- Home
- Uncategorized
- आंदोलन
- कृषी
- गुन्हेगारी
- चालू घडामोडी
- जागतिकीकरण
- राजकारण
- शैक्षणिक
- संपादकीय
- क्रीडा
- निवडणूक
- मनोरंजन
- विदेश
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
- बविआचा प्रभाग रचनेचा ठराव शासनाकडून रद्द,
- महिला बचत गटाच्या उत्पादानाची विक्रमी विक्री,
- राज्यातील अंगणवाड्याची अवस्था अत्यंत दयनीय,
- … तर एकनाथ शिंदे यांना दुसरा उमेदवार शोधावा लागणार,
- झाडांची कत्तल ; राज्य सरकार अस्मानी संकटाला आमंत्रण देतेय…
- राज्य कर्जाच्या खाईत आखंड बुडाले आहे…
- शेतकरी कंगाल तर विमा कंपन्या मालामाल…
- नालासोपाऱ्याचा बकालपणा कायम, विद्यमान आमदार निष्क्रिय,
Author: दीपक मोहिते
दीपक मोहिते, ” स्पॉटलाईट,” दसरा मेळावे आता केवळ सोपस्कार ठरले आहेत… काल विजयादशमीच्या मुहूर्तावर शिवसेना ( उबाठा ) व शिवसेना ( शिंदे ) या दोघांचे सालाबादप्रमाणे दसरा मेळावे पार पडले. या दोन्ही मेळाव्यात शिवसैनिकांना आपले दोन्ही नेते नेहमीप्रमाणे एकमेकांवर चिखलफेक करताना पाहायला मिळाले. गेल्या सहा वर्षांपासून हे असंच सुरु आहे. त्यामुळे हल्ली होणाऱ्या दसरा मेळाव्याचा नेमका उद्देश काय ? असा प्रश्न साहजिकच तुमच्या आमच्या मनात उभा राहतो. काल शिवाजी पार्क येथे पार पडलेल्या शिवसेनेच्या ( उबाठा ) मेळाव्यात उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणात ” नेमेची येतो पावसाळा,” या युक्तीनुसार शिंदे व शहा यांना लक्ष केले. आपल्या भाषणात रिजीम चेंज का…
दीपक मोहिते, नेहासिंह राठोर, बदनामी करणाऱ्या वृत्तवाहिनीच्या विरोधात कायदेशीर लढाई लढणार, प्रसिद्ध भोजपुरी लोकगायिका नेहा सिंह राठौर सध्या प्रामुख्याने दोन प्रकरणे आणि वादांमुळे सध्या चर्चेत आहेत. ऑक्टो. २०२६ मध्ये, एबीपी न्यूज या वृत्तवाहिनीच्या डिजिटल प्लॅटफॉर्मवर एक बातमी दाखवण्यात आली होती. त्यामध्ये नेहा सिंह राठौर यांच्याशी संबंधित एका हॉस्टेलवर पोलिसांनी छापा टाकून ‘सेक्स रॅकेट,’ चा पर्दाफाश केल्याचा खोटा दावा करण्यात आला होता. नेहा सिंह राठौर यांनी या बातमीचा तीव्र निषेध केला. त्यांनी आरोप केला की, सरकारला प्रश्न विचारते म्हणून त्यांचे चारित्र्यहनन आणि बदनाम करण्याचा हा जाणीवपूर्वक प्रयत्न आहे. वाद वाढल्यानंतर ‘ एबीपी न्यूज,’ने आपली चूक मान्य करत जाहीर माफी मागितली. तसेच…
दीपक मोहिते, ” हल्लाबोल, ” ५ हजार रु.त दिवाळी साजरी करून दाखवा… दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांचे देवाभाऊच्या सरकारला आव्हान, ” देवाभाऊच्या सरकारचे डोके ठिकाणावर आहे का ? ” असा सवाल सध्या ग्रामीण भागातील दुष्काळग्रस्त शेतकरी विचारत आहेत. या सरकारने दिवाळीपूर्वी प्रत्येक शेतकऱ्याच्या बँक खात्यात ५ हजार रु. जमा करण्याचा निर्णय घेतला आहे. ही रक्कम तात्पुरती मदत म्हणून देत असल्याचे सरकारचे म्हणणे आहे. केंद्र सरकारची पूर्ण मदत व पंचनाम्यासाठी वेळ लागणार असल्यामुळे हा तात्पुरता निर्णय घेण्यात आल्याचे सरकारतर्फे सांगण्यात येत आहे. दुष्काळी तालुक्यातील सुमारे सव्वा कोटी शेतकऱ्यांसाठी ६ हजार कोटी रु. लागणार आहेत. तसेच पंचनाम्याची कामे देखील धिम्यागतीने होत असल्यामुळे सरकारकडून तातडीने हे…
