- Home
- Uncategorized
- आंदोलन
- कृषी
- गुन्हेगारी
- चालू घडामोडी
- जागतिकीकरण
- राजकारण
- शैक्षणिक
- संपादकीय
- क्रीडा
- निवडणूक
- मनोरंजन
- विदेश
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
- मान्सून राज्याच्या उंबरठ्यावर : खरीप हंगामाला सुगीचे दिवस येणार….
- ग्रामीण भागात रस्तेबांधणीच्या कामाला प्राधान्य देण्याची गरज,
- भारतीय संविधानाचे देशाच्या विकासामध्ये मोठे योगदान,
- मनरेगा कामातील बजबजपुरीमुळे आदिवासी स्थिरावतोय अन्य क्षेत्रात,
- प्रादेशिक अस्मितेत लक्षणीय वाढ ; राष्ट्रीय एकात्मकतेला हानिकारक….
- अमेरिकेची दादागिरी अखेर इराणने संपवली,
- ममता बॅनर्जीचा राजीनामा देण्यास नकार, कलम ३५६ चा वापर होण्याची शक्यता,
- कितीही प्रयत्न करा, पण आता परिस्थिती हाताबाहेर गेली आहे,
Author: दीपक मोहिते
वसंत भोईर,वाडा नैसर्गिक नाल्यात संरक्षक भिंत बांधल्यानमुळे भातशेतीचे नुकसान वाडा तालुक्यातील वडवली ग्रामपंचायत हद्दीतील टायर रिसायकलिंग कंपन्या चिंचघरपाडा,मुसारणे ( पाटील पाडा ) या दोन गावातील शेतकऱ्यांच्या मुळावर उठल्या आहेत.येथे पूर्वापार असलेल्या नैसर्गिक नाल्यात टायर कंपनी मालकाने संरक्षक भिंत बांधल्याने नाल्याचे संपूर्ण सांडपाणी भातशेतीत गेले असून पेरणी केलेले संपूर्ण पीक वाया गेले असुन आता ही संपूर्ण भातशेती नापीक झाली आहे.त्यामुळे शेतकरी बांधव चिंतेत सापडले आहेत. येथील शेतकऱ्यांनी यासंदर्भात निवेदन तहसीलदार भाऊसाहेब अंधारे यांना दिले होते.त्या अनुषंगाने आज कुडूसच्या मंडळ अधिकारी यांनी तलाठ्यांसमवेत जागेवर येऊन वस्तुस्थितीची पाहणी करून शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या. या टायर कंपनी मालकाने शेतकऱ्यांना दमदाटी करून मनमानी पद्धतीने नैसर्गिक…
दीपक मोहिते, ” हल्लाबोल,” इंडिया व महाविकास आघाडी लवकरच सरणावर जाणार… महानगरपालिका निवडणुकांच्या तोंडावर महाविकास आघाडी तुटण्याच्या मार्गावर आहे.शिवसेनेचे ( उबाठा ) मुख्य प्रवक्ते खा.संजय राऊत यांनी याविषयी नुकतेच संकेत दिले आहेत.तसेच राष्ट्रीय स्तरावरील इंडिया आघाडीमध्येही बिघाडी झाली आहे.आम आदमी पार्टीचे अरविंद केजरीवाल व तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी यांनीही आपापल्या चुली वेगवेगळ्या मांडल्या आहेत. गेल्या वर्षी झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीला रोखण्यासाठी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे व खा.सोनिया गांधी यांनी पुढाकार घेऊन सुमारे २७ पक्षांची ” इंडिया आघाडी,” या नावाने मोट बांधली होती.या आघाडीचे निमंत्रक म्हणून खर्गे यांची नियुक्ती झाली.पण या पदासाठी ममता बॅनर्जी…
दीपक मोहिते, अंतस्थ हेतू निराळा आहे…. मीरा रोड येथे मराठी भाषेच्या अस्मितेवरून झालेले आंदोलन यशस्वी झाल्यानंतर मनसेतर्फे आता मोर्चाचा राजकीय फायदा घेण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. येत्या १८ जुलै रोजी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे मीरा रोड येथे येत आहेत.या त्यांच्या दौऱ्यात ते जाहीर सभा घेतील,अशी अपेक्षा आहे. मराठी भाषेच्या अस्मितेसाठी मनसेकडून मीरा-रोड येथे नुकताच मोर्चा काढण्यात आला होता.त्यानंतर आता राज ठाकरे मीरा रोड येथे येत आहेत. येत्या १८ जुलै रोजी संध्याकाळी सात वाजता राज ठाकरे मीरारोड येथे दाखल होणार आहेत.मनसेच्या आंदोलनानंतर राज ठाकरे प्रथमच मीरा रोडच्या दौऱ्यावर जात असल्याने सर्वांचं लक्ष त्यांच्या या दौऱ्याकडे लागले आहे.कारण यावेळी…
