दीपक मोहिते,
तालुकास्तरीय मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान कार्यशाळा संपन्न,
सदर कार्यशाळा पालघर विधानसभा आ.राजेंद्र गावित,आ.विलास तरे उप मुख्य कार्यकारी अधिकारी,राजन पाटील, गटविकास अधिकारी पालघर काळभोर,ग्राम विकास अधिकारी,सरपंच,उपसरपंच, यांच्या उपस्थितीत पार पडली.
या कार्यशाळेत लोकाभिमुख सक्षम पंचायत,पंचायतीचे आर्थिक सक्षमीकरण,मनरेगा तसेच ग्रामविकास स्तरावरील योजनांची प्रभावी अंमलबजावणी,नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून आपली ग्रामपंचायत समृद्ध करणे गरजेचे आहे.त्यासाठी स्वच्छ गाव,सुंदर व समृद्ध गाव, योजनेतून विकसित आणि विकसनशील ग्रामपंचायत निर्माण करण्याकरिता नियोजन करावे,असे मनोगत यावेळी उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले.कार्यशाळेस लक्षणीय उपस्थिती होती.

