Author: दीपक मोहिते

विश्वनाथ ठाकरे,शहापूर प्रदीप चव्हाण यांच्या ऋणानुबंध कविता संग्रहाचे प्रकाशन, प्रदीप चव्हाण यांच्या ” ऋणानुबंध, ” या कविता संग्रहाचे प्रकाशन गुरुपौर्णिमेच्या शुभमुहूर्तावर करण्यात आला . या कार्यक्रमात योगेश जोशी, नेहाते,संजीवनी चव्हाण, प्रथमेश चव्हाण,आर्या चव्हाण शांताराम चव्हाण,सहकारी अधिकारी श्रेणी 1 सहकारी संस्था शहापूर, अरुण पाटील उपाध्यक्ष ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक,भाऊसाहेब चव्हाण गटशिक्षणाधिकारी शहापूर, रामचंद्र विशे, गटशिक्षणाधिकारी शहापूर हिराजी वेखंडे, संगीता माळी , संगीता पवार केंद्रप्रमुख नडगाव,विजय चोघांळा सर अध्यक्ष पर्यावरण मित्र बहुउद्देशीय सामाजिक संस्था भारत प्रशांत जाधव प्राचार्य शारदा इंग्लिश मिडीयम स्कुल वासिंद,सचिन ढमणे,दिलीप ठाकरे,आहेर या सर्वांच्या सहकार्याने हे पुस्तक पूर्ण करू शकलो,असे प्रदीप चव्हाण यांनी आपल्या मनोगतात सांगितले व त्यांचे…

Read More

वसंत भोईर,वाडा भिती न बाळगता पोलिसांची मदत घ्यावी – पोलिस निरीक्षक दत्तात्रय किंद्रे लैंगिक शोषण असो की अन्य कोणीही त्रास देत असल्यास मुली व महिलांनी भिती न बाळगता पोलिसांची मदत घ्यावी,असे आवाहन वाडा पोलिस निरीक्षक दत्तात्रेय किंद्रे यांनी केले आहे. राष्ट्रवादीचे नेते तथा राज्याचे उपमुख्यमंत्री यांच्या वाढदिवसानिमित्त ” जनविश्वास,” सप्ताह साजरा करण्यात येत असून या अंतर्गत पालघर जिल्हा महिला आघाडी जिल्हाध्यक्षा रोहिणीताई शेलार यांच्यातर्फे वाडा तालुक्यातील परळी आश्रमशाळा येथे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन शिबिर व वृक्षारोपण उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बोलताना दत्तात्रेय किंद्रे यांनी महिला कायदे व सायबर क्राईम याविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. तसेच यावेळी राष्ट्रवादी महिला आघाडीच्यावतीने परळी…

Read More

वसंत भोईर,वाडा, चिंचघर – देवघर रस्त्याच्या दुरुस्तीसाठी बि-हाड मोर्चाचे आयोजन, तालुक्यातील चिंचघर-देवघर या रस्त्याची दुरावस्था झाली असून सर्वत्र खड्डे पडले आहेत.त्यामुळे या रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या वाहनचालकांना प्रचंड मनस्ताप होत आहे.या रस्त्यावरून वाहने चालवणाऱ्यांची भीतीने गाळण उडत असते.रस्त्याच्या अशा दुरावस्थेमुळे शालेय विद्यार्थी व रुग्णांचे मोठे हाल होत आहेत.त्यामुळे या रस्त्याची तत्काळ दुरुस्ती करा अन्यथा सोम.२८ जुलै रोजी धर्मवीर विचार मंचाचे संस्थापक अध्यक्ष मिलिंद पष्टे यांच्या नेतृत्वाखाली बि-हाड मोर्चाचे आयोजन करण्यात आले असल्याबाबत वाड्याचे तहसीलदार भाऊसाहेब अंधारे यांना निवेदन देण्यात आले आहे. या रस्त्याच्या दुरावस्थे संदर्भात या परिसरातील नागरिकांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वारंवार पत्रव्यवहार केला आहे.मात्र सार्वजनिक बांधकाम विभाग प्रशासनाकडून त्याला केराची…

