Author: दीपक मोहिते

दीपक मोहिते, सत्ताधारी व विरोधक एकाच माळेचे मणी ; करदाते प्रचंड नाराज, गेल्या काही दिवसांपासून वसईच्या महानगरपालिकेतील सत्ताधारी व विरोधक हे दोघेही बेधुंदपणे वागत आहेत. त्यांच्या या अशा वागण्यामुळे नागरिकांचे भले होईल, असा जर त्यांनी समज करून घेतला असेल तर ते मूर्खाच्या नंदनवनात वावरत आहेत, असेच म्हणावे लागेल. गेल्या पंधरा वर्षापूर्वी म्हणजे महानगरपालिकेची स्थापना झाल्यानंतर विकासाला गती येण्याऐवजी मनपा क्षेत्रातील विरार,नालासोपारा,नवघर – माणिकपूर व वसई या चार महानगराच्या विकासाचा बट्ट्याबोळ झाला. प्रशासकीय राजवटीत अधिकाऱ्यांनी महानगरपालिकेची तिजोरी लुटून खाल्ली. करदात्याचा पैसा दिवसाढवळ्या लुटला गेला. त्याविषयी संबधित अधिकाऱ्यांची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करण्याऐवजी सत्ताधारी व विरोधक एकमेकांच्या उरावर बसण्यात धन्यता मानत आहेत.…

Read More

दीपक मोहिते, ” हल्लाबोल,” माजी आ.ठाकूर यांच्यासाठी येणारा काळ अत्यंत कठीण, वसई तालुक्याचे राजकारण २०२४ पासून वेगळ्या वळणावर आले असून,या दोन वर्षांच्या काळात वसईच्या राजकारणात फार मोठ्या उलथापालथी झाल्या. या प्रक्रियेत माजी आ.हितेंद्र ठाकूर यांच्या नेतृत्वाला ग्रहण लागले. कालपर्यंत राज्याच्या राजकारणात ज्यांच्या शब्दाला मान होता, त्या ठाकुरांना गेल्या दोन वर्षात त्यांचे आप्तस्वकीय व भाजपने चांगलेच खिंडीत पकडले. ही अशी परिस्थिती का निर्माण झाली, यावर ठाकूर यांनी आत्मपरीक्षण करायला हवे होते. पण ” शेर कभी घास नही खाता,” अशा गुर्मीत राहून त्यांनी गेल्या दोन वर्षात खूप काही गमावले. त्यांच्या सतत अवतीभवती असणाऱ्यांनी त्यांच्या जीवावर खूप काही कमावले. पण,त्यांचे पक्षाच्या जडणघडणीमध्ये योगदान…

Read More

दिपक मोहिते, ” हल्लाबोल,” लोक वर्षभरातच तुम्हाला कंटाळले, नालासोपारा हे शहर समस्याग्रस्त म्हणून कायम चर्चेत असते. अनधिकृत बांधकामे, वाढती गुन्हेगारी, तीव्र पाणीटंचाई, वारंवार खंडित होणारा वीजपुरवठा व दर पावसाळ्यात निर्माण होणारी पुरपरिस्थिती, अशा कारणामुळे हे शहर बदनाम झाले आहे. त्यामुळे गेल्या विधानसभा निवडणुकीत या शहरातील मतदारांनी परिवर्तन केले. या मतदारांना नव्याने सत्तेत विराजमान झालेल्या लोकप्रतिनिधीकडून फार मोठ्या अपेक्षा होत्या. आपण केलेला बदल, आपल्याला विकासाची वाट दाखवेल, बकाल झालेले आपले शहर कात टाकेल, आपल्या मुलाबाळांचे भविष्य घडवेल, अशा त्यांना अपेक्षा होत्या, पण कसले काय ? अवघ्या वर्षभरात या शहरातील नागरिकांवर कपाळावर हात मारून घ्यायची पाळी आली. कारण, विद्यमान लोकप्रतिनिधी हे केवळ…

