Author: दीपक मोहिते

दीपक मोहिते, सरकार आपल्याच मस्तीत धुंद, राज्यात पावसाचा धुमाकूळ ; यंदा शेतकऱ्यांच्या आत्महत्यामध्ये वाढ होणार… राज्यात सुरू असलेला पावसाचा धुमाकूळ हा शेतकऱ्यांना देशोधडीला लावणारा आहे.पंजाब,हरियाणा, उत्तराखंड व आपल्या महाराष्ट्र राज्यात झालेल्या अतिवृष्टीने या सर्व राज्यात हाहाकार उडाला आहे.मे महिन्याच्या अखेरीस सुरू झालेला पाऊस सप्टें.महिना उजाडला तरी थांबायचे नाव घेत नाही.अशीच परिस्थिती आणखी काही दिवस राहिल्यास आपल्या राज्यात शेतकऱ्यांच्या होणाऱ्या आत्महत्यामध्ये लक्षणीय वाढ होईल,अशी भिती सर्वत्र व्यक्त करण्यात येत आहे. राज्यात कोसळणाऱ्या पावसाने ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळवले आहे.पण आपले तीन इंजिनचे सरकार मात्र आपल्याच धुंदीत असल्याचे पाहायला मिळत आहे.यंदा कोसळलेल्या या अस्मानी संकटामुळे गलितगात्र झालेल्या आपल्या शेतकऱ्याला आधाराची गरज…

Read More

दीपक मोहिते, अखेर स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकांचा तिढा सुटला… करोनाचा फैलाव तसेच निरनिराळ्या कारणांमुळे गेल्या पाच वर्षांपासून रखडलेल्या राज्यातील महानगरपालिका, नगरपालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांना अखेर मुहूर्त मिळाला आहे.सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार जाने.पर्यंत राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या राज्य निवडणूक आयोगाला घ्याव्या लागणार आहेत.पाच महिन्यापूर्वी विधानसभा निवडणुकीमध्ये भरघोस यश मिळवणाऱ्या महायुतीचा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत कस लागणार आहे.कारण गेल्या सहा महिन्यात महायुतीच्या कारभाराचे चांगलेच वाभाडे निघाले आहे. त्यामुळे २०२० पासून रखडलेल्या महानगरपालिका, नगरपालिका,जिल्हा परिषदा, पंचायत समित्या आणि नगरपंचायतींच्या निवडणुकांची रणधुमाळी लवकरच सुरू होणार आहे.त्यानुसार पुढील चार महिन्यांमध्ये या सर्व निवडणुका राज्य निवडणूक आयोगाला घ्याव्या लागणार आहेत.सर्व निवडणुका एकत्र घेणे शक्य नाही,हे…

Read More

दीपक मोहिते, आमच्या अटी मान्य करा,अन्यथा आमचा बहिष्कार, पितृपक्ष पंधरवडा दरवर्षी भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेपासून सुरू होतो,तो पंधरा दिवस असतो.तो आता सुरू झाला आहे.मित्रानो,वर्षानुवर्षे आपल्या ज्या मागण्या प्रलंबित आहेत,त्यावर विचारविनिमय करण्यासाठी ही आपण वार्षिक सर्वसाधारण सभा बोलावली आहे.खाली नमूद केलेल्या मागण्यांवर आपण विचार करणार आहोत.प्रत्येक सदस्यांनी आपापली मते मांडावीत,अशी अपेक्षा आहे. १) आमच्यासाठी ठेवण्यात येणाऱ्या वाडीत सकस तसेच उत्तम दर्जाचा पोषण आहार असावा, २) वाडी ठेवल्यानंतर पितरांच्या नातेवाईकांनी काव,काव,असे किंचाळत आम्हाला बोलवू नये,तर आम्हाला सन्मानपूर्वक साद घालावी,अन्यथा आम्ही वाड्यांवर बहिष्कार टाकू. ३) तीन इंजिन सरकारने आमच्या समुहासाठी ” आमचा लाडका कावळा,” अशी योजना सुरू करावी, ४) पितृपक्ष पंधरवडा संपला…

