- Home
- Uncategorized
- आंदोलन
- कृषी
- गुन्हेगारी
- चालू घडामोडी
- जागतिकीकरण
- राजकारण
- शैक्षणिक
- संपादकीय
- क्रीडा
- निवडणूक
- मनोरंजन
- विदेश
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
- ठाणे जिल्हा मध्य.सह.बँक निवडणूक ; सहकार पॅनलचे निर्विवाद वर्चस्व,
- राजकारण्यांनी पत्रकारांची किंमत केली आहे,
- ” सांगताही येत नाही आणि सहनही होत नाही, “
- २५ जून १९७५ ; आणीबाणीच्या कटू आठवणीना उजाळा,
- ठाकूर यांचा संताप ; हार्दिक राऊत यांच्या पथ्यावर पडणार ?
- ठाकूरको आखिर गुस्सा क्यों आया ?
- देशात श्रीमंत – गरीब, दरी सतत रुंदावतेय ; आर्थिक व सामाजिक विषमता अत्यंत धोकादायक…
- यंदा मान्सूनने चांगलाच इंगा दाखवला…
Author: दीपक मोहिते
भाजपमध्ये जाणाऱ्यांची अवस्था निवडणुकीनंतर जेवणाच्या ताटाबाहेर फेकलेल्या कडीपत्याच्या पानासारखी होईल…
दीपक मोहिते, ” हल्लाबोल,” भाजपमध्ये जाणाऱ्यांची अवस्था निवडणुकीनंतर जेवणाच्या ताटाबाहेर फेकलेल्या कडीपत्याच्या पानासारखी होईल… स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकीची चाहूल लागल्यानंतर भाजपने आपले वापरात असलेले अस्त्र बाहेर काढले आहे.गेल्या महिनाभरात भाजपने बहुजन विकास आघाडीचे अनेक माजी नगरसेवक,पदाधिकारी व कार्यकर्त्याना आपल्या गळाला लावले व आजही ती प्रक्रिया सुरूच आहे.बहुजन विकास आघाडीला भ्रष्टाचाऱ्याचा पक्ष म्हणून भाजप एकेकाळी हिणवत असे,आज तोच भाजप,बहुजन विकास आघाडीतील हवशे नवश्याना गोळा करण्यात दंग आहे.त्यासाठी त्यांनी भलीमोठी वॉशिंग मशीन आणून ठेवली आहे.पण,या लोकांना कितीही वेळा मशीनमध्ये टाकले तरी त्यांच्या अंगावरचा मळ कधीच खाली बसणार नाही.येणाऱ्या काळात अनेक बदनाम माजी नगरसेवक भाजपच्या वाटेवर असून त्यांना गवसणी घालण्यासाठी भाजप सज्ज झाला…
दीपक मोहिते, वसई विरार शहर महानगरपालिका निवडणूक २०२५ ; प्रत्येक प्रभागात सरासरी ४० हजार मतदार… राज्य निवडणूक आयोगाने प्रभाग रचना व प्रभागनिहाय मतदारसंख्या नुकतीच प्रसिद्ध केल्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका उंबरठ्यावर आल्याचे स्पष्ट झाले आहे.त्यादृष्टीने राजकीय पक्षाच्या हालचालींनाही चांगलाच वेग आला आहे. वसई – विरार शहर महानगरपालिकेच्या एकूण २९ प्रभागामध्ये ११५ जागा असून सुमारे ११ लाख ५६ हजार २०९ मतदार आहेत.या २९ प्रभागांपैकी २८ प्रभागात प्रत्येकी चार उमेदवार,तर प्रभाग क्र.२९ मध्ये तीन उमेदवार असतील.प्रत्येक प्रभागात सरासरी ४० हजार मतदार आपल्या मतदानाचा हक्क बजावणार आहेत.या निवडणुकीसाठी प्रभागनिहाय मतदार खालीलप्रमाणे- प्रभाग क्र.- १ -४५,९५२, प्रभाग क्र.- २ -४१,४८६, प्रभाग क्र.- ३ -…
जव्हार प्रतिनिधी, रानभाज्या महोत्सवातून उत्पन्न वाढीची संधी, अनुसूचित जमातीतील लोकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे व त्यांच्या पारंपरिक रानभाज्या तसेच औषधी गुणधर्म असलेल्या पदार्थांची सार्वजनिक प्रसार व प्रसिद्धी करण्याच्या उद्देशाने रानभाज्या महोत्सवाचे आयोजन करण्यात येणार आहे. जव्हार,एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प,प्रकल्प अधिकारी डॉ.अपूर्वा बासुर यांच्यावतीने जाहीर करण्यात आलेल्या प्रसिद्धीपत्रकानुसार, केंद्रवर्ती अर्थसंकल्प ( न्युक्लिअस बजेट ) अंतर्गत सन २०२५-२६ या योजनेंतर्गत जव्हार,मोखाडा,विक्रमगड व वाडा तालुक्यातील आदिवासी लाभार्थ्यांना या महोत्सवात सहभागी होता येणार आहे. या महोत्सवाच्या माध्यमातून गावागावात उपलब्ध होणाऱ्या रानभाज्या,रानफळे,वनौषधे तसेच अन्नधान्य यांचे प्रदर्शन व विक्री करण्यात येणार आहे. त्यामुळे आदिवासी बांधवांना आर्थिक उत्पन्नाच्या नव्या संधी उपलब्ध होणार असून,या औषधी गुणकारी रानभाज्यांचा…