Read More

दीपक मोहिते, नागपूर येथे उद्यापासून ब्रिक्स संघटनेची दोन दिवसीय शिखर परिषद, उद्या नागपूर येथे ब्रिक्स या संघटनेची शिखर परिषद होत आहे.ब्रिक्स म्हणजे नेमके काय ? ही संघटना कशी काम करते ? ती स्थापन करण्यामागे नेमकी काय कारणे आहेत ? या तिन्ही प्रश्नांची उत्तरे देण्याचा प्रयत्न मी या लेखातून करणार आहे. सन २००६ मध्ये विकसनशील देशांचे एक शक्तिशाली संघटन असावे, असा उद्देश बाळगून ब्राझील,रशिया,इंडिया, चायना व साऊथ आफ्रिका ,या देशाच्या देशाच्या पहिल्या अक्षरापासून ( B.R.I.C.S. ) बनले आहे. २०२५ मध्ये संघटनेचा विस्तार करण्यात आला. इथिओपिया, इजिप्त, इराण,सौदी अरेबिया,संयुक्त अरब अमिराती व इंडोनेशिया या नवीन देशांचा समावेश करण्यात आला. या संघटनेचे मुख्यालय…

Read More

दीपक मोहिते, कर्जमाफीने शेतकरी कर्जमुक्त होत नाही, तर तो अधिक कर्जबाजारी होत असतो, दर दोन वर्षाने शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा प्रश्न ऐरणीवर येत असतो. विरोधक व सत्ताधारी या प्रश्नावरून एकमेकांचे कायम गळे आवळत असतात. पण, या कर्जमाफीमुळे शेतकऱ्यांचे प्रश्न सुटले का ? त्यांच्या राहणीमानात काही बदल झाला का ? या दोन्ही प्रश्नांची उत्तरे ” नाही,” असेच मिळते. ही कर्जमाफी म्हणजे तात्पुरती मलमपट्टी असून मूळ समस्या पूर्णपणे सुटू शकत नाही. आजवर सातवेळा कर्जमाफी करण्यात आली. आता सरकार आठवी कर्जमाफी करण्याच्या तयारीत आहे. शाश्वत शेती आणि कायमस्वरूपी कर्जमुक्ती, यासाठी दूरगामी रचनात्मक बदल करणे, अनिवार्य आहे. त्यासाठी शेतकऱ्यांच्या दैनंदिन जीवनातील प्रश्न व समस्या, तो राहत…

Read More

दीपक मोहिते, ” हल्लाबोल,” ” होय,मी,व्हेंटिलेटरवर असलेल्या महानगरपालिकेचा सन्माननिय नागरिक आहे,” … चार दिवसापूर्वी पावसाने राज्यात सर्वत्र दमदार हजेरी लावली, त्यामुळे ग्रामीण भागातील जनता चांगलीच सुखावली. मात्र शहरी भागातील जनता, मात्र न भूतो न भविष्यती अशा अस्मानी संकटात सापडली. मुंबईपासून अवघ्या तासाच्या अंतरावर असलेल्या नालासोपारा व विरार शहराला अक्षरशः नद्या व तलावाचे स्वरूप आले. येथील नागरिकांच्या डोळ्यांच्या कडा अजूनही ओल्याच आहेत. पावसाळा सुरू होण्यापूर्वी सर्वपक्षीय नेते व मनपा अधिकारी या शहरातील नाले व गटारांची पाहणी करत दावे करत होते. यंदा कोणत्याही परिस्थितीत शहरात पाणी साचून राहणार नाही. त्यांचे हे दावे किती निखालस खोटे होते व कर देणाऱ्या प्रामाणिक करदात्याशी प्रतारणा…

Read More

दिपक मोहिते, ” फ्रंटलाईन, ” यंदाचा पाऊस भातशेतीला दिलासा देणारा…. गेल्या चार दिवसात जिल्ह्यात झालेल्या पावसामुळे ग्रामीण भागातील जनतेला चांगलाच दिलासा मिळाला आहे. सध्या कोसळत असलेला पाऊस आणखी आठ ते दहा दिवस असाच सुरू राहिला तर जिल्ह्यातील भातशेती यंदा चांगलीच बहरु शकते,असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. गेल्या अनेक वर्षांपासून जिल्ह्यात पावसाचे प्रमाण सतत घटत असताना यंदाचा मान्सून कृषीक्षेत्रासाठी दिलासा देणारा आहे पालघर जिल्हा हा कृषिप्रधान तालुका म्हणून ओळखला जातो. या जिल्ह्यातील ७० टक्के जनतेचा भातशेती हा मुख्य व्यवसाय आहे. जिल्ह्यातील एकूण भौगोलिक क्षेत्रापैकी ( ४ लाख ७० हजार हे. ) सुमारे ३ लाख ६० हजार हे.जमीन लागवडीखाली आहे. त्यामध्ये भात व…

