Author: दीपक मोहिते

दीपक मोहिते, सामाजिक भान, दुर्देवी घटनेचे मार्केटिंग नको…. विरार येथील नावाजलेल्या शिक्षण संस्थेच्या संकुलात दोन दिवसांपूर्वी जो काही गैरप्रकार झाला,त्यामधील दोषींवर कारवाई व्हायला हवी,त्याविषयी कोणाचेही दुमत असता कामा नये.समाजात जातीय तेढ निर्माण करणाऱ्या या अपप्रवृत्तीना ठेचायलाच हवे.त्यादृष्टीने पोलीस यंत्रणा सध्या सक्रिय झाली आहे.मात्र या घटनेचे मार्केटिंग होता कामा नये.पण दुर्देवाने तसे होताना पाहायला मिळत आहे.गेली अनेक दशके विविध जाती – धर्माचे लोक गुण्यागोविंदाने राहत असलेल्या ऐतिहासिक नगरीमध्ये अशाप्रकारचा किळसवाणा प्रकार घडावा, ही खऱ्या अर्थाने दुर्देवी बाब आहे,आणि त्याचा निषेध करावा,तेवढा थोडाच… पोलीस यंत्रणा,या संपूर्ण घटनेचा सखोल तपास करत आहे,आणि या घटनेतील दोषींना ते गजाआड करतील,याविषयी शंका घेण्याचे कारण नाही.मात्र या…

Read More

वाडा प्रतिनिधी, निशेत रस्त्यावर भलामोठा खड्डा पडल्यामुळे बससेवा बंद, तालुक्यातील कळंभे ग्रामपंचायत हद्दीत असलेल्या निशेत या पाड्याकडे जाण्यासाठी रस्ता तयार करण्यात आला आहे.मात्र या पावसाळ्यात या रस्त्यावर भला मोठा खड्डा पडल्यामुळे या मार्गावरील बससेवा बंद करण्यात आली आहे.त्यामुळे शाळेतील विद्यार्थांना चार ते कि.मी.चा पायी चालत जाऊन शाळा गाठावी लागत आहे. बांधकाम विभागाच्या गलथान कारभाराविरोधात ग्रामस्थ संताप व्यक्त करत आहेत. कळंभे ग्रामपंचायत हद्दीत निशेत,ठाकूर पाडा असून या पाड्यावर जाण्या येण्यासाठी बससेवा होती.येथील विद्यार्थी बसने शाळेत जात येत होते.मात्र या रस्त्यावर भलामोठा खड्डा पडल्याने बससेवा आता बंद झाली आहे.त्यामुळे येथील विद्यार्थांना कळंभे येथे शाळेत येण्यासाठी चार ते पाच किलोमीटर अंतर पायी चालत…

Read More

तलासरी प्रतिनिधी, २७ लाखाचा मुद्देमाल तलासरी पोलिसांनी केला हस्तगत, तलासरी पोलीस स्टेशन हद्दीत सावरोली येथील श्रीनाथ इंडस्ट्रियल इस्टेटमधील एका कंपनीच्या गोडाऊनच्या सुरक्षा रक्षकाने गोडाऊन चे शटर तोडून गाळ्यातील २७ लाख रु.किमतीचे मोटरपंप, वेगवेगळ्या प्रकारची केबल चोरून नेली होती.याप्रकरणी तलासरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. सावरोली गावातील या कंपनीने जोतिन ओंकार सिंग राहणार वापी,यास सुरक्षा रक्षक म्हणून कामावर ठेवले,त्याने अवघ्या दोन दिवसात कंपनीच्या गाळ्याचे शटर तोडून २७ लाख रु.चे मोटर पम्प तसेच केबल चोरून नेली.याप्रकरणी तलासरी पोलिसांनी तो तपास करून दोन दिवसांपूर्वी चोरीस गेलेला मुद्देमाल बाळगणारे परवेज आलम जाफर अली खान आणि अक्रम अली अन्वर अली रा. अंधेरी मुंबई…

