Author: दीपक मोहिते

दिपक मोहिते, ” हल्लाबोल,” बिहारचा निकाल रालोआच्या विरोधात गेल्यास राज्यातील स्था.स्व.संस्थांच्या निवडणुका लांबणीवर पडतील.. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका,या डिसें. महिन्यात पार पाडण्याचा केंद्रीय निवडणूक आयोगाचा प्रयत्न आहे,त्यादृष्टीने आयोग कामाला लागला आहे.या निवडणूक होण्याअगोदर बहुचर्चित बिहार राज्याच्या निवडणुका होणार आहेत.या निवडणूक ६ व ११ नोव्हे.रोजी होत आहेत.त्याची मतमोजणी १४ नोव्हे.रोजी होणार आहे.बिहारच्या या निवडणुका अत्यंत चुरशीच्या होत असून या निवडणुकीचे निकाल दूरगामी परिणाम करणारे असतील,त्यामुळे केंद्र सरकार काहीतरी खुसपट काढून आपल्या राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर टाकण्याचा प्रयत्न करेल,अशी शक्यता आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकीमध्ये शिवसेना ( उबाठा ) व मनसे यांचे मनोमिलन व अन्य विरोधी पक्षाची झालेली एकजूट,अशा…

Read More

दिपक मोहिते, एका होतकरू तरुणाचे अभूतपूर्व धाडस, आज दिपावलीच्या शुभमुहूर्तावर वसईतील एका होतकरू तरुणाचे समाज माध्यम क्षेत्रात पदार्पण होत आहे.त्याच्या या धाडसाचे कौतुक करावे तेवढे थोडेच…अलीकडच्या काळात माध्यम क्षेत्राला अवकळा आली असताना,या तरुणाने या फंदात का पडावे ? असा प्रश्न माझ्या मनात उपस्थित झाला व त्याला मी यासंदर्भात काही प्रश्न विचारले,त्यांनी जे काही उत्तर दिले,त्यामुळे मी आश्चर्यचकित झालो.तो म्हणाला,नव्याने सुरू होणारे माझे युट्युब चॅनेल हे कोणाचे बटीक म्हणून कधीही काम करणार नाही.माझे चॅनेल,हे सर्वसामान्यजनांच्या दैनंदिन जीवनात भेडसावणारे प्रश्न,समस्या व अडचणी,यावर प्रकाशझोत टाकण्यासाठी सक्रिय असेल.कोणाच्या सांगण्यावरून बदनामी करणे,किंवा विरोधात चालवणे,हे मला अभिप्रेत नाही.परिसर विकास,सर्वसामान्य लोकांच्या दैनंदिन जीवनातील प्रश्न व विश्वासार्हता,या अशा…

Read More

दीपक मोहिते, ” हल्लाबोल,” निवडणूक आयोगाची विश्वासार्हता व पारदर्शकता पार लयाला गेली, केंद्रीय निवडणूक आयोगाच्या आडमुठे धोरणाविरोधात देशातील तमाम विरोधी पक्ष सध्या एकवटले आहेत.गेल्या तीन वर्षात केंद्रीय निवडणूक आयोग हा अनेक प्रकरणी वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे.दुर्देवाने त्यांच्या या अशा वागण्याला सर्वोच्च न्यायालयाच्या काही लोकांनीही खतपाणी घातले.त्यामुळे त्यांचा आडमुठेपणा सतत वाढत चालला आहे. ईव्हीएम मशीन घोटाळा,एकनाथ शिंदे गटाच्या आमदारांचे निलंबन,मताच्या चोरीचे प्रकरण व यासंदर्भात विरोधी पक्षांनी सादर केलेले पुरावे,याविषयी केंद्रीय निवडणूक आयोगाच्या स्वायत्ततेच्या प्रश्नी निर्माण झालेली साशंकता,आदी कारणामुळे केंद्रीय निवडणूक आयोग चांगलाच अडचणीत आला आहे.केंद्रीय निवडणूक आयोग हा सत्ताधारी पक्षाचा बटीक झाला असल्याचा विरोधकांकडून सतत आरोप होत आहे.हे आरोप करताना भारतीय…

