Author: दीपक मोहिते

वाडा प्रतिनिधी वाड्यात भात लागवडीवर “बगळ्या,” रोगाचा प्रादुर्भाव, यंदा तालुक्यात सर्वाधिक पाऊस पडला असून आठवडाभर मुसळधार पाऊस कोसळत होता.भात रोपाची लागवड केलेल्या दिवसांपासून मुसळधार पाऊस कोसळल्यामुळे भात पिकावर बगळ्या आणि करपा रोगांचा प्रादुर्भाव वाढला आहे. या संकटामुळे भात पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. पालघर जिल्ह्यात वाडा तालुक्याची ओळख भाताचे कोठार म्हणून आहे.येथे मोठ्या प्रमाणावर भातपिकाचे उत्पादन घेतले जात असून वाडा कोलम तांदुळ देशभरात नावारूपाला आला आहे.यंदा झालेल्या अतिवृष्टीत लागवड केलेल्या भात पिकावर रोगाचा प्रादुर्भाव वाढला असून भात पिकाचे मोठे नुकसान होण्याची भीती शेतकरी व्यक्त करत आहेत. तालुका कृषी विभागाने शेतक-यांना मदतीच्या दृष्टिकोनातून गावा- गावातील बाधित शेतकऱ्यांची तात्काळ माहिती घेऊन त्यांना…

Read More

दीपक मोहिते, निवडणूक पर्व – प्रभाग क्र.७, ” ओरबाडून खाणे,” हा एकमेव एककलमी कार्यक्रम राबवण्यात आला, काल निवडणूक शाखेने प्रभाग रचनेवर आलेल्या १६० हरकतीवर सुनावणी नुकतीच पार पाडली.या सूनावणीमध्ये किती हरकतीचा निपटारा करण्यात आला. याविषयीची माहिती अद्याप प्रसिद्ध झाली नाही.मात्र तिचा रीतसर अहवाल राज्य निवडणूक आयोगाला पाठवण्यात आल्याचे निवडणूक आयोगाच्या सूत्राने सांगितले.प्रभाग रचना व आरक्षण,ही महत्वाची कामे हातावेगळी झाल्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता आहे.मात्र हे दोन्ही विषय अत्यंत महत्वाचे असून या प्रश्नी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल होण्याची शक्यता आहे.तसे झाल्यास या निवडणुका पुन्हा लांबणीवर पडतील.अशी स्थिती निर्माण होण्याची शक्यता जरी असली तरी राज्य निवडणूक आयोगाने…

Read More

दीपक मोहिते, भारताने सावध व्हायला हवे, नेपाळची वाटचाल अराजकाच्या दिशेने… नेपाळमध्ये जे काही सध्या घडत आहे,ते बाहेरच्या शक्ती दक्षिण आशियाई देश अस्थिर करण्याच्या प्रयत्नात असल्याचे स्पष्ट होत आहे.१७ वर्षांपूर्वी नेपाळी जनतेने लोकशाही व्यवस्था स्विकारली,पण या काळात नऊ पंतप्रधान आले आणि गेले देखील,या पंतप्रधानाच्या काळात देशात लोकशाही रुजू शकली नाही.चीन व अमेरिकेने वेळोवेळी नेपाळमध्ये कारवाया केल्या.आज या देशात जे काही घडतंय,त्यामागे कोण आहे ? हे यथावकाश बाहेर येईलच. दक्षिण आशिया खंडात भारत वरचढ होऊ नये,यासाठी अमेरिका व चीन हे दोन्ही देश गेल्या काही वर्षांपासून चांगलेच सक्रिय झाले आहेत. चीन,हा आशिया खंडातील छोट्या देशांना अर्थपूरवठा करून कमकुवत करत आहे. तर अमेरिका हा…

