दीपक मोहिते,
वसई विरार शहर महानगरपालिका निवडणूक २०२५ ; प्रत्येक प्रभागात सरासरी ४० हजार मतदार…
राज्य निवडणूक आयोगाने प्रभाग रचना व प्रभागनिहाय मतदारसंख्या नुकतीच प्रसिद्ध केल्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका उंबरठ्यावर आल्याचे स्पष्ट झाले आहे.त्यादृष्टीने राजकीय पक्षाच्या हालचालींनाही चांगलाच वेग आला आहे.
वसई – विरार शहर महानगरपालिकेच्या एकूण २९ प्रभागामध्ये ११५ जागा असून सुमारे ११ लाख ५६ हजार २०९ मतदार आहेत.या २९ प्रभागांपैकी २८ प्रभागात प्रत्येकी चार उमेदवार,तर प्रभाग क्र.२९ मध्ये तीन उमेदवार असतील.प्रत्येक प्रभागात सरासरी ४० हजार मतदार आपल्या मतदानाचा हक्क बजावणार आहेत.या निवडणुकीसाठी प्रभागनिहाय मतदार खालीलप्रमाणे-
प्रभाग क्र.- १ -४५,९५२,
प्रभाग क्र.- २ -४१,४८६,
प्रभाग क्र.- ३ – ४५२३२,
प्रभाग क्र.- ४ -४५,७७८,
प्रभाग क्र.- ५ -४४,७१०,
प्रभाग क्र.- ६ -४५,३३६,
प्रभाग क्र.- ७ -४६,७३५,
प्रभाग क्र.- ८ -३९,९८६,
प्रभाग क्र.- ९ -४२,४५२,
प्रभाग क्र.- १० -४६,९८९,
प्रभाग क्र.- ११ -४२,८०१,
प्रभाग क्र.- १२ -३८,९३३,
प्रभाग क्र.- १३ -४२,४०६,
प्रभाग क्र.- १४ -४१,२०८,
प्रभाग क्र.- १५ -४५,५३४,
प्रभाग क्र.- १६ -४४,६४७,
प्रभाग क्र.- १७ -४६,६५९,
प्रभाग क्र.- १८ -४३,०९७,
प्रभाग क्र.- १९ -४२,६५८,
प्रभाग क्र.- २० -३८,७३९,
प्रभाग क्र.- २१ -४५,६९१,
प्रभाग क्र.- २२ -४१,६५०,
प्रभाग क्र.- २३ -३९,९२९,
प्रभाग क्र.- २४ -३९,८६०,
प्रभाग क्र.- २५ -४०,२१८,
प्रभाग क्र.- २६ -३८,९०७,
प्रभाग क्र.- २७ -३८,७०६,
प्रभाग क्र.- २८ -४३,३९७,
प्रभाग क्र.- २९ -३४,५४४,
———————————
एकूण ११,५६,२०९
सर्वाधिक मतदार प्रभाग क्र.१० -४६,९८९,
सर्वात कमी मतदार प्रभाग क्र.२९ -३४,५४४,

