जव्हार, प्रतिनिधी
जव्हार पोलीसातर्फे नियोजन बैठक संपन्न,
गणेशोत्सव २०२५ शांततेत,सुरळीत आणि सुरक्षित पार पडावा यासाठी पालघर जिल्हा पोलीसातर्फे जव्हार शहरातील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय सभागृह जव्हार येथे नियोजन सभा पार पडली.
सदरनियोजन बैठक पालघर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक यतीश देशमुख व अप्पर पोलीस अधीक्षक विनायक नरळे यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आली.यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी ( जव्हार ) एस.एस.महेर व पोलीस निरीक्षक ( जव्हार ) विजय मुर्तडक यांनी उपस्थित राहून गणेशोत्सव संदर्भात मार्गदर्शन केले.या बैठकीस तहसीलदार, नायब तहसीलदार,गटविकास अधिकारी,सहाय्यक गटविकास अधिकारी,जव्हार नगरपरिषद प्रतिनिधी, महावितरण विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, परिवहन विभाग,पोलीस पाटील,तसेच परिसरातील गणेशोत्सव मंडळांचे पदाधिकारी, सरपंच-उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, ज्येष्ठ नागरिक संघाचे पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते आणि पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.बैठकीत कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवणे, वाहतूक व्यवस्थापन,मंडळांना देण्यात आलेल्या सूचना, तसेच आपत्कालीन परिस्थितीत पोलीस प्रशासनाची तयारी यावर सविस्तर चर्चा करण्यात आली.पोलीस प्रशासनाने सर्व गणेश मंडळे व नागरिकांना उत्सव साजरा करताना कायद्याचे पालन करावे,तसेच शांतता,एकोपाब व सौहार्दाचे वातावरण राखावे,असे आवाहन केले.सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नितीन आहेर यांनी केले.