Read More

दीपक मोहिते, ” हल्लाबोल,” शेतीच्या नुकसानी संदर्भात राज्य सरकार संवेदनशील नाही, राज्यात कृषी क्षेत्राचे झालेले नुकसान लक्षात घेऊन राज्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी ग्रामीण भागात सर्वत्र होत आहे.पण आपले मायबाप सरकार कालपर्यंत नियमात तशी तरतूद नसल्याचे तसेच आजवर कधीच ओला दुष्काळ जाहीर झाला नाही,असे सांगत टोलवाटोलवी करत होती.मात्र काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दुष्काळी टंचाईच्या काळात ज्या सवलती देण्यात येतात व उपाययोजना करण्यात येत असतात,त्या लागू करण्यात येणार असल्याचे जाहीर केले आहे.उशीरा का होईना,पण सरकारला शहाणपण सुचलं,असंच या सर्व घडामोडीवरून म्हणावे लागेल. गेल्या पंधरा दिवसात राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे सुमारे ६० लाख हे.जमिनीवरील शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे.ऑगस्ट महिन्यापर्यंत झालेल्या…

Read More

दीपक मोहिते, निवडणूक पर्व – प्रभाग क्र.२४, ख्रिस्ती व गुजराती मते निर्णायक ठरण्याची शक्यता… या प्रभागात ख्रिस्ती, गुजराती,दाक्षिणात्य व हिंदू मतदारांचा समावेश आहे.वसई रोड विभागात हा परिसर अत्यंत गजबजलेला तसेच दिवसभरात अठरा तास व्यस्त असणारा असा प्रभाग आहे.गेली अनेक वर्षे या प्रभागाची ओळख बहुजन विकास आघाडीचा बालेकिल्ला अशी आहे.तो भेदण्यासाठी यंदा भाजप जोरदार तयारी करत आहे. सर्व राजकीय पक्षाची भिस्त या प्रभागातील ख्रिस्ती व गुजराती मतदारांवर आहे.पूर्वी ख्रिस्ती समाज हा कायम भारतीय राष्ट्रीय काँग्रेसला झुकते माप देत आला,पण गेल्या काही वर्षात बहुजन विकास आघाडीने या मतपेटीवर डल्ला मारला व प्रत्येक निवडणूक मोठ्या फरकाने जिंकली.महानगरपालिका निवडणुकीत मात्र त्यांना भाजपच्या आव्हानाला सामोरे…

Read More

दीपक मोहिते, अर्नाळा येथे पाच नवीन बसेसचा लोकार्पण सोहळा संपन्न, अर्नाळा बस आगाराला देण्यात आलेल्या नव्या एस.टी.बसेस म्हणजे जनतेसाठी दिलासा असुन ग्रामीण भागातील जनतेच्या प्रवासाला नवे बळ मिळाले आहे,असे उदगार वसईच्या आ.स्नेहा दुबे पंडित यांनी या बसेसच्या शुभारंभ प्रसंगी काढले.यावेळी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे वसईकर प्रवाश्यांतर्फे आभार मानले. याप्रसंगी त्या आपल्या भाषणात पुढे म्हणाल्या,एस.टी.बस ही ग्रामीण महाराष्ट्राची जीवनवाहिनी असून सर्वसामान्य नागरिक या बसेसने रोज प्रवास करतात.त्यांचा प्रवास अधिक सुरक्षित,आरामदायी आणि सोयीचा व्हावा,यासाठी मी सातत्याने पाठपुरावा करत होते.त्याला यश आले व महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळातर्फे अर्नाळा बस आगारासाठी पाच नवीन एसटी बसेस उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. आज या पाचही…

Read More

दीपक मोहिते, वर्षानुवर्षे रखडलेली प्रलंबित विकासकामे जलदगतीने मार्गी लागणार – आ.स्नेहा दुबे पंडित, वसई विधानसभा मतदारसंघातील वर्षानुवर्षे प्रलंबित असलेली विकासकामे वेगाने मार्गी लागावी, यासाठी आ.स्नेहा दुबे पंडित यांनी काल पुन्हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली. वसईतील महत्वाचे रस्ते, उड्डाणपूल व रेल्वे ओव्हर ब्रिजच्या कामांना गती देण्यासाठी काल पुन्हा वर्षा या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारी निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली.वसई विरार शहर महानगरपालिका क्षेत्रातील मुख्य रस्त्यांचे काँक्रीटीकरण, उड्डाणपूल तसेच रेल्वे ओव्हर ब्रीजचे प्रस्ताव गेल्या काही वर्षांपासून प्रलंबित आहेत. वसईच्या आमदार म्हणून निवडून आल्यावर नागपूर येथे झालेल्या पहिल्याच हिवाळी अधिवेशनात आ.स्नेहा दुबे पंडित यांनी या प्रश्नावर शासनाचे…

