दीपक मोहिते,
” फ्रंटलाईन,”
देवाभाऊंना केवळ चिंता आहे, ” पुन्हा पुन्हा परत येण्याची,”
मुंबई व ठाणे ही दोन शहरे आता सर्वसामान्य नागरिकांसाठी आता सुरक्षित राहिलेली नाही. काल अभिनेता टायगर श्रॉफवर झालेला हल्ला, हा देवा भाऊच्या गृहखात्याची लक्तरे वेशीला टांगणारी आहेत. १९८० ते १९९० च्या दरम्यान या मुंबई शहराने प्रचंड रक्तपात पाहिला. गुंडानी एकमेकांच्या टोळीचे अनेक गुंड किड्या मुंग्यासारखी मारली. अखेर तत्कालीन आयुक्त ज्यूलिओ रिबेरो यांनी एन्काउंटरचे अस्त्र उपसले व टोळीयुद्धाचा अस्त झाला. पोलिसांनी शहरातील टोळीयुद्ध संपुष्टात आणण्यासाठी अनेक गुंडाना टिपून मारले व मुंबई शांत झाली.
पण आता या देवा भाऊच्या सरकारच्या काळात गुंडगिरी व दहशतीने पुन्हा डोके वर काढले आहे. वांद्रे येथे झालेली बाबा सिद्दकी या आमदाराची हत्या, सलमान खानच्या घरावर झालेला गोळीबार,सिनेनिर्माता रोहित शेट्टी, आणि काल टायगर श्रॉफवर झालेला गोळीबार, अशा वारंवार घडणाऱ्या घटनामुळे देशाची आर्थिक राजधानी असे ओळखले जाणारे शहर पुन्हा गुन्हेगारी जगताचे मुख्य केंद्र होऊ पाहत आहे. देवाभाऊचे गृहखात्यावर वचक नाही, गृहखात्याचे पोलीस यंत्रणेवर नियंत्रण नाही व पोलिसांची गुंडाना भिती नाही, अशी विचित्र परिस्थिती या शहरात निर्माण झाली आहे. दिवसाढवळ्या होणाऱ्या हत्या, लूटमार, अपहरण, खंडणी वसुली व भुरट्या चोऱ्या यामध्ये गेल्या पाच वर्षात लक्षणीय वाढ झाली आहे. काल झालेल्या घटनेनंतर सिनेजगतावर भितीचे सावट आले आहे. अनेक अभिनेत्यांनी वाढत्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर मुंबई शहर सोडून अन्य राज्यात राहण्यास सुरुवात केली आहे. देवाभाऊ सरकारच्या काळात आपल्या जीविताचे रक्षण होऊ शकत नाही, हे स्पष्ट झाल्यानंतर अनेक अभिनेते हे शहर सोडण्याच्या तयारीत आहेत. कायदा व सुव्यवस्थेची स्थिती खालावत चालली असताना देवाभाऊ मात्र सत्तेच्या ” संगीत खुर्ची, ” खेळामध्ये रमले आहेत. त्यांना तुमच्या आमच्या जीवाची पर्वा नाही. त्यांना चिंता आहे, ” पुन्हा पुन्हा परत येण्याची,”