दीपक मोहिते, ” हल्लाबोल,” भाग क्र.१ जनसुरक्षा विधेयक २०२५ ; लोकशाहीचा आवाज बंद करण्याचा सरकारचा प्रयत्न, राज्यातील गुन्हेगारी व दहशतवाद रोखण्यासाठी पुरेसे कायदे असताना राज्य सरकारने केंद्राच्या सांगण्यावरून काल जनसुरक्षा कायदा २०२५ विधानसभेत मंजूर केला.राज्यात यापूर्वी म्हणजे आणीबाणीच्या काळात मिसा,त्यानंतर टाडा,पोटा व मकोक्का हे कायदे अमलात आले. आणि आता युएपीए ( संघटीत गुन्हेगारी नियंत्रण कायदा ) आणला आहे. त्यापैकी पूर्वीचे मिसा,टाडा व पोटा हे कायदे सर्वोच्च न्यायालयाने रद्द केले.ज्यांना हे कायदे लावण्यात आले,त्यापैकी ९० % टक्के लोकांना सर्वोच्च न्यायालयाने जामिन दिला.या सर्व लोकांविरुद्ध तपास यंत्रणा पुरावे सादर करू शकले नाहीत.त्यामुळे अनेकांची सुटका झाली.पण त्या सर्वांना पाच ते सहा वर्षे जेलमध्ये…
दीपक मोहिते, राज्यात चांगला पाऊस, विदर्भ जिल्हा मात्र उपेक्षितच… राज्यात सर्वत्र चांगला पाऊस होत आहे,त्यामुळे विदर्भ वगळता उर्वरित राज्यातील बळीराजा यंदा सुखावला आहे.निसर्गाच्या या कृपेमुळे,ग्रामीण भागात सध्या शेतीच्या कामाना वेग आला आहे.यंदा ग्रामीण भागातील जनतेला दिलासा मिळेल,अशी अपेक्षा करायला हरकत नाही.विदर्भातील अकरा जिल्ह्यांपैकी सहा जिल्हे अद्यापही कोरडे आहेत.विदर्भाच्या एकूण अकरा जिल्ह्यात गेल्या वर्षाच्या तुलनेत पावसाचे प्रमाण ६ टक्क्यांनी कमी आहे. गेल्या अनेक वर्षांपासून राज्यात पर्जन्यमान सतत उतरणीवर लागले आहे.त्यामुळे शेती करायची कशी ? अशा विवंचनेत शेतकरी सापडला होता.यंदाचे वर्ष मात्र त्यास अपवाद ठरले आहे.यावर्षी मेच्या तिसऱ्या आठवड्यापासून राज्यात पावसाला सुरुवात झाली,आजमितीस तो शेतीसाठी पुरेसा नसला तरी यंदा चांगले पीक शेतकऱ्यांच्या…
दीपक मोहिते, ” हल्लाबोल,” प्रकरण अंगलट आल्यामुळे आयुक्त मधुकर पांडे यांचा बळी.. एखादे प्रकरण अंगलट आले की सरकार सनदी अधिकाऱ्याला बळीचा बकरा बनवत असते.गेल्या ६५ वर्षात सत्तेत आलेल्या प्रत्येक सरकारने हेच केले.पण देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने अनेक अधिकाऱ्यांना वारंवार बळीचा बकरा बनवण्यात एकप्रकारे विक्रमच केला आहे.आपल्या अपयशाचे खापर ते वारंवार सनदी अधिकाऱ्यांवर फोडत आले आहेत. मीरा रोड येथे मनसेतर्फे आयोजित करण्यात आलेल्या मोर्चाला पोलिसांनी परवानगी नाकारली,त्यामुळे मीरा रोड परिसरात लोकांचा उद्रेक झाला.मोर्चा निघण्यापूर्वी देवेंद्र फडणवीस हे पोलिसांच्या भूमिकेचे स्वागत करत समर्थन करत होते.मात्र दुपारी मराठी भाषिकांचा झालेला उद्रेक पाहून पोलिसांनी आंदोलकांना परवानगी दिली.त्यानंतर मनसेचे नेते अविनाश जाधव व त्यांच्या सहकाऱ्यांची…
दिपक मोहिते, “अनेकांची दयनीय अवस्था,” अनेक बिल्डर्सना रात्रीची झोप लागत नाही… ऐन निवडणुकीच्या तोंडावर सक्तवसुली संचलनालयाने ( ईडी ) वसईत धाडी घातल्यामुळे विकासक,आर्किटेक्ट, दलाल,महानगरपालिकेचे अभियंते व अधिकारी यांचे धाबे चांगलेच दणाणले आहे.तर बिल्डर्स व आर्किटेक्ट मंडळींची रात्रीची झोप पार उडाली आहे.सक्तवसुली संचलनालयाच्या रडारवर असलेल्या यादीत आपले नाव तर नाही ना ? याची खातरजमा करण्यासाठी ही सर्व मंडळी आपल्या ओळखीच्या माणसाकडे सतत चौकशी करत आहेत.तर प्रतिनियुक्तीवर आलेले मनपाचे अनेक अधिकारीही आता बदली करून घेण्याच्या प्रयत्नात आहेत.महानगरपालिकेच्या भ्रष्टाचाराचे धागेदोरे थेट मंत्रालयाच्या नगरविकास विभागापर्यंत पोहोचले असल्यामुळे त्या विभागातील अधिकाऱ्यांमध्येही भितीचे वातावरण पसरले आहे. अनेक बिल्डर्स आपल्या संपर्कातील पत्रकारांना कॉल करून सतत विचारणा करत…
