- Home
- Uncategorized
- आंदोलन
- कृषी
- गुन्हेगारी
- चालू घडामोडी
- जागतिकीकरण
- राजकारण
- शैक्षणिक
- संपादकीय
- क्रीडा
- निवडणूक
- मनोरंजन
- विदेश
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
- मी ज्या नालासोपारा मतदारसंघातून येतो…
- ठाणे जिल्हा मध्य.सह.बँक निवडणूक ; सहकार पॅनलचे निर्विवाद वर्चस्व,
- राजकारण्यांनी पत्रकारांची किंमत केली आहे,
- ” सांगताही येत नाही आणि सहनही होत नाही, “
- २५ जून १९७५ ; आणीबाणीच्या कटू आठवणीना उजाळा,
- ठाकूर यांचा संताप ; हार्दिक राऊत यांच्या पथ्यावर पडणार ?
- ठाकूरको आखिर गुस्सा क्यों आया ?
- देशात श्रीमंत – गरीब, दरी सतत रुंदावतेय ; आर्थिक व सामाजिक विषमता अत्यंत धोकादायक…
Author: दीपक मोहिते
दीपक मोहिते, पाहणी दौऱ्याचे इव्हेंट व सोहळे झाले उदंड ; पण विकासकामे मात्र जाग्यावरच….. वसई व नालासोपारा मतदारसंघात गेल्या सहा महिन्यात असंख्य इव्हेंट पार पडले.या सर्व इन्व्हेंटस सर्वसामान्य जनतेच्या दैनंदिन जीवनाशी किती निगडित आहे,हा एक संशोधनाचा विषय ठरू शकतो.नवीन आमदारांची निवड,त्यांचे सत्कार सोहळे,अर्धवट अवस्थेत असलेल्या विकासकामांची केवळ पाहणी करणे,( अद्याप विस्कळीत असलेला पाणीपुरवठा,पूर्व व पश्चिम भागाला जोडणारा उड्डाणपूल व ४१ इमारतीमधील ४०० कुटुंबाचे पुनर्वसन,या व्यतिरिक्त अनेक विकासकामे आजही अर्धवट अवस्थेतच आहेत.) अशी विकासकामे अद्याप अर्धवट अवस्थेत पडून आहेत.पण सोहळ्यांचे इव्हेंटसना अक्षरशः उत आला आहे. तत्कालीन माजी आमदारांनी मंजूर केलेल्या विकसकामाचे श्रेय घेण्यासाठी सुरू असलेली धडपड,पाहता येणाऱ्या साडेचार वर्षात आपल्यासमोर काय…
दीपक मोहिते, ” अंधाधुंद कारभार,” अबब… एकही शाळा नसताना महानगरपालिकेकडून पंधरा वर्षात ३०० कोटी रु.चा शिक्षणकर वसुल, वसई – विरार शहर महानगरपालिका ही उभ्या महाराष्ट्रात बदनाम महानगरपालिका म्हणून ओळखली जाते.विकासकामातील टक्केवारी,बाजारकरांचे ठेके,नगरसेवकांच्या फंटर्स लोकांच्या हाती,अनधिकृत बांधकामात मनपा अधिकारी व नगरसेवकांची वसुली,नगरसेवक/ नगरसेविकामाची फेरीवाल्याकडून हप्तेवसुली,पाणी पुरवठा,इलेक्ट्रिक अग्निशमन,आरोग्य व वैद्यकीय साहित्य खरेदी, अनधिकृत बांधकामे करण्यात नगरसेवकांच्या फंटर्सचा सहभाग व आरक्षित जमिनी हडप करणे,अशा गोरखधंद्यामुळे ही ” मुन्नी पुरी बदनाम हूई…. गेली १५ वर्षे नगरसेवक,प्रतिनियुक्तीवर आलेले अनेक अधिकारी व त्यांना पाठवणारे मंत्रालयातील नगरविकास विभागाचे वरिष्ठ अधिकारी यांनी महानरपालिकेची तिजोरी लुटून खाल्ली. महानगरपालिका कशी असू नये,याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे वसई – विरार शहर महानगरपालिका…
दीपक मोहिते, ” हल्लाबोल,” महामार्गावर पोलिसांची खंडणी वसुली जोरात, मुंबई – अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग,हा दिवसेंदिवस प्रवाश्यासाठी त्रासदायक ठरु लागला आहे.वाहतूककोंडी,धुळीचे साम्राज्य,अर्धवट अवस्थेत असलेली दुरुस्तीची कामे,इ.गैरप्रकारामुळे मुंबई व गुजरात दिशेने दररोज ये-जा करणाऱ्या नागरिकांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे.या महामार्गावर गेल्या पाच वर्षात झालेले अपघात व त्यामध्ये मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या लक्षात घेता,हा महामार्ग कसा धोकादायक बनला आहे,हे दिसून येते.नागरिक,या सर्व अग्निदिव्यातून जात असताना आता वाहनचालकांना वेगळ्याच समस्याना सामोरे जावे लागत आहे.या महामार्गावरून ये-जा करणाऱ्यांकडून महामार्ग पोलिसांनी वाहनांची कागदपत्रे तपासण्याच्या नावाखाली सर्रास खंडणी वसुली सुरू केली आहे. महामार्गावरील वाहतुककोंडी,अपघात टाळण्यासाठी उपाययोजना करण्याऐवजी महामार्ग पोलिसांनी अनेक ठिकाणी खंडणी वसुली केंद्रे सुरू…