Read More

दीपक मोहिते, जिल्हा परिषद / पं.स. निवडणूक रणसंग्राम – तलासरी अनु.जमाती, जिल्हा परिषद निवडणुका ; तलासरीचा गड भेदणे,भाजपला शक्य होणार नाही… अनु.जमातीसाठी कायम आरक्षित असलेल्या या तालुक्यात जिल्हा परिषदेचे एकूण ५ गट तर पंचायत समितीचे एकूण १० गण आहेत. त्यामध्ये १ – उपलाट,२ – सूत्रकार,३ – डोंगारी,४ – वसा व ५ – वडवली,तर पंचायत समितीच्या १० गणाचा समावेश आहे. महाराष्ट्र – गुजरातच्या सीमेवर असलेल्या या तालुक्याच्या विकासाला गेल्या सात ते आठ वर्षात प्रचंड वेग आला. व्यापार व औद्योगिक वाढीला चालना मिळाली.त्यासोबत लोकसंख्या वाढीचा वेलू देखील गगनावर गेला. परिसरात वाढत असलेले नागरीकरण लक्षात घेऊन राज्यशासनाने काही वर्षांपूर्वी येथे नगरपंचायतीची स्थापना केली.पण…

Read More

दीपक मोहिते, निवडणूक पर्व – प्रभाग क्र.१२, विकासकामे केली असती तर सेल्फी काढायची पाळी आली नसती… विरार पश्चिमेस असलेल्या या प्रभागात गेल्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीत येथील मतदारांनी भाजपला भरभरून साथ दिली होती.त्यामुळे या प्रभागातून निवडणूक लढवण्यासाठी भाजपमध्ये इच्छुक उमेदवारांची भाऊगर्दी झाल्याचे पाहायला मिळत आहे.हा प्रभाग सुशिक्षित मतदारांचा प्रभाग म्हणून ओळखला जातो.त्यामुळे या प्रभागात प्रत्येक राजकीय पक्षाला गुजराती चेहरा द्यावा लागणार आहे.गोकुल टाऊनशिप या वसाहतीमधून होणारे मतदान हे निर्णायक ठरणार आहे. या प्रभागात ३८ हजार ९३३ मतदार आहेत,त्यापैकी १ हजार १६६ अनु.जाती तर अनु.जमातीचे १ हजार ८६६ मतदार आहेत.प्रभागात म्हाडा वसाहत,मेफेअर,गोकुल टाऊनशिप,विनय एनक्लेव्ह,पद्मावती नगर,आगाशी कोफराड,वटार,नवापूर, नवापूर चौपाटी,दोन तलाव, उंबरगोठण,बोळेश्वरी मंदिर…

Read More

दीपक मोहिते, बंजारा समाजही आखाड्यात उतरला ; राज्याची वाटचाल अराजकतेच्या दिशेने … मराठा,ओबीसी,धनगर व आता बंजारा – वंजारी असे एकामागून एक समाज आरक्षणावरून आक्रमक होत आहेत.ही परिस्थिती पुरोगामी महाराष्ट्राला अराजकाच्या दिशेने नेणारी ठरणार आहे.आपले राज्य हे आता एका वळणावर येऊन पोहोचले आहे.समाजा समाजामध्ये विद्वेष निर्माण करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न होत आहेत. गेल्या दोन ते तीन वर्षांपासून ओबीसी व मराठे,या दोन समाजामध्ये आग लावण्याचे काम काही पक्षाच्या नेत्यांनी जाणीवपूर्वक केले.त्यांच्या या प्रयत्नाला या समाजाच्या नेत्यांनीही खतपाणी घातले,त्यामुळे राज्यातील सौहार्दाचे वातावरण पार बिघडले व सध्या राज्यात अराजक सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे.धनगर समाजानेही आता आरक्षणाची मागणी केली आहे.मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न पुन्हा न्यायालयात…

Read More

सचिन सावंत,विरार विवा महाविद्यालयात “श्रावणधारा” स्पर्धेचे यशस्वी आयोजन, विवा महाविद्यालयाच्या ग्रंथालय विभागातर्फे विद्यार्थ्यांमधील कलागुणांना प्रोत्साहन देण्यासाठी दरवर्षी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात येते.याच परंपरेत याही वर्षी “ श्रावणधारा,” या कार्यक्रमांतर्गत चित्रकला व लोकगीत गायन या दोन स्पर्धा घेण्यात आल्या.या स्पर्धांमध्ये विद्यार्थी,शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी,असे तीन गट सहभागी झाले होते.या स्पर्धेसाठी एकूण ९७ जणांनी नोंदणी केली होती.स्पर्धांचा समारोप व पारितोषिक वितरण समारंभ ग्रंथालयाच्या वाचन कक्षात नुकताच पार पडला.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्या डॉ.दीपा वर्मा,प्रमुख पाहुणे म्हणून उपप्राचार्या डॉ. प्राजक्ता परांजपे व ग्रंथालय समिती सदस्या डॉ.निलीमा भागवत उपस्थित होत्या. समारंभाची सुरुवात दीपप्रज्वलन व सरस्वती वंदन नंतर ग्रंथपाल डॉ.नागरत्ना पलोटी यांच्या प्रास्ताविकतेने झाली.समारंभाचे सूत्रसंचालन…