दीपक मोहिते, मोदी सरकारने दडपशाहीचा अवलंब न करता विद्यार्थ्याशी संवाद साधावा, भारतासह जगातील अनेक देशात सर्वत्र हिंसक आंदोलने सुरु झाली आहेत.या देशातील नागरिक आपल्या सरकार विरोधात रस्त्यावर उतरले असून अनेक शहरात लोकांनी जाळपोळीचे सत्र आरंभले आहे. महागाई, बेरोजगारी व शिक्षण व्यवस्थेतील सावळागोंधळ व अन्य काही कारणे, या घटनाच्या मागे आहेत.फ्रान्समध्ये जे काही चालले आहे, त्यामागे इस्लामिक कट्टरवादी असून काल त्यांनी देशातील १४३ वर्षे जुना ऐतिहासिक टाउनहाल बेचीराख केला.आज हा देश आगीत होरपळत आहे.या आंदोलनात सुमारे १० लाख लोक रस्त्यावर उतरले आहेत. त्यानंतर आता ब्राझील,अल्बनिया, स्पेन, अर्जेंटीना,बेल्जीएम व इटली या देशातही आंदोलनाचा भडका उडाला आहे. आपल्या देशातही विविध शहरात विद्यार्थ्यांनी सरकार…
दीपक मोहिते, ” हल्लाबोल,” बविआ मधून भाजपमध्ये गेलेल्या गयारामांची अवस्था ” सांगता येत नाही,आणि सहनही होत नाही,” अशी झाली आहे, विधानसभा निवडणुकीत वसई, नालासोपारा व विरार या तीन मतदारसंघात पराभव झाल्यानंतर बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यामध्ये चलबिचल निर्माण झाली होती. त्यानंतर पक्ष सोडून जाणाऱ्या गयारामाच्या संख्येत वाढ होत गेली. आपल्याला बविआकडून उमेदवारी मिळणार नाही, तसेच भाजपच्या वादळासमोर बविआचा टिकाव लागणार नाही, असे गृहीत धरून अनेकानी महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर भाजपचा तंबू गाठला. त्यापैकी आठ ते दहा जणांना भाजपकडून उमेदवारी देखील मिळाली.त्यापैकी केवळ चार ते पाच जणांना निवडणूक जिंकता आली. गेल्या सहा महिन्यात या गयारामाची भाजपमध्ये आजच्या घडीला काय स्थिती आहे ? हे…
दीपक मोहिते, ” फ्रंटलाईन,” देवाभाऊंना केवळ चिंता आहे, ” पुन्हा पुन्हा परत येण्याची,” मुंबई व ठाणे ही दोन शहरे आता सर्वसामान्य नागरिकांसाठी आता सुरक्षित राहिलेली नाही. काल अभिनेता टायगर श्रॉफवर झालेला हल्ला, हा देवा भाऊच्या गृहखात्याची लक्तरे वेशीला टांगणारी आहेत. १९८० ते १९९० च्या दरम्यान या मुंबई शहराने प्रचंड रक्तपात पाहिला. गुंडानी एकमेकांच्या टोळीचे अनेक गुंड किड्या मुंग्यासारखी मारली. अखेर तत्कालीन आयुक्त ज्यूलिओ रिबेरो यांनी एन्काउंटरचे अस्त्र उपसले व टोळीयुद्धाचा अस्त झाला. पोलिसांनी शहरातील टोळीयुद्ध संपुष्टात आणण्यासाठी अनेक गुंडाना टिपून मारले व मुंबई शांत झाली. पण आता या देवा भाऊच्या सरकारच्या काळात गुंडगिरी व दहशतीने पुन्हा डोके वर काढले आहे.…