वसंत भोईर,वाडा स्व.विष्णू सवरा स्मृती दिनानिमित्त सामाजिक उपक्रमांचे आयोजन, माजी आदिवासी विकासमंत्री स्व.विष्णू सवरा यांच्या स्मृती दिनानिमित्त काल वाडा येथील भाजपच्या जिल्हा मध्यवर्ती कार्यालयात त्यांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.तसेच ग्रामीण रुग्णालय वाडा येथे रुग्णांना फळे व खाऊचे वाटप मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले.रुग्णांना फळवाटपाचा कार्यक्रम युवा मोर्चेचे सरचिटणीस कुणाल साळवी यांच्यातर्फे आयोजित करण्यात आला होता. स्वर्गीय विष्णू सवरा यांनी सतत ३० वर्ष भाजपचे आमदार,राज्याचे आदिवासी विकासमंत्री व पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून भिवंडी ग्रामीण व विक्रमगड भागातील जनतेची कामे केली.तसेच भाजपची विचारधारा गाव -खेड्यात पोहोचवून पक्ष बळकटीचे कार्य केले आहे.त्यांच्या जनसेवेचा वसा त्यांची दोन मुले डाॅ.हेमंत सवरा…
दीपक मोहिते, ” हल्लाबोल,” पराभवानंतर बविआत आलेली मरगळ व अस्वस्थता,पक्षाला हानिकारक ठरू शकतात, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानंतर सध्या राजकीय पक्षांच्या हालचालींना सुरुवात झाली आहे.सर्वसाधारणपणे या निवडणुका ऑक्टो.होतील,असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.त्यादृष्टीने काही राजकीय पक्ष कामाला देखील लागले आहेत.केंद्रीय निवडणूक आयोगाने १२० दिवसात ( चार महिने ) निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्याचे निर्देश दिल्यानंतर आयोगाचे अधिकारी आता कामाला लागले आहेत.काही दिवसांपूर्वी निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी मुंबईला भेट देऊन निवडणूक कामाचा आढावा घेतला होता.या सर्व पार्श्वभूमीवर या निवडणुका समीप आल्याचे स्पष्ट झाले आहे. या सर्व धामधुमीत राजकीय पक्ष देखील ” मुंबई कोणाची,” या एकमेव विषयावर आता आपले लक्ष केंद्रित…
दिपक मोहिते, ” विश्लेषण, ” वसई विरार जिल्हाध्यक्षपदी महिलेची वर्णी लावून भाजपने वेगळे संकेत दिले आहेत, स्थानिक स्वराज्य संस्थाच्या आगामी निवडणुकांवर डोळा ठेवून भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी राज्याच्या प्रत्येक जिल्ह्याच्या नेतृत्वात नुकतेच मोठे बदल केले आहेत.हे बदल करताना प्रत्येक जिल्ह्यातील राजकीय परिस्थिती,नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांची जनमानसातील प्रतिमा,पक्षाप्रती असलेली निष्ठा,इ.निकष लावण्यात आले आहेत.जिल्हाध्यक्षांच्या नियुक्त्यांचा सोपस्कार पार पडल्यानंतर लवकरच जिल्हा कार्यकारिणीमधील सदस्यांच्या नियुक्त्या करण्यात येणार आहेत.या सर्व घडामोडीमुळे महानगरपालिका, जिल्हा परिषदा,नगरपंचायती व पंचायत समित्या जिंकण्यासाठी भाजपने कंबर कसल्याचे स्पष्ट होत आहे.दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काही महानगरपालिकेच्या निवडणुका स्वबळावर लढण्याचे संकेत दिले आहेत.त्या पार्श्वभूमीवर भाजपने पक्ष कार्यकारिणीमध्ये आता महत्वाचे बदल केले आहेत. भाजपची आयडीओलॉजी अनेकांना…