दीपक मोहिते, ” हल्लाबोल,” गणराया तूच बघ रे बाबा… आज रस्त्याच्या महासंकटातून स्वतःला सांभाळत आमच्या गणरायाचे सुरक्षितपणे आगमन कसेबसे तरी झाले एकदाचे.बाप्पा आपल्या घरी सहीसलामतपणे पोहोचल्यामुळे गणेशभक्तांच्या आनंदाला पारावर उरला नाही. पण हा आनंद केवळ दीड,पाच व अकरा दिवस टिकणारा आहे,याचे भान आमच्या गणरायाला आहे,तसेच त्यांच्या भक्तांना देखील आहे.आज भक्तांच्या घरी आगमन करताना गणरायाला अनेक मानवनिर्मित संकटाला सामोरे जावे लागले.दरवर्षी गणेशाच्या आगमन होण्यापूर्वी वसई विरार शहर महानगरपालिकेचे अधिकारी,हे आढावा बैठकीचे आयोजन करत असतात.या बैठकीत विविध विभागाचे अधिकारी,रस्त्याची कामे करणारे ठेकेदार व राजकीय पक्षाचे पदाधिकारी उपस्थित असतात.सदर बैठकीत गरमागरम चर्चा होते.प्रशासनातील अधिकाऱ्यांची अकार्यक्षमता,ठेकेदाराची मिलीभगत व राजकीय पदाधिकाऱ्यांची उदासीनता करदात्यांना पाहायला मिळते.वास्तविक…
सचिन पाटील,विरार विरारमध्ये चार मजली इमारत कोसळली, अनेक जण अडकल्याची भिती, विरार पूर्वेस नारिंगी भागातील रामू कंपाऊंड येथे काल रात्री एक मोठी दुर्घटना घडली.या भागात असलेली ” रमाबाई अपार्टमेंट,” ही चार मजली इमारत कोसळली असून, यामध्ये १५ ते १६ लोक अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.ही दुर्घटना रात्री ११.४५ च्या सुमारास घडली. घटनेची माहिती मिळताच, वसई-विरार महानगरपालिकेचे अग्निशमन दल आणि एनडीआरएफची पथके तात्काळ घटनास्थळी दाखल झाली आणि त्यांनी बचावकार्य सुरू केले.स्थानिक आ.राजन नाईक आणि आ.स्नेहा दुबे तसेच माजी आमदार क्षितिज ठाकूर यांनी घटनास्थळाला भेट देऊन मदतकार्याचा आढावा घेतला. या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात मोठी गर्दी उसळली होती. प्रशासनाकडून तातडीने मदत पोहोचवण्याचे…
दीपक मोहिते, समाज माध्यमावर धुमाकूळ ; ” चलता है,चलने दो,” प्रत्येक निवडणुकीच्या तोंडावर एकमेकांसमोर उभे ठाकलेल्या पक्षाचे कार्यकर्ते एकमेकांवर अर्वाच्च भाषेत टीका टिप्पणी करत असतात.वास्तविक ही टीकाटिप्पणी मतदारांसाठी मनोरंजनाचे साधन असते.मतदार त्यावरून आपले ” मत कोणाला ? ” हे ठरवत नसतो.पण कार्यकर्त्यांचा उत्साह मात्र सतत वाढत असतो.एकीकडे अशाप्रकारची धुमश्चक्री सुरू असताना दुसरीकडे नेतेमंडळी मात्र निवडणुकीतील मतांची गोळाबेरीज व विजयाची गणिते जुळवण्यात गर्क असतात.वसईत सध्या तेच चालले आहे. समाजमाध्यमावर कार्यकर्ते सध्या एकमेकांची उणी दुणी काढण्यात धन्यता मानत आहेत.टीका टिप्पणीचा हा खेळ निवडणूक होईस्तोवर चांगलाच रंगत असतो.एकदा का निवडणुका संपल्या कि जेवणातील कडीपत्याना जसे ताटाच्या बाहेरचा रस्ता दाखवला जातो,तसे या कार्यकर्त्यांचे होत…
दीपक मोहिते, ” हल्लाबोल,” मराठा समाजाच्या मोर्च्याची फलनिष्पत्ती कशी असेल,हे सांगणे कठीणच आहे, सात वर्षांपूर्वी एका मुलीवर बलात्कार करणाऱ्या नराधमाना शिक्षा व्हावी,यासाठी मराठा समाज एकवटला होता व त्यांनी मुंबईत न भूतो न भविष्यती,अशा क्रांती मोर्चा काढला होता.या मोर्चात सुमारे दीड लाख लोक सामील झाले होते.या प्रकरणी आम्हा मराठ्यासह अन्य समाज बांधवांच्या भावना देखील तीव्र होत्या.या मोर्च्यादरम्यान कुठेही अनुचित घटना घडली नाही.पोलीस यंत्रणेवरही ताण पडला नाही.त्यावेळी मुंबईच्या नागरिकांना या मोर्च्याच्या रूपाने शिस्तबद्ध,संयम व शांतता,असा त्रिवेणी संगम अनुभवायला मिळाला.या घटनेची दखल जगभरातील देशांनी घेतला.मराठा समाज आक्रमक असला तरी तो कधीच स्वकीयाविरोधात नसतो,हे या समाजाच्या आजवरच्या वाटचालीवरून सिद्ध झाले आहे.पूर्वजांनी समाजावर केलेले संस्कार,समाजात…
