दीपक मोहिते,
कामण येथे पोषण महाकार्यक्रमाचे यशस्वी आयोजन,
एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प,वसई – कामण चंद्रपाडा येथे आई चंडिका नवरात्र उत्सवात आठव्या पोषण महाकार्यक्रमाचे नुकतेच आयोजन करण्यात आले होते.स्थानिक स्वराज्य संस्था महिला लोकप्रतिनिधी प्रशिक्षण व महिला मेळाव्यामध्ये आहाराचे प्रात्यक्षिक व आहाराविषयी मार्गदर्शन,प्रभात फेरी,स्वच्छता ही सेवा,आदिशक्ती अभियान,महिलांचे आरोग्य विषयक माहिती व मार्गदर्शन,

महिला बालकल्याण विभागाच्या विविध योजनांची माहिती,मातृवंदना योजना, नारी सशक्त अभियान,लेक लाडकी योजनाबाबत प्रचार, प्रसिद्धी,बालविवाह कौटुंबिक हिंसाचार प्रतिबंधक कायदा व बालसंगोपन योजना याविषयी माहिती देण्यात आली.उपस्थित महिला बालविकास संरक्षण अधिकारी संभाजी पवार, तसेच ग्रामपंचायत चंद्रपाडा मधील सरपंच, उपसरपंच,प्राथमिक आरोग्य केंद्राच्या डॉक्टर,एएनएम, आशा वर्कर,सर्व विभागाच्या मुख्य सेविका,ग्रामपंचायत अधिकारी ग्रामस्थ अंगणवाडी सेविका मदतनीस,व महिला मोठ्या संख्येने या कार्यक्रमात सहभागी झाल्या होत्या.

