- Home
- Uncategorized
- आंदोलन
- कृषी
- गुन्हेगारी
- चालू घडामोडी
- जागतिकीकरण
- राजकारण
- शैक्षणिक
- संपादकीय
- क्रीडा
- निवडणूक
- मनोरंजन
- विदेश
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
- मान्सून राज्याच्या उंबरठ्यावर : खरीप हंगामाला सुगीचे दिवस येणार….
- ग्रामीण भागात रस्तेबांधणीच्या कामाला प्राधान्य देण्याची गरज,
- भारतीय संविधानाचे देशाच्या विकासामध्ये मोठे योगदान,
- मनरेगा कामातील बजबजपुरीमुळे आदिवासी स्थिरावतोय अन्य क्षेत्रात,
- प्रादेशिक अस्मितेत लक्षणीय वाढ ; राष्ट्रीय एकात्मकतेला हानिकारक….
- अमेरिकेची दादागिरी अखेर इराणने संपवली,
- ममता बॅनर्जीचा राजीनामा देण्यास नकार, कलम ३५६ चा वापर होण्याची शक्यता,
- कितीही प्रयत्न करा, पण आता परिस्थिती हाताबाहेर गेली आहे,
Author: दीपक मोहिते
दीपक मोहिते, निवडणूक पर्व – प्रभाग क्र.३, करदाते जीव मुठीत धरून जगत आहेत, हा प्रभाग देखील दाटीवाटीच्या चाळी,अनधिकृत इमारती व पार्किंगची व्यवस्था नसल्यामुळे भररस्त्यावर मोठ्याप्रमाणात होणारी वाहतूककोंडी,इ.कारणामुळे या प्रभागातील नागरिक गेली अनेक वर्षे त्रस्त आहेत.अनधिकृत फेरीवाले व रिक्षावाल्यांच्या दादागिरीमुळे येथील व्यापाऱ्यांना खूप आर्थिक झळ सोसावी लागते.स्थानिक नगरसेवक,वाहतूक पोलीस व मनपा अधिकारी यांचे अशा अपप्रवृत्तीना पाठबळ मिळत असल्यामुळे या प्रभागातील नागरिकांना दररोज विविध समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.या प्रभागाची ओळखच ” समस्याग्रस्त प्रभाग,” अशी असून महानगरपालिकेची प्रभाग समिती असून नसल्यासारखी आहे.या प्रभागात करदात्यांचे प्रश्न,अडचणी व समस्यांना येथील मनपा अधिकारी काडीची किंमत देत नाहीत.त्यामुळे या प्रभागात गेल्या पंधरा वर्षात प्रचंड प्रमाणात अनधिकृत…
दीपक मोहिते, कारखाने अधिनियमातील बदलाला कामगार संघटनाचा तीव्र विरोध, कारखाने अधिनियमातील दुरुस्तीला मंत्रिमंडळाकडून नुकतीच मंजुरी देण्यात आली आहे.आता दररोज ९ तासांऐवजी १२ तास काम करण्याची तरतूद करण्यात आली आहे.कामगारमंत्री आकाश फुंडकर यांनी याबाबतची माहिती दिली आहे. या बदलामुळे कामगारांना अधिकचा आर्थिक फायदा होणार आहे.विश्रांती कालावधीमध्ये बदल करून ५ तासानंतर ३० मिनिटे आणि ६ तासानंतर पुन्हा ३० मिनिटे विश्रांतीसाठी वेळ देण्यात आली आहे.आठवड्याचे कामकाजाचे तास ४८ तासांवरून ६० तासांपर्यंत वाढवण्यात आले आहेत.ही तरतूद अत्यंत धोकादायक असुन कामगारांच्या आरोग्यावर परिणाम करणारी आहे. याविषयी मात्र कामगारमंत्री चकार शब्द बोलले नाहीत. कामगारांच्या अतिरिक्त वेळेत ( ओव्हरटाईम ) आता कमाल मर्यादा ११५ तासांवरून १४४ तासांपर्यंत…
गावाच्या विकासासाठी सदैव तत्पर,— आ.हरिश्चंद्र भोये जव्हार प्रतिनिधी – ग्रुप ग्रामपंचायत देहरे-देवगाव यांच्यातर्फे आज देहरे विक्रमगड विधानसभा आमदार हरिश्चंद्र शेवंती सखाराम यांचा नागरी सत्कार करण्यात आला.पारंपरिक वाद्य,फुलांची उधळण आणि जल्लोषात आमदारांचे त्यांच्या मूळ गावी भव्य स्वागत करण्यात आले. ५ सप्टें. शिक्षक दिनाचे औचित्य साधून आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात आमदारांचा शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. तसेच देहरे ग्रामपंचायत हद्दीतील सर्व शिक्षकांचा आमदारांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.कार्यक्रमात भोये यांची पत्नी ज्योतीताई भोये, जि.प. माजी सदस्य अशोक भोये, तालुका शहराध्यक्ष कुणाल उदावंत, आदिवासी सेविका पुरस्कार विजेत्या मीराताई महाले,सरपंच जितेश भोये आदी मान्यवर उपस्थित याप्रसंगी उपस्थित होते. सत्कारानंतर आपले मनोगत…