वसंत भोईर,वाडा, गणरायाच्या मार्गात खड्ड्यांचे विघ्न आराध्य दैवत गणरायाचे आगमन एक दिवसावर येऊन ठेपले आहे.शिवाय यावर्षी गणेश उत्सवाला महाराष्ट्र उत्सवाचा अर्थात राज्य उत्सवाचा दर्जा देण्यात आला आहे.त्यानुसार गणेश भक्तांकडून आपल्या लाडक्या बाप्पाच्या स्वागताची तयारी आता अंतिम टप्प्यात आली आहे. मात्र, हा विघ्नहर्ता ज्या मार्गावरून घरी येणार आहे, किंवा त्याचे भक्त ज्या मार्गावरून ये-जा करणार आहेत.त्या मार्गावर सर्वत्र खड्डे पडल्यामुळे गणरायाच्या मार्गातील विघ्न कायम आहे. त्यामुळे गणेश भक्तांमध्ये संतापाचे वातावरण पसरले आहे. वाडा -भिवंडी- मनोर या मुख्य रस्त्यांसह तालुक्यातील अंतर्गत रस्त्यांची ही प्रचंड दुरावस्था झाली आहे. खड्ड्यात रस्ता की रस्त्यात खड्डे,हे समजणे मुश्किल होऊन बसले आहे.मुख्य रस्त्यावर गुडघाभर मोठ-मोठे खड्डे पडल्याने…
जव्हार, प्रतिनिधी जव्हार पोलीसातर्फे नियोजन बैठक संपन्न, गणेशोत्सव २०२५ शांततेत,सुरळीत आणि सुरक्षित पार पडावा यासाठी पालघर जिल्हा पोलीसातर्फे जव्हार शहरातील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय सभागृह जव्हार येथे नियोजन सभा पार पडली. सदरनियोजन बैठक पालघर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक यतीश देशमुख व अप्पर पोलीस अधीक्षक विनायक नरळे यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आली.यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी ( जव्हार ) एस.एस.महेर व पोलीस निरीक्षक ( जव्हार ) विजय मुर्तडक यांनी उपस्थित राहून गणेशोत्सव संदर्भात मार्गदर्शन केले.या बैठकीस तहसीलदार, नायब तहसीलदार,गटविकास अधिकारी,सहाय्यक गटविकास अधिकारी,जव्हार नगरपरिषद प्रतिनिधी, महावितरण विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, परिवहन विभाग,पोलीस पाटील,तसेच परिसरातील गणेशोत्सव मंडळांचे पदाधिकारी, सरपंच-उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, ज्येष्ठ नागरिक संघाचे पदाधिकारी,…
वसंत भोईर, वाडा वाडा येथे प्रदूषणकारी टायर कंपनीच्या परवानगीचा उफाळला वाद, तालुक्यातील कोनसई या ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेमध्ये आशा इंड्रस्टीज या टायर कंपनीने परवानगी मागीतली होती.या परवानगीच्या ठरावाला ग्रामस्थांचा सक्त विरोध असताना राजकीय दबावापोटी ग्रामपंचायत अधिकारी पंकज चौधरी यांनी ती देण्याची तयारी चालवली होती.त्यामुळे संतप्त ग्रामस्थांनी त्यांना काही तास ग्रामपंचायत कार्यालयात घेराव घातला.ग्रामस्थ आक्रमक झाल्याने अखेर पोलिसांना पाचारण करावे लागले. पोलीस आल्यानंतर त्यांची सुटका करण्यात आली. या प्रदूषणकारी कंपनीला देण्यात आलेल्या परवानगीमुळे गावातील वातावरण तणावपूर्ण बनले आहे.मिळालेल्या माहितीनुसार,तालुक्यातील कोनसई या गावातील नागरिकांनी ग्रामसभेत प्रदूषणकारी कंपन्या कायमच्या बंद करण्याकरिता व भविष्यामध्ये प्रदूषण कारी कंपन्याना परवानगी देण्यात येऊ नये असा ठराव क्रमांक १ (…
