दीपक मोहिते,
नेहासिंह राठोर, बदनामी करणाऱ्या वृत्तवाहिनीच्या विरोधात कायदेशीर लढाई लढणार,
प्रसिद्ध भोजपुरी लोकगायिका नेहा सिंह राठौर सध्या प्रामुख्याने दोन प्रकरणे आणि वादांमुळे सध्या चर्चेत आहेत.
ऑक्टो. २०२६ मध्ये, एबीपी न्यूज या वृत्तवाहिनीच्या डिजिटल प्लॅटफॉर्मवर एक बातमी दाखवण्यात आली होती. त्यामध्ये नेहा सिंह राठौर यांच्याशी संबंधित एका हॉस्टेलवर पोलिसांनी छापा टाकून ‘सेक्स रॅकेट,’ चा पर्दाफाश केल्याचा खोटा दावा करण्यात आला होता.
नेहा सिंह राठौर यांनी या बातमीचा तीव्र निषेध केला. त्यांनी आरोप केला की, सरकारला प्रश्न विचारते म्हणून त्यांचे चारित्र्यहनन आणि बदनाम करण्याचा हा जाणीवपूर्वक प्रयत्न आहे.
वाद वाढल्यानंतर ‘ एबीपी न्यूज,’ने आपली चूक मान्य करत जाहीर माफी मागितली. तसेच वाहिनीने त्यांच्या डिजिटल विभागातील ३ ज्येष्ठ कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले. मात्र, नेहा सिंह राठौर यांनी ही माफी स्विकारण्यास नकार दिला असून याविरोधात न्यायालयात कायदेशीर लढाई लढणार असल्याचे स्पष्ट केले आहे. राष्ट्रीय महिला आयोगाने देखील या प्रकरणाची दखल घेतली आहे. एप्रिल २०२५ मध्ये काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर नेहा सिंह राठौर यांनी सोशल मीडियावर काही पोस्ट केल्या होत्या. त्या पोस्टमध्ये त्यांनी भाजप सरकारवर ( पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह ) राष्ट्रीय शोकांतिकेचे राजकारण करून मते मिळवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप केला होता.
या वादग्रस्त विधानामुळे त्यांच्यावर लखनऊमधील हजरतगंज पोलीस ठाण्यात देशद्रोह,धार्मिक भावना भडकावणे आणि राष्ट्रीय एकात्मतेला बाधा आणणे या आरोपांखाली एफआयआर दाखल करण्यात आला होता .
अलाहाबाद उच्च न्यायालयाने त्यांची एफआयआर रद्द करण्याची याचिका फेटाळली होती. त्यानंतर जाने. २०२६ मध्ये सर्वोच्च न्यायालयाने त्यांना अटकेपासून अंतरिम संरक्षण दिले. नेहा सिंह राठौर यांचे म्हणणे आहे की, लोकशाहीत सरकारला प्रश्न विचारण्याचा त्यांना पूर्ण अधिकार आहे.
थोडक्यात सांगायचे तर, नेहा राठौर यांचे प्रकरण हे त्यांनी शासनाविरोधात घेतलेली राजकीय भूमिका, अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि त्यानंतर प्रसारमाध्यमांकडून झालेल्या कथित बदनामीच्या कायदेशीर लढाईभोवती फिरत आहे.
१७ ऑक्टो. रोजी या वृत्तवाहिनीच्या डिजिटल टीमने आपल्या प्लॅटफॉर्मवर ९ सेकंदाचा व्हिडियो पोस्ट केला होता.” नेहा सिंह राठोर यांच्या हॉस्टेलमध्ये सेक्स रॅकेट ? पोलिसांचा छापा, ” असा व्हिडियो होता. वास्तविक त्या व्हिडियोत जुन्या पोलीस छाप्याचे फुटेज वापरून नेहा हीचे नांव व फोटो जोडला होता.हा व्हिडीओ पाहताच नेहाने x वर पोस्ट टाकून विरोध केला. या वृत्तवाहिनीला मला बदनाम करायचं आहे. मी सरकारला प्रश्न विचारते म्हणून ते माझी इज्जत खराब करत आहेत. त्यांनी माफी जाहीर केली आहे, पण मी ती स्विकारली नाही आणि यांच्याविरोधात न्यायालयात कायदेशीर लढाई लढणार आहे.

