दीपक मोहिते,
” हल्लाबोल,”
सोनम वांगचूक यांना रासुकाखाली अटक करणे,सरकारच्या हुकूमशाहीचे लक्षण,
सोनम वांगचुक यांना दोन दिवसापूर्वी अटक करण्यात आली आहे.लडाखमध्ये त्यांनी स्वतंत्र राज्याचा दर्जा मिळावा, म्हणून गेल्या अनेक दिवसांपासून उपोषण आंदोलन छेडले होते.२४ सप्टें.२०२५ रोजी या आंदोलनाने हिंसक रूप धारण केले.उपोषण करत असलेले तरुण,विद्यार्थी आणि काही समुदायांनी बाहेर पडून कार्यालये,राजकीय कार्यालये, वाहने जाळली.आंदोलनात जाळपोळ,लाठीचार्ज व गोळीबार होऊन काही लोकांना प्राण गमवावे लागले. या घटनेत सोनम वांगचुक यांना काल अटक झाली आहे.
लडाखमध्ये त्यांनी स्वतंत्र राज्याचा दर्जा मिळावा म्हणून गेल्या अनेक दिवसांपासून उपोषण आंदोलन छेडले होते.२४ सप्टें.२०२५ रोजी आंदोलन हिंसक झाले.उपोषण करत असलेल्या काही तरुण,विद्यार्थ्यांनी आंदोलनातून बाहेर पडून राजकीय कार्यालये,सरकारी वाहने जाळली.आंदोलनात जाळपोळ,लाठीचार्ज आणि गोळीबार होऊन काहींनी प्राण गमावले.या घटनेत चार जण ठार झाले आणि ९० हुन अधिक जण जखमी झाले.या सर्व घडामोडीना जबाबदार धरत वांगचुक यांना राष्ट्रीय सुरक्षा कायद्याखाली अटक करण्यात आली.
वास्तविक त्यांना जो राष्ट्रीय सुरक्षा कायदा लावण्यात आला,तो मुळात चुकीचा आहे.हा कायदा गुंड, दहशतवादी व देशाविरुद्ध कटकारस्थाने करणाऱ्या विरोधात लावला जातो.त्या कायद्याचा वापर करून केंद्र सरकारने आपल्या हुकूमशाहीचे दर्शन घडवले आहे. सरकारच्या या कृतीचा सर्व थरातून निषेध करण्यात येत आहे.
वांगचुक हे आपल्या संशोधन आणि विकासात्मक कार्यामुळे ओळखले जातात.त्यांना जगातील श्रेष्ठ अशा मॅगेसॅसे पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
सोनम वांगचुक यांची ओळख अभियंता,शैक्षणिक सुधारणावादी,पर्यावरण कार्यकर्ता आणि सामाजिक उद्योजक अशी आहे.सोनम वांगचुक हे फक्त शिक्षक नाहीत तर ते लडाखमध्ये शाश्वत विकास,हवामानबदल, व नैसर्गिक साधनसंपत्तीचे संरक्षण,यासाठी लोकचळवळ उभे करणारे आदर्श नेते मानले जातात.
त्यांना मॅगसेसे पुरस्कार,हा शैक्षणिक सुधारणा आणि स्थानिक-समुदायावर आधारित शिक्षण व पर्यावरण तंत्रज्ञानासाठी मिळाला होता. त्यांच्या नावावर इतर अनेक पुरस्कारांची नोंद आहे. उच्चांकी हस्तक्षेप,सामाजिक उद्यमशील पुरस्कार, वास्तुकला,स्थानिक विकास या क्षेत्रात त्यांना अनेक सन्मान प्राप्त झाले आहेत. लडाखला राज्याचा दर्जा व संविधानाच्या सहाव्या अनुसूची अंतर्गत अधिक स्वायत्तता,यासाठी गेली चार वर्षे ते सतत आवाज उठवत आहेत.
त्यांनी शिक्षण,पर्यावरण आणि स्थानिक लोकांचे जीवन सुधारण्यासाठी केलेल्या कामांमुळे समाजात त्यांचा मोठा प्रभाव आहे.पण अनेकदा प्रशासन व सरकारसोबत त्यांचा संघर्ष उडाला आहे.सोनम वांगचुक यांनी “ आईस स्तूप,” नावाचा उपक्रम सुरू केला आहे.हा एक कृत्रिम हिमनदी प्रकार आहे.त्यामध्ये हिवाळ्यात पाण्याचा उपयोग होणार्या प्रवाहाला गोळा करून,त्याला कोनाच्या स्वरुपात जमा केला जातो,उन्हाळ्यात वितळवून शेतीसाठी पाणी पुरवण्यात येते.या प्रकल्पाकडे लडाखमधील पाणीटंचाईवर एक अभिनव उपाय म्हणून पाहिले जाते.सन १९८८ मध्ये त्यांनी एसइसीएमओएल या एनजीओची त्यांनी स्थापना केली.यामागे लडाखमधील सरकारी शाळेच्या शिक्षण व्यवस्थेमध्ये सुधारणा करणे, शिक्षण अनुकूल करण्याचे उपक्रम राबवणे आणि स्थानिक संस्कृती व नैसर्गिक परिस्थितीचा विचार करून शिक्षण देणे हा होता.आमीर खान यांनी चित्रित केलेला ” थ्री इडीएट,” हा हिंदी सिनेमा त्यांच्या जीवनावरच आहे, असे मानले जाते.
या अंतर्गत शिक्षक-विद्यार्थी यांचा दृष्टिकोन बदलण्यासाठी काम करण्यात आले,स्थानिक भाषा,स्थानिक विषयांचा समावेश,आणि प्रयोगात्मक / अनुभवाधारित शिक्षण पद्धती वर भर देण्यात आला आहे. त्यांनी लडाखमध्ये सीमेवर लढणाऱ्या सैनिकांसाठी सौर ऊर्जेवर उष्णता निर्माण करणाऱ्या तंबूची निर्मिती केली.गांधींजींच्या विचारांचा प्रभाव त्यांच्या जीवनशैलीवर आढळतो.
अशा व्यक्तीला अटक करून त्याला बदनाम करण्यामागे आणि दडपशाही करण्यामागे सरकारचा हेतू काय असावा ? निषेध व्यक्त करण्यासारखी ही बाब आहे.चार ठार आणि ९० जखमी,अशी पोलिसांची आकडेवारी आहे.त्याला जबाबदार धरत वांगचुक यांना अटक करण्यात आली आहे.