Read More

दीपक मोहिते, समर्थनचे डॉ.अशोक येंडे व प्रा. जयश्री येंडे लवकरच व्हिएतनामच्या दौऱ्यावर, हनोई,व्हिएतनाम येथे सायबर गुन्ह्यांवरील संयुक्त राष्ट्रसंघाच्या करारनाम्याच्या स्वाक्षरी समारंभासाठी विवेक पंडित यांच्या ” समर्थन,” संस्थेचे अध्यक्ष अ‍ॅड. ( डॉ. ) अशोक येंडे आणि प्रा. ( डॉ. ) जयश्री येंडे यांना आमंत्रण देण्यात आले आहे. सायबर गुन्ह्यांविरुद्धच्या जागतिक लढाईत अभिमानाची बाब ठरलेली ऐतिहासिक घटना,सायबर convention – अ‍ॅड. ( डॉ. ) अशोक येंडे आणि प्राचार्या ( डॉ. ) जयश्री येंडे यांना संयुक्त राष्ट्रसंघाच्या सायबर गुन्ह्यांवरील करारनाम्याच्या स्वाक्षरी समारंभासाठी आमंत्रित करण्यात आले आहे. हा ऐतिहासिक समारंभ २५ आणि २६ ऑक्टो.२०२५ रोजी हनोई ( व्हिएतनाम ) येथे पार पडणार आहे. अ‍ॅड. (…

Read More

दीपक मोहिते, दशक उलटल्यानंतरही पालघर जिल्हा कुपोषितच… दहा वर्षापुर्वी पालघर जिल्हा नव्याने अस्तित्वात आला.जिल्हा यंत्रणेची गाडी काही अंशी रुळावर आली असली तरी जिल्ह्याने अद्याप बाळसं धरलेले नाही.यंत्रणा पूर्ण क्षमतेने आजही कार्यान्वित झालेली नाही. राज्यातील महायुतीच्या सरकारचे हे फार मोठे अपयश आहे.या जिल्ह्याला आदिवासी दर्जा देण्यात आल्यामुळे केंद्र व राज्य सरकारकडून जिल्ह्याला निधीची कमतरता नाही.पण राज्यकर्ते पक्षाच्या प्रसिद्धीसाठी जी वारेमाप उधळपट्टी करत आहेत, त्यामुळे आज पाणी,आरोग्य, शिक्षण व वैद्यकीय सेवा क्षेत्रात भरीव विकासकामे होऊ शकली नाहीत.दहा वर्षाचा कालावधी हा कमी नाही.या काळात प्रलंबित विकासकामे मार्गी लागण्याची गरज होती. आज जिल्ह्यातील शेतकरी,आदिवासी व स्थानिक भूमिपुत्र विविध समस्यांनी त्रस्त आहेत.रस्ते,पाणी,दर्जेदार आरोग्य व वैद्यकीय…

Read More

दीपक मोहिते, वेळीच सावध व्हा,अन्यथा मानवजातीचा विनाश अटळ, राज्यात यंदा पाऊस मुबलक प्रमाणात झाला असून पिण्याचे,शेतीसिंचन व उद्योग क्षेत्राला आवश्यक असणारे पाणी,किमान ७ महिने पुरेल इतका जलसाठा राज्यात उपलब्ध झाला आहे.काही ठराविक जिल्ह्यात ” नेमेची येतो पावसाळा,” या म्हणीनुसार यंदा ओला दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे.आपले सारे जीवन हे पावसाळी पाणी व भूगर्भातील जलसाठा,यावर अवलंबून आहे.पावसाचे प्रमाण सतत कमी होणे व भूगर्भातील पाण्याची पातळीमध्ये सतत होणारी घसरण,इ.कारणांमुळे जगभरातील अनेक देश सध्या चिंतेत सापडले आहेत.येणाऱ्या काळात पाण्याचा प्रश्न अक्राळ विक्राळ रूप धारण करेल व परिस्थिती नियंत्रणाच्या बाहेर जाईल.आज देशभरातील अनेक देश पाणीटंचाईत होरपळत आहेत.आफ्रिका खंडातील काही देश पाण्यावाचून तडफडत आहेत.वाढती…

Read More

दीपक मोहिते, ” हल्लाबोल,” राज्यात सौहार्दाचे वातावरण बिघडत चालले आहे, राज्यात आरक्षणाच्या प्रश्नावरून ओबीसी व मराठा,या दोन समाजात जे काही रणकंदन माजले आहे,त्यास शरद पवार व देवेंद्र फडणवीस या दोघांचे गलिच्छ राजकारण कारणीभूत ठरले आहे.राज्यातील या दोन प्रमुख समाजाला एकमेकाविरोधात उभे करण्याचे पाप या दोघांनी केले आहे.त्यामुळे एरव्ही शांत असलेले हे दोन्ही समाज आता एकमेकांच्या उरावर बसू लागले आहेत.समाज विस्कळीत करण्याचे पाप या दोघांकडून झाल्याचे अनेक पुरावे हाती आले आहेत. १९९४ साली राज्याच्या मुख्यमंत्रीपदी असलेल्या शरद पवार यांनी काढलेल्या एका जीआर मुळे मराठा समाज आरक्षणापासून वंचित राहिला.त्यावेळी शरद पवार यांनी मराठा आरक्षण कायद्याने शक्य नाही,असे वारंवार सांगत असत,आज तेच पवार,आरक्षण…