Read More

सुहास करंदीकर,मुंबई ” अमृताच्या जणु ओंजळी,” पुस्तकाचे शानदार सोहोळ्यात प्रकाशन, काल दिनानाथ मंगेशकर नाट्यगृह,विलेपार्ले येथे ज्येष्ठ संगीतकार श्रीधर फडके यांच्या अमृतमहोत्सवी वाढदिवसाच्या निमित्ताने कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. प्रथितयश प्रकाशन संस्था, डिंपल पब्लिकेशन, जीवनगाणी आणि स्वरगंधार या तीन संस्थाच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सुप्रसिद्ध संगीतकार श्रीधर फडके यांच्या ७५ व्या वाढदिवसाच्या औचित्य साधून,त्यांच्या आयुष्यातील सांगितिक प्रवासावर,प्रकाश टाकणारे पुस्तक, “अमृताच्या जणू ओंजळी” हे डिंपल पब्लिकेशनतर्फे व सांस्कृतिक मंत्री आशिश शेलार यांच्या हस्ते प्रकाशित करण्यात आले. रसिकमान्य संगीतकार,श्रीधर सुधीर फडके यांच्या जीवनातील संगीताच्या टप्प्यांवर प्रकाश टाकणाऱ्या या पुस्तकाचे शब्दांकन, सुकन्या जोशी,या हरहुन्नर निवेदिका व लेखिकेने केले आहे.सदर पुस्तक…

Read More

दीपक मोहिते, तालुकास्तरीय मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान कार्यशाळा संपन्न, सदर कार्यशाळा पालघर विधानसभा आ.राजेंद्र गावित,आ.विलास तरे उप मुख्य कार्यकारी अधिकारी,राजन पाटील, गटविकास अधिकारी पालघर काळभोर,ग्राम विकास अधिकारी,सरपंच,उपसरपंच, यांच्या उपस्थितीत पार पडली. या कार्यशाळेत लोकाभिमुख सक्षम पंचायत,पंचायतीचे आर्थिक सक्षमीकरण,मनरेगा तसेच ग्रामविकास स्तरावरील योजनांची प्रभावी अंमलबजावणी,नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून आपली ग्रामपंचायत समृद्ध करणे गरजेचे आहे.त्यासाठी स्वच्छ गाव,सुंदर व समृद्ध गाव, योजनेतून विकसित आणि विकसनशील ग्रामपंचायत निर्माण करण्याकरिता नियोजन करावे,असे मनोगत यावेळी उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले.कार्यशाळेस लक्षणीय उपस्थिती होती.

Read More

दीपक मोहिते, निवडणूक पर्व, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुका ; भाजप खेळतोय तिरक्या चाली, महायुतीमधील भाजपसह शिवसेनेने ( एकनाथ शिंदे ) स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकीची तयारी सुरू केली आहे.मुंबई,ठाणे,कल्याण – डोंबिवली,नवी मुंबई व वसई – विरार शहर महानगरपालिका निवडणुका भाजपने स्वबळावर लढवण्याचे संकेत दिल्यानंतर शिंदे गटानेही आता कंबर कसली आहे.या निवडणुकीत भाजपने शिंदे गटाला आपली वेगळी चूल मांडायला भाग पाडले तर मात्र या निवडणुकीत शिंदे गटाचे काही खरे नाही.वरील पाचही महानगरपालिकेच्या सत्तेत इतर कोणालाही भागीदार करून घेण्यास भाजपचे राज्यनेते तयार नाहीत.तसेच ठाणे व कल्याण – डोंबिवली या दोन महानगरपालिकेत शिंदे गटाचे असलेले वर्चस्व नेस्तनाबूत करण्यासाठी भाजपची यंत्रणा सध्या जोरात…

Read More

दिपक मोहिते, निवडणूक पर्व – प्रभाग क्र.६, प्रभाग क्र.६ हा अनधिकृत बांधकामे,अनधिकृत फेरीवाले व अवैध पार्किंग वसुलीमुळे बदनाम, विरार शहराच्या पूर्वेस असलेला हा प्रभाग चाकरमान्यांचा प्रभाग म्हणून ओळखला जातो.सकाळी कामावर जायचे व रात्री घरी परतायचे,असे या चाकरमान्यांचे दैनंदिन जीवन,अनेक समस्यांचे आगर,अशीही एक वेगळी ओळख आहे.येथे होणारे हे मतदान हे कायम नकारात्मक स्वरूपाचे होत असते.या प्रभागात गुंडगिरी ही कायम सुप्तावस्थेत पाहायला मिळते.एका महिला नगरसेविकेच्या पतीने आपल्याच पक्षाच्या पदाधिकाऱ्याला चांगलेच बदडून काढले होते.यावरून आपल्या लक्षात आले पाहिजे की या भागातील गुंडगिरी कोणत्या थराला पोहोचली आहे.आपापसातील मतभेद हे येथील नगरसेवकांच्या पाचवीला पुजले आहे.यावर नियंत्रण आणण्याकामी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी कधीही प्रयत्न केले नाहीत.त्यामुळे गुंडगिरीला…