Read More

दीपक मोहिते, ” हल्लाबोल,” मी ज्या नालासोपारा मतदारसंघातून येतो …. एकेकाळी गौतम बुद्ध, सम्राट अशोक व शंकराचार्य यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या ऐतिहासिक शुर्पारक नगरीला आज अक्षरशः बकाल स्वरूप आले आहे. सरकार दरबारी केवळ प्रश्न उपस्थित करणे, सोशल मीडियावर रिल्स व्हायरल करणे आणि कॅमेऱ्यासमोर उभे राहून मगरीचे अश्रू ढाळण्याने लोकांची सहानुभूती मिळत नाही, तर लोक आपल्या दारातून हाकलून देतात.अवघ्या एका वर्षात आपल्यावर अशी वेळ का आली, याविषयी लोकप्रतिनिधीने आत्मपरीक्षण केले पाहिजे. नालासोपारावासीयांनी गेल्या वर्षी, अगोदरच्या सत्ताधाऱ्यांना बाजूला सारत नव्यांना संधी दिली. त्याबदल्यात त्यांच्या पदरात काय पडले,तर अतोनात त्रास, रोजचे मरण, अवहेलना व उपेक्षा होय… सोपारा हे एकेकाळी नावाजलेले बंदर होते, या…

Read More

दीपक मोहिते, रणसंग्राम, ठाणे जिल्हा मध्य.सह.बँक निवडणूक ; सहकार पॅनेलचे निर्विवाद वर्चस्व, बहुचर्चित ठाणे जिल्हा मध्य.सह.बँकेच्या निवडणुकीत शिंदे गटाच्या सहकार पॅनेलने २१ पैकी १६ जागा जिंकून बँकेवर झेंडा फडकवला. ही निवडणूक अत्यंत चुरशीची अशी झाली. निवडणुक होण्यापूर्वी शिंदे गटाचे आठ उमेदवार बिनविरोध निवडून आले होते. उर्वरित १३ जागासाठी काल मतदान पार पडले. आज या निवडणुकीची मतमोजणी पार पडली. पहिले दोन निकाल हे परिवर्तन पॅनलच्या बाजूने लागले. त्यांच्या पॅनेलचे अनिल गावड व ज्योती दिलीप पटेकर तर जिजाऊचे निलेश सांबरे हे विजयी झाले. त्यानंतर मात्र सहकार पॅनेलने मुसंडी मारत उर्वरित सर्व जागा जिंकल्या. या निवडणुकीचे विशेष म्हणजे बहुजन विकास आघाडीचे माजी नगरसेवक…

Read More

दीपक मोहिते, ” हल्लाबोल,” राजकारण्यांनी पत्रकारांची किंमत केली आहे, पत्रकारांना धमकावणे, त्यांच्याशी असभ्य भाषेत बोलणे, त्यांना मारहाण करणे व वेळप्रसंगी त्यांना जगातूनच नाहीसे करणे, असे प्रकार सध्या वाढीला लागले आहेत. चार दिवसांपूर्वी ईशान्य मुंबईचे खा. संजय दीना पाटील,यांनी पत्रकारांना जी काही वागणूक दिली ती राजकारणात गुंड प्रवृत्तीच्या लोकांची घुसखोरी झाली आहे, हेच अधोरेखीत करणारे आहे.” माझ्या *** बोट घालू नका,” असे धमकी देणारा हा आपला खासदार आहे,आणि आपण त्याला निवडून दिले आहे,याची खर तर ईशान्य मुंबईच्या मतदारांना नक्कीच लाज वाटली असावी. आज हे खासदार हात जोडून माफी मागत फिरत आहेत. मी चुकून बोललो, मला माफ करा, अशी आर्जवे करत फिरत…

Read More