Read More

दिपक मोहिते, धनदंडग्यांना रान मोकळे, वाढवणनंतर मुरबे पंचक्रोशीतील मच्छिमार समाज उध्वस्त होण्याच्या मार्गावर… पालघर जिल्ह्यात डहाणू – वाढवण येथे १ लाख कोटी रु.खर्चून उभारण्यात येत असलेल्या महाकाय वाढवण बंदरानंतर केंद्र सरकारला पालघर तालुक्यातील मुरबे येथे व्यापारी बंदर उभारण्याची गरज का भासली,हे आपल्याला जाणून घ्यावे लागणार आहे.पालघरवासीयांच्या उरावर हे दुसरे बंदर का उभारण्यात येत आहे ? याच्या मुळाशी जाऊन विचार करावा लागणार आहे.वाढवण बंदराप्रमाणे या बंदराला स्थानिक जनतेचा तीव्र विरोध असून स्थानिक भूमिपुत्र रस्त्यावर उतरण्याच्या तयारीत आहेत.पालघर तालुक्यातील मुरबे समुद्रकिनारी हे बारमाही बंदर उभारण्यात येणार आहे.या प्रकल्पाचा मसुदा पर्यावरण मूल्यांकन अहवाल नुकताच सादर करण्यात आला असून पर्यावरण विषयक परवानग्या प्राप्त करण्याचे…

Read More

दीपक मोहिते, ” हल्लाबोल,” शहरे जोडणाऱ्या रस्त्यासाठी भरीव आर्थिक निधी तर ग्रामीण भागातील रस्ते वाऱ्यावर… राज्य व केंद्र सरकार देशभरातील महत्वाची शहरे एकमेकांशी जोडण्यासाठी एकीकडे लाखो कोटीची उड्डाणे घेत असताना दुसरीकडे ग्रामीण भागातील अंतर्गत रस्त्यासाठी निधी नसल्याचे सांगत आहे.डहाणू – वाढवण येथील प्रस्तावित बंदरात उतरलेला माल वेगाने शहरी भागात पोहोचवण्यासाठी सरकारने पालघर-इगतपुरी – नाशिक जलदगती मार्ग प्रस्तावित केला आहे.त्यासाठी सरकारने आपली तिजोरी सताड उघडी ठेवली आहे.तर ग्रामीण भागातील रस्त्यासाठी आपला कटोरा ठणठण गोपाळ असल्याचे सांगत सुटले आहे. राज्याच्या ग्रामीण भागातील रस्त्याची सध्या पार दुरावस्था झाली असून निधी अभावी राज्याचा सार्वजनिक बांधकाम विभाग हतबल झाला आहे.मुंबईपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या पालघर जिल्ह्यातील…

Read More

दीपक मोहिते, निवडणूक पर्व – प्रभाग क्र.२३, प्रभागात अद्ययावत मार्केट व पार्किंगची व्यवस्था हवी, सर्वात कमी क्षेत्रफळ व लोकसंख्या असलेल्या या प्रभागात विविध जाती धर्माचे लोक गेल्या अनेक वर्षांपासून गुण्यगोविंदाने राहत आहेत.साधारणपणे हे लोक मध्यमवर्गीय गटातील लोक म्हणून ओळखले जातात.हा भाग विकसित असा असून काही किरकोळ अपवाद वगळता या प्रभागात राहणारे लोक सुखी व समाधानी आहेत.या प्रभागात गुजराती समाजाचे चांगले प्राबल्य आहे.हा समाज व्यापार उदिमामध्ये सक्रिय आहे. मुस्लिम समाजाचेही व्यापारी क्षेत्रात बऱ्यापैकी योगदान आहे.गेली अनेक वर्षे या प्रभागात बहुजन विकास आघाडीचे नगरसेवक निवडून येत आहेत.परंतु या निवडणुकीत त्यांच्यासमोर या जागा टिकवण्याचे आव्हान आहे.हे आव्हान ते कसे पेलतात,यावर,त्यांचे यश अवलंबून आहे.…

Read More