दीपक मोहिते, ” निवडणूक रणसंग्राम,” काँग्रेसनेही महानगरपालिका निवडणुकीसाठी कंबर कसली… स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकासंदर्भात राज्य निवडणूक आयोगाने संकेत दिल्यानंतर राजकीय पक्षाच्या हालचालींना वेग आला आहे.काल काँग्रेस पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची कोकण प्रभारी यु.बी. व्यंकटेश यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली.यावेळी कार्यकर्ते देखील मोठ्या संख्येने उपस्थित होते. काँग्रेसच्या या बैठकीला कार्यकर्त्यांचा प्रथमच चांगला प्रतिसाद मिळाल्याचे पाहायला मिळाले.पक्षाच्या राज्यस्तरीय नेत्यानी या पूर्वीच पक्षबांधणीकडे लक्ष द्यायला हवे होते,ते न दिल्यामुळे वसई काँग्रेस गेली तीन दशके अंधारात चाचपडत राहिली.बबनशेठ नाईक,जॉन आल्मेडा व अन्य काँग्रेसजन हितेंद्र ठाकूर सोबत गेले.त्यामुळे काँग्रेस पक्षाची पार वाताहत झाली.अनेक वर्षे वसई तालुक्यात पक्षाला खंबीर असे नेतृत्व मिळाले नव्हते.दरम्यानच्या काळात मायकल फुर्ट्याडो,अशोक पेंढारी…
दिपक मोहिते, ” हल्लाबोल,” राज्यात गुन्हेगारीचा वेलू गगनावर… राज्यात गुन्हेगारीचा आलेख सतत वाढत असून आता लोकप्रतिनिधी देखील गुंडासारखे वागू लागले आहेत.” आमचं कोणी वाकडं करू शकत नाहीत,” असा एकप्रकारचा माज त्यांना व त्यांच्या मुलांना आला आहे.काल आ.संजय गायकवाड यांनी कँटीन कामगारांना जबर मारहाण केली.तर आ.सुरेश धस यांच्या मुलाने एका तरुणाला आपल्या गाडीखाली चिरडले.काही दिवसापूर्वी महसूलमंत्री चन्द्रशेखर बावनकुळे यांच्या मुलानेही आपल्या कारने एकाला उडवले होते.वारंवार घडणाऱ्या अशा घटनांमुळे आपले राज्य उद्योग क्षेत्रात नव्हे तर गुंडगिरीमध्ये प्रथम क्रमांकावर पोहोचले आहे. वारंवार होणाऱ्या अशाप्रकारच्या घटना ” आमचं कोण वाकडे करू शकतो,” अशा अहंकारातून घडत असतात.या अशा घटनांमध्ये आरोपींना जामिन देखील अवघ्या आठ ते…
जव्हार प्रतिनिधी, मेलबिगारी कामगारांची पदे रद्द केल्यानमुळे रस्त्यांची दुरावस्था, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या ग्रामस्तरावरील यंत्रणेत कार्यरत असलेली ” मेल,” बिगारी कामगारांची पदे रद्द करण्यात आल्यापासून ग्रामीण भागातील रस्त्यांची अवस्था दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे.त्याचे थेट परिणाम नागरिकांच्या सुरक्षिततेवर,पर्यावरणाच्या समतोल व वाहतूक व्यवस्थेवर होत असल्याचे दिसून आले आहे. ” मेल,” बिगारीमुळे आजवर अनेकांचे जीव वाचले आहेत. यापूर्वी मेलबिगारी कामगार हे रस्त्यावर पडलेले लहानमोठे खड्डे तात्काळ माती टाकून बुजवत असत,त्यामुळे प्रवाशांना खड्ड्यांची जाणीव होत नसे.मात्र सध्या रस्त्यावर पडलेले खड्डे,महिने उलटूनही जैसे स्थितीत आहेत.परिणामी अपघातांचे प्रमाण प्रचंड वाढले आहे.यापलीकडे मेलबिगारी फक्त खड्डे बुजवणेच,नव्हे तर रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडांना पाणी देऊन जगवणे,कोवळ्या रोपांची निगा राखणे,इ.कामे…
