दीपक मोहिते,
फ्रंटलाईन,
अखेर शांतता करार दृष्टिक्षेपात,
अमेरिका आणि इराण यांच्यातील शांतता कराराचा अंतिम मसुदा तयार झाला आहे, पण अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या हेकेखोरपणामुळे उभय देशात होणाऱ्या सामंजस्य करारावर आता चर्चा अधून मधून खंडित होत असते.पण इराणच्या कडवट भूमिकेमुळे डोनाल्ड ट्रम्प यांचे विमान बरेचसे खाली आले आहे.त्यामुळे शांतता करार अंतिम टप्यात आल्याचे आंतरराष्ट्रीय माध्यमानी स्पष्ट केले आहे

इराणी माध्यमांच्या वृत्तानुसार, होर्मुझ सामुद्रधुनीतील नाकेबंदी हटवून भागात शांतात आणि स्थैर्य निर्माण, यासाठी ट्रम्प यांनी आता प्रशासनाला कराराची चर्चा अंतिम टप्याकडे नेण्याचे आदेश दिले आहेत. पाकिस्तानचे लष्करप्रमुख फिल्डमार्शल असीम मुनीर या प्रकरणी महत्वाची भूमिका पार पाडत आहेत.
होर्मुझ सामुद्रधुनीमधील वाहतूक ३० दिवसांत सुरळीत करण्यास इराण तयार झाला आहे. इराणने घेतलेल्या या सकारात्मक निर्णयामुळे हा तिढा लवकरात लवकर सुटेल, अशी आशा आहे.
अमेरिका-इराण शांतता करारातील मसुद्यातील समोर आलेल्या माहितीनुसार, करारात प्रामुख्याने आर्थिक आणि संरक्षण विषयक मुद्यांना हात घालण्यात आला आहे. मसुद्यानुसार, होर्मुझ सामुद्रधुनीतून व्यापारी वाहतूक ३० दिवसांत सुरळीत करण्यास इराणने सकारात्मकता दाखवली आहे. ओमानच्या मदतीने इराण या वाहतुकीचे नियोजन करणार आहे.दरम्यान, होर्मुझमधून अमेरिकी जहाजांना मात्र मज्जाव करण्यात येईल, यावर इराण अद्याप ठाम आहे,असे इराणी माध्यमांच्या वृत्तात नमूद करण्यात आले आहे.
युद्धाच्या सुरुवातीला ताठर भूमिका घेणारा अमेरिका आता नाकेबंदी हटवण्यास तयार झाला आहे.
अमेरिकेने देखील इराणच्या आजुबाजुच्या आखाती देशात असलेले लष्कर मागे घेण्यासही तयार झाला आहे. भविष्यात वाटाघाटी करण्यासाठी काही सैन्य मात्र लष्करी तळांवर राहील, अशी माहिती या मसुद्यातून स्पष्ट झाली आहे. अमेरिकेने सध्या होर्मुझ सामुद्रधुनीत जी नाकेबंदी केली आहे, ती हटवण्यास ट्रम्प राजी झाले आहेत. येत्या ६० दिवसांत अंतिम करार झाल्यास या मसुद्यास संयुक्त राष्ट्रात औपचारिक स्वरुप देण्याचे अमेरिकेने मान्य केले आहे.

