Author: दीपक मोहिते

दीपक मोहिते, ” हल्लाबोल,” ” राजकारणात कधीही काहीही होऊ शकते,” वसई विरार शहर महानगरपालिकेच्या निवडणुकीत ११५ जागांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया आज ३.०० वाजता थांबणार आहे.आज शेवटच्या दिवशी अर्ज दाखल करण्यासाठी महानगरपालिका परिसराला छावणीचे स्वरूप येणार आहे.मित्रपक्षाशी बोलणी व बंडखोरीची भिती,अशा दोन कारणामुळे उमेदवारी जाहीर करण्यासंदर्भात प्रत्येक राजकीय पक्षाने विलंब लावला.त्यामुळे आज उमेदवारांची चांगलीच धावपळ होणार आहे.तसेच ही प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी निवडणूक अधिकारी व कर्मचाऱ्यांचीही चांगलीच दमछाक होणार आहे. अशी परिस्थिती असतानाही काही उमेदवारांची नांवे जाहीर झाली आहेत.पण,ज्यांना उमेदवारी मिळाली नाही,त्यांनी आता आपली वाघनखे बाहेर काढण्यास सुरुवात केली आहे.तर काही राजकीय पक्ष प्रतिस्पर्धी पक्षातील नाराजांच्या नाराजीला प्राणवायू देत आहेत.निवडणुकीच्या…

Read More

दीपक मोहिते, निवडणूक रणसंग्राम, वसई विरार मनपा निवडणूक ; पराकोटीचा संघर्ष व हाणामाऱ्या पाहायला मिळणार… वसई विरार शहर महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनपा क्षेत्राच्या चार शहरात राजकीय वातावरण हळूहळू तापू लागले आहे.एकमेकांवर होत असलेल्या कुरघोडीच्या राजकारणाला चांगलाच वेग आला आहे.त्यासाठी सोशल मीडियाचा बेसुमार वापर सुरू झाला आहे.प्रचाराची दिशा पाहता,या निवडणुकीत प्रचाराचा भर हा ” सकारात्मक दृष्टिकोना,” वर आधारित नसणार,हे स्पष्ट झाले आहे.या निवडणुकीत युट्युब चॅनलला सुगीचे येणार,हे स्पष्ट होत आहे.” स्वस्त व मस्त,” अशा चौकटीत होणाऱ्या त्यांच्या प्रचाराला उमेदवारांची पहिली पसंती मिळू लागली आहे.त्यामुळे संभाव्य उमेदवारांनी या युट्युबर्सना जवळ करण्याचे धोरण अवलंबले आहे.फेसबुक,व्हाट्सअप व इंस्टाग्रामवर उमेदवारांच्या मुलाखतीचा जो सिलसिला सुरू झाला…

Read More

दीपक मोहिते, ” हल्लाबोल,” बविआ,मनसे व काँग्रेस आघाडी ; भाजप व शिंदे गटाच्या पथ्यावर पाडणारी… वसई विरार शहर महानगरपालिका निवडणुकीत महायुतीमधील भाजप व शिवसेना ( शिंदे गट ) या दोन प्रमुख पक्षांनी जागावाटपाच्या प्रक्रियेत बाजी मारली आहे.तर दुसरीकडे महाविकास आघाडीमधील शिवसेना ( उबाठा ) ही निवडणूक स्वबळावर लढवण्याच्या तयारीत आहे.पण उद्धव ठाकरे यांचे बंधू राज ठाकरे यांच्या मनसेने मात्र बहुजन विकास आघाडीच्या निवडणूक चिन्हावर ही निवडणूक लढवण्याचे मान्य केल्याचे समजते,पण त्याबाबतची अधिकृत घोषणा मनसेकडून अद्याप झालेली नाही.त्यामुळे बविआ व मनसे या दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमावस्था पाहायला मिळत आहे.बविआ व मनसे या दोन पक्षात होणारी युती भाजप व शिंदे गटाच्या पथ्यावर…

