सुरेश काटे,तलासरी
तलासरीत मोकाट जनावरांच्या गळ्यात रेडियमचे पट्टे,
तलासरी भागात मोठ्या प्रमाणात मोकाट जनावरे फिरत असून ही जनावरे महामार्गांवर तसेच गावागावातील रस्त्यावर फिरत असतात,तसेच रात्रीच्या सुमारास रस्त्यावर बसत असतात.त्यामुळे अपघाताचे प्रमाण मोठ्याप्रमाणात वाढले आहे. रस्त्यावरून भरधाव येणाऱ्या वाहनामुळे या जनावरांचा अपघात होतो.
महामार्गावर या मोकाट फिरणाऱ्या जनावरामुळे गेल्या काही वर्षात अनेक अपघात होऊन वाहनाचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
महामार्गाच्या परिसरातील हिरवा चारा खाण्यासाठी ही जनावरे दिवस रात्र फिरत असतात.या मोकाट फिरत असलेली जनावरे अपघातात मृत्यूमुखी पडू नयेत,यासाठी या मोकाट जनावरांच्या गळ्यात रेडियमचे पिवळे पट्टे बांधण्यात आले आहेत. जेणेकरून गळ्यातील रेडियम पट्टे चमकून रात्री वाहन चालक सावध होतील व अपघात टाळता येतील.
तलासरीत फिरणाऱ्या या मोकाट जनावरांच्या गळ्यात अडकवण्यात आलेले पट्टे हे तलासरी पोलीस ठाणे तसेच बजरंग दलातर्फे बांधण्यात आले आहेत.

