सचिन सावंत,वसई
विविध पक्षाच्या शेकडो कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये जाहीर प्रवेश,
वसई विधानसभा मतदारसंघातील विविध राजकीय पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी वसईच्या आ.स्नेहा दुबे पंडित यांच्या उपस्थितीमध्ये जाहीर पक्षप्रवेश केला.या सर्वांचे आ.स्नेहा दुबे पंडित यांनी स्वागत केले व पुढच्या राजकीय वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा दिल्या.
पक्षात प्रवेश करणाऱ्यांमध्ये शिवसेनेचे ( उबाठा ) जिल्हा सरचिटणीस ऍड.कुणाल कांदे,उपविभागप्रमुख निखिल हाटे,शाखाप्रमुख जयेश सोळंकी,सलमान साठे,फैझल काझी,शहराध्यक्ष ऍड. योगेश जाधव,ऍड.निलेश शिर्के,यतीन चोरघे,कौस्तुभ राऊत,विरल राजाणी,अकसना शेख,आकाश बोराणा, रोहित मालवणकर,सूरज माझी,जुबेर पठाण व ७० ते ८० कार्यकर्त्यांचा समावेश होता.याप्रसंगी भाजपचे पदाधिकारी संख्येने उपस्थित होते.