Read More

जव्हार प्रतिनिधी, महाराष्ट्र राज्य परिवहन  सेवेची  श्रावणी सोमवार विशेष सेवा, पालघर विभाग रा.प. महामंडळाच्या जव्हार आगारातर्फे श्रावणी सोमवार निमित्त भाविकांसाठी खास “ जव्हार – नाशिक दर्शन,” विशेष बस फेरीची घोषणा करण्यात आली आहे. ही बस फेरी शनिवार व रविवार वगळता प्रत्येक श्रावणी सोमवारसाठी उपलब्ध होणार आहे.सदर प्रवासात जव्हार-त्र्यंबकेश्वर-नाशिक-वणी ( सप्तशृंगी गड )- रेणुका माता मंदिर-शिर्डी या प्रमुख धार्मिक स्थळांचा समावेश आहे.या दर्शन फेरीचे एकूण तिकीट दर केवळ रु. ९४६/- इतके असून,भाविकांना ही सेवा परवडणारी आहे. प्रवाशांसाठी खास सवलती: ७५ वर्षांवरील नागरिकांसाठी सर्व प्रकारच्या बसेसमधून मोफत प्रवासाची सुविधा, “ महिला प्रवासी सन्मान योजना,” अंतर्गत सर्व महिलांना तिकीट दरात ५० %…

Read More

दीपक मोहिते, वसई –  विरार मनपा निवडणूक ; जागावाटपात भाजप शिंदे गटावर कुरघोडी करण्याच्या तयारीत… वसई विरार शहर महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीत भाजप १२६ जागांपैकी ११० जागा लढवण्याच्या तयारीत आहे.तर शिंदे गटाला केवळ १५ जागांवर समाधान मानावे लागणार आहे.शिंदे गटाला ४० ते ५० जागांची अपेक्षा आहे,पण भाजप त्या देतील,असे वाटत नाही. या निवडणुकीत भाजप शिंदे गटाशी युती करून निवडणूक लढवेल,अशी शक्यता फार कमी आहे.तर राष्ट्रवादी काँग्रेसची ( अजित पवार ) ताकद नगण्य असल्यामुळे ते ही निवडणूक लढवण्याच्या फंदात पडतील,असे वाटत नाही.वसई तालुक्यात त्यांचा पक्ष औषधाला देखील नाही,त्यामुळे भाजप व शिंदेची शिवसेना त्यांना विचारात घेणार नाही.गेल्या २५ वर्षात एकत्रित राष्ट्रवादी काँग्रेसला तालुक्यातील…

Read More

सचिन पाटील,विरार विरार येथे ” साईक स्पेक्ट्रम २०२५” डिजिटल स्पर्धेचे आयोजन, युवा पिढीच्या मानसशास्त्राचे सखोल आकलन करणे,हे त्यांचे कल्याण आणि सध्याच्या आव्हानांना सामोरे जाण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे.मानसिक आरोग्य ते डिजिटल,वित्त आणि सामाजिक गतिशीलता यांसारख्या प्रचलित ट्रेंडबद्दल जागरूकता निर्माण केल्यामुळे तरुणांना या विश्वाशी जोडण्यास मदत होते. ” साईक स्पेक्ट्रम २०२५” या आंतरमहाविद्यालयीन डिजिटल स्पर्धेने विद्यार्थ्यांना अनेक महत्त्वाच्या विषयांवर त्यांचे विचार आणि भावना व्यक्त करण्यासाठी एक महत्त्वपूर्ण व्यासपीठ उपलब्ध करून दिले. विवा महाविद्यालयातील मानसशास्त्र विभागाने ” साईक स्पेक्ट्रम २०२५” या अभिनव आंतरमहाविद्यालयीन डिजिटल स्पर्धेचे यशस्वी आयोजन केले.या स्पर्धेप्रसंगी विवा महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्या डॉ.दीपा वर्मा,उप प्राचार्या डॉ.प्राजक्ता परांजपे, मानसशास्त्र विभाग प्रमुख प्राध्यापिका रश्मी…

Read More

दीपक मोहिते, मुख्यमंत्री फडणवीस  मंत्रीमंडळातील चौघांना बाहेरचा रस्ता दाखवणार ; आ. स्नेहा दुबे पंडीत यांची वर्णी लागणार… राज्य मंत्रीमंडळातील चार मंत्र्यांच्या डोक्यावर सध्या हकालपट्टीची तलवार लटकत आहे.संजय शिरसाठ,माणिकराव कोकाटे,योगेश कदम व संजय राठोड,या चार मंत्र्यांचा त्यामध्ये समावेश आहे.तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे असलेल्या नगरविकास खात्याला सध्या राज्यमंत्री नाही,त्यामुळे तीन कॅबिनेट व दोन राज्यमंत्री अशी पाच पदे भरावी लागणार आहेत.त्यासाठी लवकरात लवकर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मंत्रिमंडळाची फेररचना करतील,अशी शक्यता आहे.या फेररचनेत वसई तालुक्याला राज्यमंत्रीपद मिळण्याची शक्यता आहे.त्यासाठी सुशिक्षित व अभ्यासू आमदार अशी ओळख असलेल्या वसईच्या आ.स्नेहा दुबे पंडित यांचे नाव आघाडीवर आहे.राज्यमंत्रीपदी त्यांची वर्णी लागण्याची दाट शक्यता आहे.त्यांचे वडील विवेक पंडित…

