- Home
- Uncategorized
- आंदोलन
- कृषी
- गुन्हेगारी
- चालू घडामोडी
- जागतिकीकरण
- राजकारण
- शैक्षणिक
- संपादकीय
- क्रीडा
- निवडणूक
- मनोरंजन
- विदेश
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
- मान्सून राज्याच्या उंबरठ्यावर : खरीप हंगामाला सुगीचे दिवस येणार….
- ग्रामीण भागात रस्तेबांधणीच्या कामाला प्राधान्य देण्याची गरज,
- भारतीय संविधानाचे देशाच्या विकासामध्ये मोठे योगदान,
- मनरेगा कामातील बजबजपुरीमुळे आदिवासी स्थिरावतोय अन्य क्षेत्रात,
- प्रादेशिक अस्मितेत लक्षणीय वाढ ; राष्ट्रीय एकात्मकतेला हानिकारक….
- अमेरिकेची दादागिरी अखेर इराणने संपवली,
- ममता बॅनर्जीचा राजीनामा देण्यास नकार, कलम ३५६ चा वापर होण्याची शक्यता,
- कितीही प्रयत्न करा, पण आता परिस्थिती हाताबाहेर गेली आहे,
Author: दीपक मोहिते
दीपक मोहिते, निवडणूक रणसंग्राम, निवडणुकीचा ज्वर हळूहळू वाढतोय… फोडाफोडीच्या राजकारणाच्या पार्श्वभूमीवर आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पालघर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. एक दिवसाच्या या दौऱ्यात त्यांच्या चार जाहीर सभा होत आहेत.या सभेत ते आपल्या भाषणात काय बोलतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.भाजपच्या फोडाफोडीच्या राजकारणावरून महायुतीमध्ये सध्या धमासन सुरू झाले आहे.त्यास पालघर जिल्हाही अपवाद राहिला नाही.जिल्ह्यात भाजप व शिंदे गटामध्ये सख्य उरलेले नाही. शिंदे गटाच्या अनेक राजकीय नेत्यांना आपल्या जाळ्यात ओढण्याचे भाजपकडून जोरदार प्रयत्न होत आहेत.त्यामुळे महायुतीचे घटक व विरोधी पक्षात चिंतेचे वातावरण पसरले आहे.गेल्या आठवड्यात राष्ट्रवादीच्या एका नेत्याने सुमारे तीन हजार समर्थकांसह भाजपमध्ये प्रवेश केला.परंतु त्यांच्या प्रवेशाला काही कारणामुळे स्थगिती देण्यात…
दीपक मोहिते, निवडणूक रणसंग्राम, जव्हारकरांची पहिली पसंती कोणाला ? जव्हार तालुका हा आता विकासाच्या वाटेवर आहे,पण विकासाला अपेक्षेनुसार गती मिळालेले नाही. तालुक्याच्या ग्रामीण भागातील स्थानिक नागरिकांचे जीवन अद्याप , ” जैसे थे,” स्थितीतच आहे.रोजगाराच्या संधी उपलब्ध नसल्यामुळे त्यांचे दरडोई उत्पन्न वाढू शकले नाही.हा तालुका निसर्गरम्य तालुका म्हणून ओळखला जातो,पण सरकारने पर्यटन दर्जा देऊन पर्यटनावर आधारित व्यवसाय निर्माण केले नाहीत.त्यामुळे आजही ग्रामीण भागात अठरापगड दारिद्र असून स्थानिक भूमिपुत्र हलाखीचे जीवन जगताहेत.सुमारे १०७ वर्षांपूर्वी सरकारने शहरात नगरपरिषद स्थापन केली.पण तुटपुंज्या आर्थिक उत्पन्नामुळे भरीव विकासकामे होऊ शकली नाहीत.त्याचे दुष्परिणाम स्थानिकांना आजही भोगावे लागत आहेत. पर्यटन वाढीला सरकारने सर्वोच्च प्राधान्य दिले असते तर हा…
दीपक मोहिते, निवडणूक रणसंग्राम, कालचे मित्र,आज प्रतिस्पर्धीच्या भूमिकेत, पालघर नगरपरिषदेच्या निवडणुकीचा प्रचार आतापासून सुरु झाला आहे. ज्यांना उमेदवारी मिळण्याची खात्री आहे, त्यांनी मतदारांना भेटण्यास सुरुवात केली आहे. दुसरीकडे मतदार मात्र या निवडणुकीसंदर्भात फारसा उत्सुक नसल्याचे दिसून येत आहे.एकेकाळी गळ्यात गळा घालून फिरणारे व एकमेकांच्या सुख दुःखात सहभागी होणारे जिवलग मित्र,या निवडणुकीत एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. नगरसेवकांच्या अनगोंदी व भ्रष्ट कारभाराने सतत प्रकाशझोतात असलेली पालघर नगरपरिषदेची सार्वत्रिक निवडणूक अवघ्या पंधरा दिवसांवर आली आहे. त्यामुळे राजकीय पक्षांच्या हालचालींना चांगलाच वेग आला आहे.भाजप व शिंदे गट ही निवडणुक स्वबळावर लढवण्याच्या तयारीत आहेत.या दोन्ही पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी अद्याप युती करण्याबाबत निर्णय न घेतल्यामुळे दोन्ही…
