शशिकांत ठाकूर,कासा
आईस्क्रीम विक्रीमधून मिळतो अनेकांना रोजगार,
दर उन्हाळ्यात थंडगार वस्तूची मागणी वाढत असते. गेल्या महिन्यापासून उन्हाचा पारा वाढत असून ग्रामीण भागातील नागरिक उकाड्याने हैराण झाले आहेत,वाढत्या गर्मीमुळे ग्रामीण भागातील मुले दररोज कुल्फीची अगदी आतुरतेने वाट पाहात असताना दिसतात .
डहाणू तालुक्यातील ग्रामीण भागात सध्या आईस्क्रीम विक्रेत्यांचा धंदा तेजीत असून आपल्या पोटापाण्यासाठी मोठ्या प्रमाणावर मोटारसायकल,सायकल व पायी आईस्क्रीम,कुल्फीची विक्री करणारे विक्रेते फिरत असून दिवसाकाठी ते सहाशे ते साडेसहाशे रु.कमाई होत असल्याचे मोहम्मद पठाण आणि सुनिल यादव या कुल्फी विक्रेत्यांनी सांगितले.लहान मुले गारेगार थंडगार कुल्फीला पसंती देत आहेत.आपण १०ते १५ रु. पर्यन्त किमतीची कुल्फी विक्री करत असून दररोज सात ते आठ गावे फिरून आम्ही व्यवसाय.मात्र एखाद्या दिवशी कुल्फी वितळली तर धंद्यात थोडाफार तोटा सहन करावा लागतो.दरम्यान मोहम्मद पठाण हे बिहार राज्यातील सोंधो कहरटोली भागातील असून असे गावोगावी बरेच आईसक्रीम विक्री करणारे फिरत असून पावसाळ्यात मात्र गावी शेती करत असल्याचे त्यांनी सांगितले.तर सुनील यादव हे आईस्क्रीम विक्रीचा धंदा करत असून ते कानपूर मधील आहेत ते उन्हाळ्यात नंतर आईक्रीम ऐवजी खारी बटर अशा नमकीन वस्तूची विक्री करतात .
दरम्यान शहरात घरात ऐसी तसेच थंड पेय,आईस्क्रीम,गोळा आदी दुकाने असतात.मात्र ग्रामीण उकाड्याने हैराण झाल्यावर लहान मूल या आईसक्रीम व कुल्फीवाल्यांची मोठ्या आतुरतेने वाट पाहत असतात. लहान मुलाबरोबर मोठ्या माणसांनाही आईसक्रीम,कुल्फीचा मोह आवरत नाही.

