वसंत भोईर,वाडा
वाडा एसटी आगाराच्या बसवाहक व चालकाचा प्रामाणिकपणा,
वाडा बस आगारातील महीला वाहक गीतांजली गणेश घाटाळ या ठाणे – वाडा बसवर कर्तव्यावर असतांना त्यांना बसमध्ये एक राखाडी रंगाची बॅग कुणीतरी प्रवासी विसरल्याचे लक्षात आले. सदर बॅग महीला वाहक गीतांजली घाटाळ व चालक संतोष एम.गुट्टे यांनी प्रामाणिकपणा दाखवत तसेच आपल्या कर्तव्याशी एकनिष्ठ राहून गाडी वाडा बस आगारात पोहचताच तात्काळ जमा केली.
ठाणे ते वाडा बसने प्रवास करणा-या सुनीता विलास दिवा,ही महीला प्रवासी बॅगेची चौकशी करण्यासाठी काही वेळातच वाडा बस आगारात आल्या.तेथे आल्यानंतर आपली राखाडी रंगाची बॅग आगारात जमा असल्याचे त्यांना समजले.सदर महीला प्रवासीची ओळख पटवून खात्री झाल्यावर सोन्याच्या गंठणसह ११ विविध रंगाच्या साड्यांची बॅग सुनिता दिवा यांना परत करण्यात आली. संबधित प्रवासी महीलेने वाहक व चालक यांचे तोंडभरून कौतुक करत आभार व्यक्त केले.तसेच वाहक गीतांजली घाटाळ व चालक संतोष गुट्टे या दोघांचे आगारप्रमूखांसह इतर अधिका-यांनी कौतुक केले आहे.अशा प्रामाणिक कर्मचाऱ्यांमुळे आजही नागरिकांमध्ये राज्य परिवहन महामंडळाची विश्वासार्हता टिकून आहे.