दीपक मोहिते, विरार – मरीन ड्राइव्ह दरम्यान सी – लिंकच्या कामाला हिरवा कंदील, वसई विरारकरांना लवकरच दिलासा मिळणार आहे.सध्या मुंबईला जाण्यासाठी नागरिकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत असतो,आता तो त्रास कमी होणार असुन त्यांना अवघ्या पाऊण तासात मुंबई गाठता येणार आहे.राज्यसरकारने मुंबई महानगर क्षेत्रातील वाहतूक कोंडीवर तोडगा काढला आहे.उत्तन वसई विरार सी – लिंक या प्रकल्पाला नुकतीच मंजुरी देण्यात आली आहे.या प्रकल्पाला संबंधित विभागाच्या परवानग्या मिळाल्या असुन फक्त पर्यावरण विभागाची मंजुरी मिळाली नव्हती.मात्र,आता या विभागानेही परवानगी दिल्याने या प्रकल्पाचं काम लवकरच सुरु होणार आहे.या प्रकल्पामुळे पालघर, वसई-विरार आणि डहाणू भागातील नागरिकांना दिलासा मिळणार आहे. या प्रकल्पामुळे नागरिकांना विरारवरुन थेट मरीन…
दिपक मोहिते ” हल्लाबोल, ” नवा जव्हार जिल्हा निर्माण करताना सरकारने सारासार विचार करावा, पालघर जिल्हा,हा देशातील ३६ व्या क्रमांकाचा जिल्हा आहे.दहा वर्षांपूर्वी देशातील सर्वात मोठ्या जिल्ह्याचे विभाजन करून १ ऑगस्ट २०१४ रोजी नवीन आदिवासी जिल्हा निर्माण करण्यात आला.नागरी परिसराचा विचार न करता तत्कालीन राज्य सरकारने सागरी व डोंगरी,असा जिल्हा निर्माण केला.वास्तविक जिल्ह्याचे विभाजन करताना तत्कालीन पृथ्वीराज चव्हाण यांनी भौगोलिक परिस्थितीचा सारासार विचार करून नागरी, सागरी व डोंगरी असे त्रिभाजन करायला हवे होते. या जिल्ह्याचे प्रचंड क्षेत्रफळ व विकासाची मंदावलेली गती पाहून सरकारला आता पुन्हा जिल्ह्याचे पुन्हा विभाजन करण्याची उपरती झाली आहे. २०१४ साली चव्हाण सरकारने जिल्हावासि्यांचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर…
दीपक मोहिते, आम्ही मतदान का म्हणून करावे ? राज्य व केंद्रात सध्या जे काही चाललंय,आयाराम गयारामांचा उच्छाद लक्षात घेता,आम्ही मतदारांनी का म्हणून मतदान करावे ? असा प्रश्न सर्वसामान्य माणसाला पडला आहे.आजच्या घडीला कोण कूठे आहे ? याचा थांगपत्ताच लागत नाही.ज्या उमेदवाराला आपण मत दिले,तो उद्या कुठे असेल ? याचा भरवसा नाही. या सर्व घडामोडीमध्ये पराभव कोणाचा होत असेल तर तो मतदारांचा होत असतो.विचारसरणी व सामाजिक बांधिलकी ही केंव्हाच सरणावर गेली आहे.कोण खरं आणि कोण खोटं ? या वादाशी मतदारांना कोणतेही देणे-घेणे नाही.पण गेल्या दशकभरात त्यांच्या मताचा अनादर केला गेला,हे मात्र सुर्यप्रकाशा इतके स्वच्छ आहे.त्यामुळे आपली लोकशाही प्रगल्भ आहे,असे बोलणे चुकीचे…