Read More

दीपक मोहिते, ” हल्लाबोल,” माजी उपराष्ट्रपती जगदीप धनकड यांच्या राजीनाम्याची कारणे अद्याप गुलदस्त्यातच…. देशाचे उपराष्ट्रपती जगदीप धनकड यांच्या अचानक राजीनामा देण्यावरून देशातील राजकारण तापले असून याविषयी होणारी चर्चा शिगेला पोहोचली आहे.या राजीनाम्याच्या मागे कोणती कारणे आहेत,हे शोधणे सत्ताधारी,विरोधक व प्रसिद्धी माध्यमांना देखील शक्य झालेले नाही.त्याची नेमकी कारणे केवळ तीन व्यक्तींनाच माहीत आहेत.पंतप्रधान नरेंद्र मोदी,गृहमंत्री अमित शहा व स्वतः जगदीप धनकड होय.या तिघांशिवाय इतर कोणालाही या राजिनाम्यामागची नेमकी काय कारणे आहेत ते माहीत नाही.अवघ्या चार तासात पडद्याआड जे काही घडले,ते भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांना कळू देण्यात आले नाही. माजी उपराष्ट्रपती धनकड यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु याना पाठवलेल्या राजीनामा पत्रात प्रकृतीच्या कारणावरून मी…

Read More

वसंत भोईर,वाडा पावणे दोन कोटीचे अमली पदार्थ पोलिसांनी केले हस्तगत, वाडा तालुक्यातील कुडूस येथे राहणाऱ्या मोहनलाल गुणेशाजी जोशी उर्फ शर्मा हा इसम त्याच्या मारूती कारमधून मुब्रा ठाणे येथे जात असता त्याच्याकडे १ किलो २०० ग्रॅम इतका अंमली पदार्थ सापडले.या घटनेमुळे ग्रामीण भागातही अमली पदार्थाची विक्री होत असल्याचे उघडकीस आले आहे. अधिकृत सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार चार दिवसापूर्वी मुंब्रा बायपास उड्डाणपूल लगत मुंब्रा येथे गुन्हे शाखा गट 1 ठाणे येथील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी रचलेल्या सापळ्यामध्ये मोहनलाल गुणेशाजी जोशी उर्फ शर्मा याच्याकडून सुमारे १ कोटी ६९ लाख रु.किं.चा एमडी हा अंमली पदार्थ सापडला.याप्रकरणी मुंब्रा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. आरोपी…

Read More

दीपक मोहिते, वसई पूर्वेस रेंज ऑफिस येथे होणारी वाहतूककोंडी नाहीशी होणार ; आ. तरे यांचे प्रयत्न फळाला आले… पालघर जिल्हाधिकारी कार्यालयात नुकत्याच पार पडलेल्या जिल्हा नियोजन मंडळाच्या बैठकीत बोईसरचे आ.विलास तरे यांनी वसई पूर्वेस रेंज नाका येथे होणाऱ्या वाहतूककोंडीबाबत प्रश्न उपस्थित करत पालकमंत्र्यांचे लक्ष वेधले.यावेळी पालकमंत्री गणेश नाईक यांनी आ.तरे यांनी सुचवलेल्या पर्यायावर विचार करून उपाययोजना करू,असे आश्वासन दिले.त्यामुळे या परिसरातील नागरिक तसेच रोजगारानिमित्त येथी औद्योगिक क्षेत्रात दररोज येजा करणाऱ्या हजारो चाकरमान्यांना दिलासा मिळणार आहे.गेली अनेक प्रलंबित असलेला हा ज्वलंत प्रश्न आता मार्गी लागणार असल्यामुळे येथील आठ ते दहा गावातील नागरिक आ.विलास तरे यांना धन्यवाद देत आहेत. वसई पूर्वेस असलेल्या…

Read More