वसंत भोईर,वाडा टायर रिसायकलिंग कारखाने दिवसा बंद,रात्री सुरू… टायर रिसायकलिंग करणाऱ्या कंपन्यांमुळे वाडा तालुक्यातील हवा दूषित झाली आहॆ.त्यामुळे वडवली गावाच्या हद्दीत असलेल्या दहा प्रदूषणकारी कारखाने पालकमंत्र्यांच्या आदेशानंतर प्रदूषण नियंत्रण मंडळाने बंद केले होते.बंद केलेले हे कारखाने शासनाचे आदेश धाब्यावर बसवून रात्री खुलेआम चालू असल्याचे येथील स्थानिक ग्रामस्थांनी निदर्शनास आणून दिले आहे. तालुक्यातील वडवली या ग्रामपंचायतीच्या हद्दीत जुने टायर जाळून त्यापासून ऑइल व तारा काढून त्याची विक्री मोठ्या प्रमाणात केली जात आहे.त्यातून बाहेर पडणारे प्रदूषित रासायनिक सांडपाणी हे येथील नैसर्गिक नाल्यात टाकले जात असल्याने नाल्यातील मासे मृत्यूमुखी पडतात.तर दूषित पाणी प्यायल्याने आजवर अनेक जनावरे मृत्यूमुखी पडली आहेत.या प्रदूषणाबाबत अनेकदा पत्रव्यवहार करूनही…
सविता केळकर यांच्या फेसबुक वॉल वरून, मोटरमन दररोज नवीन मरण बघत असतो….. सीएसटीवरून शेवटची लोकल निघते,१२.३७ ला आणि ती शेवटची लोकल असते.१२ वाजून ३७ मिनिटांनी निघालेली ही लोकल तीनच्या सुमारास कर्जतला पोहोचते. तेथून ती रिटर्न निघते,साधारणपणे साडेचारच्या सुमारास.मधल्या काळात मोटरमन आणि गार्ड आराम करतात,ते त्यांच्यासाठी खास बनवलेल्या रेस्ट रुम मध्ये.प्रत्येक मोटरमन आणि लोकल गार्ड यांच्यासाठी ड्युटी अवर्स असतात,फक्त चार तास.हे चार तास ट्रेनच्या रनिंग टाईमनुसार मोजले जातात.त्यात ट्रेन कुठे व किती वेळ थांबली,वगैरे ग्राह्य धरलं जात नाही.पण त्या चार तासात पूर्ण वेळ डोळ्यात तेल घालून एकटक एका नजरेनं एकाच दिशेत सतत पाहत राहणं,योग्य अंतरावर प्रॉपर नोटिफिकेशन देणं,दर चारशे मीटरवर येणाऱ्या…
दीपक मोहिते, आ. गावित व जिल्हाधिकारी जाखड यांच्या उपस्थितीत बाधिताची बैठक संपन्न, जिल्ह्यातील डी.एफ.सी.सी. प्रकल्प,देहर्जे प्रकल्प,खडखड धरण प्रकल्प,लेंडी प्रकल्प, मुंबई – वडोदरा महामार्ग, मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग तसेच एमआरव्हीसी व बुलेट ट्रेनच्या प्रकल्पासंदर्भात सर्व आ. गावित व जिल्हाधिकारी इंदुराणी जाखड,संबंधित अधिकारी तसेच प्रकल्पबाधित शेतकरी व नागरिक यांच्यासमवेत बैठक आयोजित करण्यात आली होती. सदर बैठकीस विशाल खत्री, सहा.जिल्हाधिकारी डहाणू, अपुर्वा बसूर,सहा. जिल्हाधिकारी जव्हार, भूसंपादन समन्वय उपजिल्हाधिकारी महेश सागर,पुनर्वसन उपजिल्हाधिकारी तेजस चव्हाण,उपविभागीय अधिकारी वाडा,संदिप चव्हाण,प्रभारी उपविभागीय अधिकारी पालघर रविंद्र राजपूत,जिल्हा अधिक्षक, भूमी अभिलेख,नरेंद्र पाटील, देहर्जे व लेंडी प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता दिनेश शेवाळे, अमोल फुंदे, अधिक्षक अभियंता,पाटबंधारे प्रकल्प, सहा. संचालक,नगररचना भाग्यश्री धवळसंक तसेच…
दीपक मोहिते, ” निर्लज्जपणा,” गिर गया,फिर भी टांग उपर, पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने जी सैन्य कारवाई केली.त्याने पाकिस्तानला त्यांची युद्धक्षमता दाखवून दिली. ७ ते १० मे दरम्यान झालेल्या चार दिवसाच्या यूद्धात पाकिस्तानने भारताकडून जबर मार खाल्ला. पाकिस्तानची सैन्य प्रतिष्ठा धुळीस मिळाली.मात्र, त्यानंतरही पाकिस्तानला अक्कल आलेली नाही. पाकिस्तानचा जिहादी मानसिकतेचा लष्कर प्रमुख असिम मुनीरने पुन्हा एकदा भारताविरोधात गरळ ओकली आहे.इस्लामाबाद,दक्षिण आशियामध्ये भारताचे वर्चस्व कधीच मान्य करणार नाही, असं आसिन मुनीरने म्हटलं आहे.स्वतःचा देश यूद्धात हरल्यानंतरही स्वत:ला फिल्ड मार्शल पदवी लावून घेणारा आसिम मुनीर हा पहिलाच लष्करप्रमुख असावा. भारताने सिंधू जल करार स्थगित करुन पाकिस्तानची चांगलीच कोंडी केली आहे.भारताने केलेल्या या वॉटर…