दीपक मोहिते, ” हल्लाबोल, ” देशाची वाटचाल सध्या आर्थिक संकटातून होत आहे…. देशात आज सर्वत्र अनिश्चिततेचे वातावरण निर्माण झाले आहे.सर्वसामान्य नागरिक भांबावलेला स्थितीत सापडलेला आहे.बिकट आर्थिक स्थितीत सापडलेल्या आपल्या देशाला या स्थितीतून बाहेर पडण्यास प्रदीर्घ कालावधी लागणार आहे.कोणत्याही परिस्थितीत सत्ता राखणे,असा एकमेव उद्देश डोळ्यासमोर ठेवून मोदी सरकार वाटचाल करत आहे.आजच्या घडीला त्यांच्या सरकारचे आर्थिक व परराष्ट्र धोरण दिशाहीन होऊन हेलकावे खाऊ लागले आहे. काही मूठभर उद्योगपतीना केंद्र सरकारकडून दिले जाणारे झुकते माप,आपल्या अर्थव्यस्थेच्या गळ्याला नख लावणारे आहे.काँग्रेस सरकारच्या कारकिर्दीत जीएसटीला विरोध करणारा भाजप आपले सरकार सत्तेत आल्यानंतर आपल्या नागरिकांवर भरमसाठ जीएसटी लादतो, याला काय म्हणावे ? मात्र दोन महिन्यापूर्वी याच…
मीरा भाईंदरमध्ये जनता दरबाराचे आयोजन, दीपक मोहिते, मीरा – भाईंदर शहरात भाजप आ.नरेंद्र मेहता यांच्यातर्फे पालकमंत्री गणेश नाईक यांच्या उपस्थितीत शहरातील लोकांच्या तक्रारींचे निवारण करण्याच्या उद्देशाने काल सकाळी ११.०० च्या सुमारास अप्पासाहेब धर्माधिकारी सभागृहात जनता दरबारचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमास आमदार,मीरा भाईंदर महानगर पालिका आयुक्त,पोलीस,तलाठी,वन व इतर विभागाचे अधिकारी उपस्थित होते.तसेच मीरा – भाईंदर शहरातील नागरिक☝️ मोठ्या संख्येने उपस्थित होते.जनता दरबारमध्ये उपस्थित नगरिकांनी गणेश नाईक यांचे आपल्या तक्रारीकडे लक्ष वेधले, पालकमंत्र्यांनी त्याची तात्काळ दखल घेतली व त्याचे निवारण केले.त्यामुळे नागरिकांना दिलासा मिळाला आहे. मीरा – भाईंदर शहरात यापूर्वी देखील जनता दरबार आयोजित करण्यात आले होते,त्यामुळे शहरातील लोकांना जनता…
दीपक मोहिते, कार्यकर्त्यांचा उत्साह वाढवणारा विजय,तर राज्यातील विरोधकांना नेस्तानबूत करणारा विजय… बिहार राज्यात भाजप व जेडीयुने मिळवलेला विजय हा अपेक्षितच होता,पण तो इतका जबरदस्त असेल,असे कोणालाही वाटले नव्हते.ज्या पद्धतीने जनसुराज,काँग्रेस व राजदने भाजप व जेडीयु समोर आव्हान उभे केले होते,ते पाहता नितीशकुमार व अमित शहा या दोघांची चांगलीच दमछाक होईल,असे वाटले होते.पण फासे उलटे पडले व ही लढत एकतर्फी झाली.या निवडणुकीतील निकालानंतर भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या मर्यादा स्पष्ट झाल्या आहेत.या निकालानंतर केंद्रीय निवडणूक आयोगावर विरोधकांनी टीकेची झोड उठवली असून भाजप व जेडीयु यांना मिळालेल्या या विजयात आयोगाचे मोठे योगदान असल्याचे सर्वांचे म्हणणे आहे. या निवडणुकीत भाजपने १०१…
दीपक मोहिते, निवडणूक विश्लेषण ( बिहार ) बिहारमध्ये भाजप – जेडीयूचा डंका वाजला,आरजेडी – काँग्रेसचा सुपडा साफ, अपेक्षेप्रमाणे बिहार राज्यातील निवडणुकीचा निकाल लागला आहे.या निवडणुकीत भारतीय राष्ट्रीय काँग्रेस व प्रशांत किशोर यांच्या जनसुराज पक्षांचा सुपडा साफ झाला आहे.या निवडणुकीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीला १९५ जागा मिळाल्या असून त्यामध्ये भाजप – ८९,जेडीयू – ७९, लोकजनशक्ती पक्षाला २१,जागा जिंकता आल्या.तर इतर ०७ जण निवडून आले आहेत.येथे महागठबंधनला ४१ जागा जिंकता आल्या.त्यामध्ये आरजेडी – ३२,भारतीय राष्ट्रीय काँग्रेस – ०४,विआयपी – ०,सिपीआय – ०,मार्क्स.कम्यु.- ०,सिपीआय ( मार्क्सवादी व लेनिनवादी ) – ०५,या निवडणुकीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीला ५३ % तर महागठबंधनला ३५ % तर अपक्षाना १२…
