदर्शनाखाली नैसर्गिक शेतीचे मूलभूत तत्त्व, नैसर्गिक कीटकनाशके आणि सेंद्रिय खतांचा वापर आदी विषयांवर शेतकऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले. कार्यक्रमादरम्यान शेतकऱ्यांमध्ये विचारमंथन झाले आणि शाश्वत शेतीसाठी सामूहिक वचनबद्धतेची भावना तयार झाली.या उपक्रमाचे आयोजन जेएसडब्लू फाउंडेशनचे फेलो विवेक शहारे यांनी केले.यावेळी आपल्या मनोगतात सांगितले ” या…
दीपक मोहिते, सर्वोच्च न्यायलयाच्या निर्णयानंतर केंद्र सरकार बॅकफूटवर, वक्फ विधेयक प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारचे कान उपटल्यामुळे बॅकफूटवर जावे लागले आहे.गेल्या काही दिवसांपासून वक्फ बोर्ड विधेयकावर जोरदार चर्चा सुरु आहे. संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या शेवटी लोकसभा आणि राज्यसभेत हे वक्फ विधेयक सरकारने बहुमताच्या जोरावर मंजूर करून घेतले.त्यानंतर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी देखील या वक्फ विधेयकावर आपली स्वाक्षरी केली.या वादग्रस्त वक्फ विधेयकाचं कायद्यात रुपांतर झालं.मात्र,या विधेयकाच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात काही याचिका दाखल करण्यात आल्या. या याचिकांवर काल सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडली.या सुनावणीत सर्वोच्च न्यायालयाने वक्फ कायद्यातील दोन कलमांच्या अंमलबजावणीला स्थगिती दिली आहे.न्यायालयाच्या या निर्णयानंतर देशभरात खळबळ उडाली. वक्फ सुधारणा विधेयकाला विरोधकांनी…
शुभम सावंत,विरार, कामगार वर्गालाही सन्मानाने जीवन जगता आले पाहिजे, -प्रा.उषाताई वाघ, समता शिक्षण संस्थेचे सचिव व सेवानिवृत्त प्राचार्य डॉ.जालिंदर अडसुळे यांच्या घरहक्क चळवळीतील अनुभवावर आधारित विविध राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय नियतकालिकांमध्ये प्रकाशित झालेले लेख तसेच विविध परिषदांमध्ये मांडलेल्या दस्तऐवजाचे पुस्तक नुकतेच मुंबई प्रेसक्लब मध्ये प्रकाशित झाले. विलास वाघ मेमोरिअल फौंडेशनने पुरस्कृत केलेले डॉ.अडसुळे लिखित लोक साहित्य प्रकाशनने प्रकाशित केलेल्या ” लाईफ,टॉईल अँड सोशल वर्क इन स्लम्स-थिअरी आणि एक्स्पिरियन्स,”या पुस्तकाचे प्रकाशन मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडले. विलास वाघ मेमोरियल फाउंडेशनच्या अध्यक्षा उषा वाघ यांनी झोपड्यामध्ये राहणा-या कामगारवर्गानेच मुंबईसह सर्वच शहरवासियांचे जीवन सुसह्य केले.शहरातच हक्काचा निवारा मिळून त्यांचे जीवन आनंदमयी आणि सुखासमाधानाचे व्हायला हवे. असे…
दीपक मोहिते, राज्य विस्कळीत करण्याचे जाणीवपूर्वक प्रयत्न, ” सत्तेसाठी काहीही,” हा वाक्प्रचार प्रत्यक्षात उतरवण्यासाठी भाजप, समाज आणि धर्माधर्मात तेढ निर्माण व्हावी,यासाठी आता प्रयत्न सुरू केले आहेत. घाटकोपर येथे मराठी कुटुंबियाना देण्यात आलेला त्रास,वक्फ कायद्यातील सुधारणा,राजभाषेवर राष्ट्र भाषेची कुरघोडी,या सर्व घडामोडीवरून भाजप महानगरपालिका निवडणुकीवर डोळा ठेवून या हालचाली करत असल्याचे प्रथमदर्शनी दिसून येते. भाजप सत्तेसाठी जी खेळी करत आहे,ती विस्तवाशी खेळ करण्यासारखी आहे.घाटकोपर येथील गुजराती समाजाचे लोक ” आता बीजेपीची सत्ता आहे,” अशी जी धमकी मराठी कुटुंबाना धमकी देतात,हे कसले लक्षण आहे ? भाजप मधील आशिष शेलार,चन्द्रशेखर बावनकुळे,राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार व शिवसेनेचे एकनाथ शिंदे हे या अशा ज्वलंत प्रश्नी मूग…
