शुभम सावंत,विरार,
कामगार वर्गालाही सन्मानाने जीवन जगता आले पाहिजे,
-प्रा.उषाताई वाघ,
समता शिक्षण संस्थेचे सचिव व सेवानिवृत्त प्राचार्य डॉ.जालिंदर अडसुळे यांच्या घरहक्क चळवळीतील अनुभवावर आधारित विविध राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय नियतकालिकांमध्ये प्रकाशित झालेले लेख तसेच विविध परिषदांमध्ये मांडलेल्या दस्तऐवजाचे पुस्तक नुकतेच मुंबई प्रेसक्लब मध्ये प्रकाशित झाले.
विलास वाघ मेमोरिअल फौंडेशनने पुरस्कृत केलेले डॉ.अडसुळे लिखित लोक साहित्य प्रकाशनने प्रकाशित केलेल्या ” लाईफ,टॉईल अँड सोशल वर्क इन स्लम्स-थिअरी आणि एक्स्पिरियन्स,”या पुस्तकाचे प्रकाशन मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडले.
विलास वाघ मेमोरियल फाउंडेशनच्या अध्यक्षा उषा वाघ यांनी झोपड्यामध्ये राहणा-या कामगारवर्गानेच मुंबईसह सर्वच शहरवासियांचे जीवन सुसह्य केले.शहरातच हक्काचा निवारा मिळून त्यांचे जीवन आनंदमयी आणि सुखासमाधानाचे व्हायला हवे. असे प्रतिपादन केले
पुस्तकाच्या निर्मितीमध्ये परिश्रमपूर्वक भूमिका पार पाडणा-या प्रा.रचना अडसुळे व त्यांच्या टीमचे उषा वाघ यांनी तोंडभरून कौतुक केले.
युवा संस्थेचे संस्थापक मिनार पिंपळे यांनी नैसर्गिक साधन सामुग्रीवर केवळ सरकारने निर्णय घेण्याची परिस्थिती आज राहिली नसून नैसर्गिक साधन संपत्तीच्या वाटपासाठी सरकार आणि समाजाबरोबरच मार्केटचा हस्तछेप महत्वाचा ठरू लागला आहे.गृहनिर्माणसह सर्वसामान्यांचे जगण्याचे प्रश्न गंभीर झाल्याचे म्हटले. डॉ.हेजल डिलीमा आणि घर हक्क चळवळीतील संजय शिंदे यांनीही यावेळी आपले मनोगत व्यक्त केले.
निना शाह व मोरे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले तर प्रा.रचना अडसुळे यांनी उपस्थितांचे आभार मानले.
यावेळी समाजकार्य क्षेत्रातील एकॅडेमिशिअन्स,घर हक्क चळवळीसह सामाजिक संस्थांचे मान्यवर कार्यकर्ते यामध्ये डॉ.हेजल डिलिमा, फरिदा लांबे,भिम रासकर, मिनार पिंपळे,अंजली कानिटकर,अंजली गोकर्ण,नायक इ.मान्यवर उपस्थित होते.