Read More

दीपक मोहिते, ” हल्लाबोल,” कोविड १९ पेक्षा ” इनकमिंग,” या व्हायरसचा वेगाने फैलाव, स्थानिक स्वराज्य संस्थाच्या आगामी निवडणुकीच्या तोंडावर ” इनकमिंग,” या व्हायरसचा फैलाव मोठ्या वेगाने सुरू झाला आहे.जिल्ह्यात दररोज कुठे ना कुठे तरी या व्हायरसने बाधित झालेले रुग्ण आढळत आहेत.हा व्हायरस,कोविड १९ च्या व्हायरसपेक्षा अत्यंत धोकादायक असून तो तुमच्या मुलाबाळांचे भवितव्य उध्वस्त करणारा आहे.दिवसागणिक पसरत चाललेल्या व्हायरसला रोखणारी लस देखील भविष्यात सापडू शकणार नाही.कोविड १९ चा आपण नायनाट करू शकलो,पण हा व्हायरस संपूर्ण तरुण पिढीला गिळंकृत करणारा आहे.हा व्हायरस हा तुमच्या सदसदविवेकबुद्धीवर हल्ले करतो.तुमची विचारसरणी कुंठित करतो,त्यामुळे हा व्हायरस,कोविड १९ पेक्षा अत्यंत घातक असा आहे. असो,गेल्या काही दिवसांपासून सर्वच…

Read More

दिपक मोहिते, ” हल्लाबोल,” वर्ष उलटूनही परिस्थितीत कोणताही बदल नाही ; ” ये रे माझ्या मागल्या,” सुरूच, लोकसभा निवडणुका होऊन आता सव्वा वर्ष तर विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून वर्षाचा कालावधी पूर्ण होत आला आहे.लोकसभा निवडणुकीचा निकाल ४ जून २०२४ तर महाराष्ट्र विधानसभा निवडणुका २४ नोव्हे.२०२४ रोजी लागला.या वर्षभराच्या काळात लोकांच्या आशा – अपेक्षा पूर्ण होऊ शकल्या का ? त्यांच्या दैनंदिन जीवनात भेडसावणारे प्रश्न मार्गी लागले का ? त्यांना दिलासा मिळाला का ? या तिन्ही प्रश्नाचे उत्तर नकारार्थीच मिळते.नव्याने निवडून आलेले खासदार व आमदार यांचे सध्या केवळ इव्हेंटस सुरू आहेत. डहाणूचे आ.कॉ.विनोद निकोले व विक्रमगडचे हरिश्चंद्र भोये हे दोन आमदार वगळता…

Read More

वाडा प्रतिनिधी, वाड्यातील नागरिकांची स्वदेशी पणत्यांना पहिली पसंती दिवाळी हा सण गेल्या सोम.पासून सुरु झाला आहे.दिवाळीच्या सणात पणत्यांना अनन्यसाधारण महत्त्व असून दिवाळी हा सण प्रकाशाचा व तेजाचा सण समजला जातो. प्रथा-परंपरेनुसार वसूबारस ते भाऊबीजेपर्य॔त दिवाळी सण साजरा होत असतो.या दरम्यान प्रत्येक घरात पणत्या लावून आवर्जून रोषणाई केली जाते.दिवाळी सणानिमित्ताने कुडूस बाजारपेठेत पणत्या मोठ्या प्रमाणात विक्रीसाठी आल्या असून नागरिकांनी खरेदी करत असतांना स्वदेशी पणत्यांनाच पसंती दिली आहे. सध्याच्या युगात वीजेवर चालणारी इतकी साधने असतांनाही दिवाळीत आपण पणत्या आवर्जून लावत असतो.कारण विजेच्या दिव्यात आपल्या तेजाने दुस-या दिव्याला प्रकाशित करण्याची शक्ती नाही.जी सामान्य पणतीच्या ज्योतीत आहे.एका पणतीची ज्योत हव्या तितक्या इतर पणत्यांना प्रकाशित…

Read More