Read More

वसंत भोईर,वाडा वाड्यातील शेतकऱ्यांना किवावरील मासेमारीचा उत्पन्नाला हातभार, पालघर जिल्ह्यात हवामान खात्याने १३ ते १८ सप्टें. या दरम्यान पावसाचा रेड अलर्ट जाहीर केला आहे.येथील नदी- नाले,ओहोळ तुडूंब भरून वाहत आहेत.तालुक्यातील ग्रामीण भागात छोट्या मोठ्या ओहोळ – नाले,रस्त्यावरील मोरी शेजारी,शेतातील बांधावर ” किव,” करून शेतकरी सध्या मासेमारी करत आहेत.या मासेमारीमुळे काही दिवस शेतकऱ्यांच्या उत्पन्नात भर पडत असतो. तालुक्यातील वाडा, कुडूस,शिरीषफाटा, खानिवली,अंबाडी या बाजारपेठेत माश्यांची विक्री होत असते.३०० ते ३५० रु. किलो या दराने माश्यांची विक्री होत आहे. वाडा तालुक्यात भातशेती मोठ्या प्रमाणात केली जाते.पावसाळ्यात भातशेतीची लागवड केल्यानंतर काही दिवसांनी शेतकरी आपल्या शेतात तसेच पुराच्या पाण्यात मोठ्या प्रमाणात मासे मिळत असतात.तर काही…

Read More

जव्हार प्रतिनिधी, राजे यशवंत सार्वजनिक वाचनालयाची ७३ वी वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात संपन्न, राजे यशवंत सार्वजनिक वाचनालय,जव्हारची ७३ वी वार्षिक सर्वसाधारण सभा मोठ्या उत्साहात पार पडली. या सभेचे अध्यक्षस्थान वाचनालयाचे अध्यक्ष कमलजीत धानमेहेर यांनी भूषवले.सभेच्या प्रारंभी दीपप्रज्वलन व सरस्वती प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. त्यानंतर कार्यवाह मनोज कामडी यांनी प्रस्ताविकामध्ये वाचनालयाची वाटचाल, आतापर्यंत राबविलेले उपक्रम व भावी योजनांची माहिती देऊन उपस्थित सर्व सभासदांचे स्वागत केले. तसेच यावेळी वाचनालयाचे उत्कृष्ट वाचक म्हणून वाचनालयाचे सभासद,वाचक सुभाष बोरसे यांचा अध्यक्षांच्या हस्ते शाल, श्रीफळ व वृक्ष भेट देऊन विशेष सत्कार करून त्यांना प्रोत्साहन देण्यात आले. सभेच्या कामकाजात मागील सभेचे इतिवृत्त वाचन व अनुमोदन,…

Read More

वाडा प्रतिनिधी, गावाला आत्मनिर्भर बनवणं हा मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाचा उद्देश, मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान हे ग्रामविकासाच्या क्षेत्रात एक नवे पर्व ठरणार असून या अभियानाचा मुख्य उद्देश ग्रामपंचायतींना आर्थिक स्वायत्तता,पारदर्शक कारभार आणि जबाबदार नेतृत्व प्रदान करणे हा आहे.गावोगाव रोजगार निर्मितीला चालना देणे,शेतीपुरक व लघुउद्योग वाढवणे महिलांचे सबलीकरण करणे तसेच आरोग्य व शिक्षण क्षेत्रात भरीव बदल घडवून गावाला आत्मनिर्भर बनवणे हा या उपक्रमाचा गाभा असल्याची माहिती खासदार डाॅ.हेमंत सवरा यांनी वाडा येथे बोलताना दिली. ग्रामविकास विभागातर्फे राबवण्यात येणा-या मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान सन २०२५ या उपक्रमाच्या पार्श्वभूमीवर तालुकास्तरीय कार्यशाळेचे आयोजन वाडा येथील पां.जा.विद्यालय सभागृहात करण्यात आले होते.त्यावेळी केलेल्या अध्यक्षीय भाषणात ते…

Read More