Read More

दीपक मोहिते, उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत एनडीएचे सी.पी.राधाकृष्णन विजयी, भारताचे माजी उपराष्ट्रपती जगदीश धनखड यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर जवळपास दीड महिन्यानंतर आज ही निवडणूक पार पाडली., लोकसभा व राज्यसभेतील पक्षीय बलाबाल लक्षात घेता एनडीएचे सी.पी.राधाकृष्णन हमखास निवडून येतील,असा अंदाज होता.अपेक्षेप्रमाणे सी.पी राधाकृष्णन यांनी इंडिया गटाचे बी.सुदर्शन रेड्डी यांचा १५२ मतांनी पराभव केला. भारताच्या उपराष्ट्रपतींच्या निवडणुकीसाठी काल मतदान झाले.या निवडणुकीत एकूण ९८ टक्के मतदान झाले.त्यामध्ये एनडीएचे उमेदवार सी.पी.राधाकृष्णन आणि इंडिया अलायन्सचे उमेदवार न्या.बी.सुदर्शन रेड्डी यांच्यात थेट लढत झाली.यामध्ये एनडीएचे उमेदवार सी.पी.राधाकृष्णन यांनी एकतर्फी विजय मिळवला. आज सकाळी १०.०० वाजता मतदान सुरू झाले आणि सायंकाळी ५.०० वाजेपर्यंत ते चालले.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वप्रथम…

Read More

दीपक मोहिते प्रताप सरनाईक,उदय सामंत व भरत गोगावले यांची मनोर येथे संयुक्त बैठक, आगामी वसई-विरार महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तथा शिवसेनेचे ( एकनाथ शिंदे ) पक्षप्रमुख एकनाथ शिंदे यांनी वसई-विरार शहर मनपाच्या निवडणुकीवर लक्ष केंद्रित केले आहे.या रणनीतीचा भाग म्हणून ११ सप्टें.रोजी सकाळी मनोर येथील सायलेंट रिसॉर्टमध्ये परिवहनमंत्री प्रताप सरनाईक,उदय सामंत व भरत गोगावले यांच्या संयुक्त नेतृत्वाखाली विशेष बैठक होणार आहे. या मोहिमेचा बlभाग म्हणून त्याच दिवशी दुपारी ३.०० वाजता वसई-विरार महापालिका मुख्यालयात लोकदरबाराचेही आयोजन करण्यात आले आहे.या माध्यमातून वसई-विरारकरांच्या समस्या-अडचणी आणि तक्रारींना न्याय देण्याचा एकनाथ शिंदे यांचा प्रयत्न आहे.हा लोकदरबार परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांच्या नेतृत्त्वाखाली आयोजित करण्यात येणार…

Read More

दीपक मोहिते, चिंचोटी – भिंवडी राज्यमार्गाच्या दुरूस्तीचा प्रश्न लागला मार्गी… वसई आणि भिवंडी तालुक्याला जोडणाऱ्या चिंचोटी ते भिवंडी हा राज्यमार्ग सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे बांधा-वापरा-हस्तांतरीत या तत्वावर मे.सुप्रीम वसई भिवंडी टोलवेज प्रा.लि.या कंपनीला देण्यात आला होता.सदर कंपनीकडून या रस्त्याची नियमित देखभाल व दुरूस्ती न झाल्यामुळे या राज्यमार्गाची पार दुरावस्था झाली असून तो वाहतुकीसाठी अत्यंत धोकादायक असा बनला आहे.वसई तसेच भिवंडी परिसरातील मोठ्याप्रमाणात असलेल्या कारखान्याच्या मालाच्या दैनंदिन वाहतूकीसाठी हा रस्ता अत्यंत महत्वाचा असा आहे. तसेच चिंचोटी-पोमण-कामण या परिसरात मोठ्या प्रमाणावर आदिवासीपाडे असून दैनंदिन वाहतूकीसाठी त्यांना हा एकमेव रस्ता आहे.गेल्या काही वर्षात या रस्त्यावर पडलेल्या खड्डयांमुळे तेथील नागरिकांना चालणे देखील कठीण झाले आहे.…

Read More