Read More

दीपक मोहिते, ” हल्लाबोल, ” वसई विरार शहर मनपा निवडणूक ; भाजपने राष्ट्रवादी काँग्रेसला ( अ.प.गट ) घराबाहेर काढले, वसई विरार शहर महानगरपालिका निवडणुकीत भाजप व शिवसेना ( शिंदे गट ) या महायुतीमधील प्रमुख घटक पक्षांनी अखेर जागावाटपाचा तिढा यशस्वीपणे सोडवला आहे.जागावाटपाचा समझोता करताना त्यांनी अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला जाणीवपूर्वक महायुतीच्या घराच्या उंबरठ्याबाहेर ठेवले.या दोघांनी केलेल्या समझौत्यामध्ये भाजपने ९१ तर शिंदे गटाला २४ जागा असे ठरवले.त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांचा तीळपापड झाला आहे.भाजपने राष्ट्रवादी काँग्रेसला एकही जागा दिली नाही.वास्तविक राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थानिक नेत्यानी युतीतील हे दोन दिग्गज पक्ष आपल्यासाठी जागा सोडतील,अशी अपेक्षा ठेवणेच मुळात चुकीचे होते.कारण,राष्ट्रवादी काँग्रेसची ( अजित…

Read More

दीपक मोहिते, निवडणूक रणसंग्राम, निवडणुकीच्या तोंडावर भाजप,बहुजन विकास आघाडीला घेरण्याच्या तयारीत… विधानसभा निवडणुकांमध्ये मिळालेल्या अभूतपूर्व यशानंतर महायुतीने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक जिंकण्यासाठी कंबर कसली आहे.उमेदवार निवडीची त्यांची प्रक्रिया अंतिम टप्यात पोहोचली असून येत्या दोन दिवसात त्यांचे उमेदवारी अर्ज दाखल होण्यास सुरुवात होईल,असा अंदाज व्यक्त होत आहे. वसई विरार शहर महानगरपालिकेवर कोणत्याही परिस्थितीमध्ये महायुतीचा भगवा फडकवण्यासाठी भाजप व शिंदे गट विविध हातखंडे वापरू लागले आहे.२०१५ साली झालेल्या दुसऱ्या सार्वत्रिक निवडणुकीत बहुजन विकास आघाडीने १०६ जागा जिंकत निर्विवाद वर्चस्व मिळवले होते.त्यावेळी शिवसेना – ०५,भाजप – ०१,अपक्ष -०३ असे बलाबल निर्माण झाले होते.त्यानंतर गेल्या वर्षी झालेल्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीत भाजपने दैदिप्यमान असा…

Read More

दीपक मोहिते, संपादकीय, दोघा भावांची युती झाली खरी,पण ती किती काळ टिकणार ? नॅशनल डेस्कसाठी, तब्बल सतरा वर्षाच्या प्रदीर्घ वनवासानंतर अखेर ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याचे घोडं एकदाचे गंगेत न्हालं,प्रभू रामचंद्राला १४ वर्षे वनवास भोगावा लागला.पण,या दोघा बंधूंना त्याहीपेक्षा अधिक काळ वनवास भोगावा लागला.आता या दोघांमध्ये दिलजमाई झाल्यामुळे या युतीमधून काहीतरी चांगलं निष्पन्न होईल,अशी अपेक्षा करायला हरकत नाही.पण या दोघा भावांचे स्वभाव लक्षात घेता,हे दोघे भाऊ जास्त काळ एकत्र राहतील,असे वाटत नाही.सध्या एकत्र आले असले तरी यांची ही दिलजमाई किती काळ टिकेल,हे सांगणे जरा कठीणच आहे. आम्हीच मराठी माणसाचे खरे राखणदार असल्याचा या दोघांचा दावा आहे.विकासाच्या प्रश्नी या दोघांमध्ये मतभिन्नता आहे,त्यामुळे…

Read More

दीपक मोहिते, निवडणूक रणसंग्राम, आमच्या नशिबी पक्षाच्या सतरंज्या उचलणेच का ? पक्षासाठी खस्ता खालेल्या भाजप कार्यकर्त्यांचा आक्रोश, भाजपमध्ये बाहेरून आलेल्या आयारामाच्या मांदियाळीमुळे पक्षाचे जुने पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड नाराजी आहे.गेल्या महिन्यापासून विविध पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या पक्षप्रवेशाच्या सोहोळ्याला चांगलाच वेग आला आहे.दिवसागणिक हे सोहळे पार पडत आहेत.त्यांचबरोबर तालुक्याच्या भाजपामध्ये सध्या सरळ दोन गट पडले असून हे दोन्ही गट अनुक्रमे मुख्यमंत्री फडणवीस व केंद्रीय स्तरावर सक्रिय असलेले विनोद तावडे यांच्या गटात विभागले गेले आहेत.दुसरे राजकीय पक्ष फोडून पक्षप्रवेशाचे होणारे सोहळे हे जुन्याजाणत्या संघियांना मान्य नाही.तसेच पक्षप्रवेशाचा हा वेग पाहून प्रामाणिक व निष्ठावंत कार्यकर्ते सध्या भयभीत झाले आहेत.या आयारामाना उमेदवारी देण्याचे तोंडी…