दीपक मोहिते, ” हल्लाबोल,” जिल्हा प्रशासनाच्या निष्क्रियतेमुळे पाच तालुक्यातील शेतकरी फायद्यापासून वंचित, पंधरा दिवसापूर्वी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दुष्काळी भागाचा दौरा करून राज्यातील सुमारे २६५ तालुके दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर केले. त्यामध्ये पालघर जिल्ह्यातील जव्हार, मोखाडा व तलासरी, या तीन तालुक्याचाही समावेश आहे. उर्वरित वसई, पालघर, डहाणू, वाडा व विक्रमगड हे पाच तालुके त्यातून वगळण्यात आले. त्यामुळे वसई वगळता इतर चार तालुक्यातील शेतकऱ्यांमध्ये सध्या नाराजीचे वातावरण पसरले आहे. दरम्यान जिल्ह्याचे पालकमंत्री गणेश नाईक हे मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान २.० च्या कार्यक्रमानिमित्त दौऱ्यावर आले होते. त्यांनी या पाच तालुक्यात भीषण परिस्थिती असल्याचे सांगून या तालुक्यातही दुष्काळ जाहीर करण्यासाठी प्रयत्न करणार…
दीपक मोहिते, ” घडलंय बिघडलंय, परतीच्या पावसानेही दगा दिला ; रब्बी हंगाम धोक्यात, गेल्या अनेक वर्षांपासून राज्यात पावसाचे प्रमाण उतरणीला लागले आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील शेतकरी कायम भितीच्या सावटाखाली असतात. अशी स्थिती असताना दरवर्षी ” परतीचा पाऊस,” मात्र दरवर्षी हमखास फटका देऊन जातो. यंदाही त्याची पुनरावृत्ती होईल, अशी भिती सर्वत्र व्यक्त करण्यात येत होती. पण घडलं भलतंच, परतीच्या पावसानेही ठेंगा दाखवला.त्यामुळे रब्बी हंगामातील पिकाच्या लागवडी रखडल्या आहेत. यंदा देशात नैऋत्य मान्सून १२.६ % कमी झाला. २०१५ नंतरचा सर्वात कमी आणि २००१ नंतरचा चौथा सर्वात कमी मान्सून ठरला आहे. त्यामुळे राज्याच्या २६५ तालुक्यात भीषण दुष्काळ पडला आहे. वास्तविक ” परतीचा पाऊस,”…
दिपक मोहिते, ” स्पॉटलाईट,” आर्थिक व धार्मिक अराजक निर्माण होणे,म्हणजे राज्याच्या विकासाची गती खुंटणे, गेल्या काही दिवसांपासून राज्यात जे काही घडत आहे, ते केवळ निंदनीय नाहीच तर लांच्छनास्पद असेच आहे.सुसंस्कृत व पुरोगामी महाराष्ट्र,अशी ओळख असलेल्या राज्यात माणुसकीला काळिमा फासणाऱ्या घटना वारंवार घडत आहेत.समाज विस्कळीत करण्याचे जाणीवपूर्वक प्रयत्न केले जात आहेत,पण सरकार कारवाई करण्याऐवजी उघड्या डोळ्याने पाहत आहे. पैश्याची जी उधळपट्टी होत आहे, त्यामुळे आपले राज्य आर्थिकदृष्ट्या डबघाईला आले आहे.यामागे कोणत्या शक्ती आहेत,यावर कठोर उपाययोजना न झाल्यास राज्याचे काही खरं नाही.ही स्थिती कायम राहिल्यास त्याचे दूरगामी परिणाम होतील व राज्यातील उद्योगधंद्याचे इतर राज्यात पलायन सुरू होईल.त्यामुळे सरकारने वेळीच कठोर पावले उचलायला…
दीपक मोहिते, ज्येष्ठ विधिज्ञ प्रशांत भूषण यांच्या एका वक्तव्याने देशभरात तीव्र पडसाद, मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचा राजीनामा घ्यावा आणि निवडणूक आयोगाने राबवलेली एसआयआर प्रक्रिया रद्द करावी, या मागणीसाठी कॉक्रोच जनता पार्टी, डाव्या संघट ना आणि विरोधकांचे देशभरात सध्या जोरदार आंदोलन सुरू आहे. आंदोलन रोखण्यासाठी सरकारने दिल्लीत मोठा फौजफाटा तैनात केला आहे. यानिमित्ताने १५ ऑक्टो. रोजी दिल्ली प्रेस क्लब येथे एक पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. त्या पत्रकार परिषदेमध्ये अभिजीत दिपके, नेहा बोरा, अभिनेते प्रकाश राज यांच्यासह ज्येष्ठ विधिज्ञ प्रशांत भूषण यांनी आपापल्या भूमिका मांडल्या. या पत्रकार परिषदेमध्ये प्रशांत भूषण यांनी हे आंदोलन ” सत्ता उलथवून,” लावण्यासाठी असल्याचे…
