सचिन पाटील,विरार
विरारमध्ये चार मजली इमारत कोसळली,
अनेक जण अडकल्याची भिती,
विरार पूर्वेस नारिंगी भागातील रामू कंपाऊंड येथे काल रात्री एक मोठी दुर्घटना घडली.या भागात असलेली ” रमाबाई अपार्टमेंट,” ही चार मजली इमारत कोसळली असून, यामध्ये १५ ते १६ लोक अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.ही दुर्घटना रात्री ११.४५ च्या सुमारास घडली.
घटनेची माहिती मिळताच, वसई-विरार महानगरपालिकेचे अग्निशमन दल आणि एनडीआरएफची पथके तात्काळ घटनास्थळी दाखल झाली आणि त्यांनी बचावकार्य सुरू केले.स्थानिक आ.राजन नाईक आणि आ.स्नेहा दुबे तसेच माजी आमदार क्षितिज ठाकूर यांनी घटनास्थळाला भेट देऊन मदतकार्याचा आढावा घेतला.
या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात मोठी गर्दी उसळली होती. प्रशासनाकडून तातडीने मदत पोहोचवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.वसई-विरार महानगरपालिका क्षेत्रात अशा प्रकारच्या अनेक धोकादायक इमारती आहेत,त्यामुळे या घटनेनंतर अशा इमारतींवर तात्काळ कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.तसेच,शहरातील अवैध बांधकामांवरही कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.
ही एक दुःखद घटना असून, बचावकार्य वेगाने सुरू आहे आणि अडकलेल्या लोकांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत.