Read More

दीपक मोहिते, ” हल्लाबोल,” डहाणू निवडणूक ; अहंकार व एकाधिकारशाहीला मूठमाती देणारी, डहाणू नगरपरीषदेच्या निवडणुकीच्या निकालाने भाजपला यापुढे जिल्ह्याच्या राजकारणात अंतर्मुख होऊन विचार करावा लागणार आहे.या नगरपरिषदेच्या निवडणुकीत २७ पैकी १७ जागा जिंकणाऱ्या भाजपला नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत मात्र तोंडावर आपटावे लागले,ही भाजपसाठी चिंतेची बाब ठरली आहे.अहंकार व एकाधिकारशाही यांना लोकशाही व्यवस्थेत स्थान नसते,हे या घटनेवरून पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.भाजपचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार भरत रजपूत यांचा राजकीय प्रवासही विलक्षण असाच आहे.” हम करे सो कायदा,” अशा पद्धतीचे त्यांचे वागणे,पक्षाला या निवडणुकीत भारी पडले.त्यांच्या प्रचारासाठी दस्तुरखुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी डहाणूमध्ये हजेरी लावली होती.पण त्यांचा काडीमात्र फायदा होऊ शकला नाही.उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी…

Read More

दिपक मोहिते, बविआच्या ” बी,” टीमने निदान आता तरी बोध घ्यायला हवा, आजपासून महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या कामाला सुरुवात झाली आहे.या निवडणुकीसाठी हजारो इच्छुकांची गर्दी झाली आहे.एकूण ११५ जागांसाठी बहुजन विकास आघाडी व भाजप- शिवसेना ( शिंदे गट ) या दोन्ही पक्षांकडे सरासरी ६०० इच्छुकांनी उमेदवारीसाठी आपले अर्ज सादर केले आहेत.लोकसभा व विधानसभा निवडणुकीत महायुतीला मिळालेले अभूतपूर्व यश लक्षात घेऊन इच्छुकांनी या भाजपकडे चांगलीच भाऊगर्दी केली आहे.त्यामुळे उमेदवारांची निवड करताना पक्षाच्या वरीष्ठ मंडळींना आता तारेवरची कसरत करावी तर लागणारच आहे,पण उमेदवारी न मिळालेल्या उमेदवारांची समजूत काढण्याच्या दिव्यातूनही त्यांना जावे लागणार आहे.भाजप व शिवसेना ( शिंदे गट ) या…

Read More

दीपक मोहिते, ” हल्लाबोल,” कालच्या निकालाने विरोधी पक्षांवर भितीचे सावट, अपेक्षेप्रमाणे महायुतीने पालघर जिल्ह्यात चांगली मुसंडी मारल्याचे काल लागलेल्या निकालावरून स्पष्ट झाले आहे.या निवडणुकीत भाजप व शिवसेना ( शिंदे गट ) हे स्वतंत्रपणे लढले असले तरी हे दोघेही सत्तेत एकत्रपणे पाहायला मिळतील.या दोघांनी जिल्ह्यात मिळवलेले यश हे विरोधकांसाठी धोक्याची घंटा ठरणार आहे.ही पहिली घंटा असून महानगरपालिकेच्या निवडणुकीत दुसरी तर जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुकी दरम्यान तिसरी घंटा वाजणार आहे.त्यामुळे विरोधकामध्ये सध्या चलबिचल झालेली पाहायला मिळत आहे. काल लागलेल्या निकालाने विरोधी पक्षांचे धाबे चांगलेच दणाणले आहे.शिवसेना ( शिंदे गट ) व भाजप,हे दोन्ही पक्ष स्वतंत्रपणे लढले तरी त्यांची कामगिरी सरसच…

Read More