वाडा प्रतिनिधी, वाड्यात भगवे शिवबंधन अभियानास सुरुवात, vada तालुक्यात उद्धव सेनेतर्फे भगवे शिवबंधन अभियानाची खानिवली गटातील गौरापूर गावापासून करण्यात आली. तालुक्यातील शिवसैनिकांनी गावो गावी जाऊन शिवसैनिकांच्या भेटीगाठी घेऊन प्रत्येकाला शिवबंधन बांधण्यात आले.यावेळी गावागावात रिक्त असलेली शाखाप्रमुख व उपशाखा प्रमुख पदावर नियुक्ती करून त्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले. यावेळी उपजिल्हाप्रमुख गोविंद पाटील,तालुकाप्रमुख निलेश पाटील,सचिव सागर पाटील,ज्येष्ठ शिवसैनिक समीर भानुषाली,भाई कराळे,प्रभाकर कराळ,उपविभाग प्रमुख अनिल डबके,पालसई शाखाप्रमुख स्वप्नील पाटील,असनस शाखाप्रमुख चेतन जाधव,कलंबई शाखाप्रमुख नवनीत हिरवे,आंवढा शाखाप्रमुख नरेश पाटील,सोशल मीडिया कक्षाचे सागर पाटील,आदींसह पदाधिकारी शिवसैनिक उपस्थित होते.
दीपक मोहिते, ” हल्लाबोल,” अजित पवार,त्या महिलेची सरळ जाहीर माफी मागा… राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा बालिशपणा काल उभ्या महाराष्ट्राने अनुभवला.सोलापूरच्या पोलीस अधिक्षका अंजली कृष्णा यांना ” आपण जो फोन केला तो गावात कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती बिघडू नये,यासाठी होता,असा हास्यास्पद खुलासा करताना अजित पवार पाहायला मिळाले.त्यांचा हा खुलासा कोणालाच पटला नाही.अजित पवार हे आपल्या राजकीय जीवनात कधीही सामंजस्य व समजूतदारपणा दाखवत वावरले नाही.काकांच्या उपकारामुळे मिळालेली सत्ता,ही आपलीच जागीर आहे,अशा गुर्मीत ते सतत वावरत असतात.त्यांच्या या अशा वागण्यामुळे ते अनेकदा अडचणीत देखील आले.धरणात मुतु का ? असा सवाल शेतकऱ्यांना विचारणाऱ्या अजित पवार यांना कृष्णेकाठी दिवसभर फतकल मारून बसायला लागले होते.त्यांच्या…
दीपक मोहिते, निवडणूक पर्व – भाग क्र,२, प्रभाग क्र २ ; अनेक समस्या ” जैसे थे,” स्थितीत,मतदारांमध्ये प्रचंड नाराजी… कालच्या लेखात आपण प्रभाग क्र.१ ची रचना कशी असेल,तसेच या प्रभागामधील समाजरचना व प्रलंबित विकासकामे यावर प्रकाशझोत टाकला.या आपल्या पहिल्या वहिल्या लेखाला वसई- विरारकर मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.या लेखमालेला सुरुवात करत असताना निवडणूक आयोगाने काल प्राप्त झालेल्या हरकती व सूचनांची संख्या एका पत्रकाच्या माध्यमातून प्रसिद्ध केली.लवकरच त्याचा निपटारा करण्याचा आयोगाकडून प्रयत्न सुरू होणार आहे.या सर्व घडामोडी लक्षात घेता राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लवकरात लवकर जाहीर होतील,असे संकेत मिळू लागले आहेत. वसई – विरार शहर महानगरपालिकेच्या प्रभाग रचनेसंदर्भात एकूण १६० हरकती…
दीपक मोहिते, प्रारूप प्रभाग रचनेवर एकूण १६० हरकती व सूचना प्राप्त, राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार वसई विरार शहर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक -२०२५ करिता प्रभाग निहाय प्रारूप प्रभाग रचना २२ ऑगस्ट, २०२५ प्रसिद्ध करण्यात आली होती. प्रसिद्ध करण्यात आलेल्या प्रारूप प्रभाग रचनेवर नागरिकांना हरकती व सूचना सादर करण्यासाठी २२ ऑगस्ट ते ०४ सप्टें.२०२५ असा कालावधी देण्यात आला होता.या कालावधीत वसई विरार शहर महानगरपालिका मुख्य कार्यालय, महानगरपालिकेच्या सर्व प्रभाग समिती कार्यालयांमध्ये एकूण १६० हरकती व सूचना प्राप्त झाल्या आहेत.सदर प्राप्त हरकती मध्ये १० मूळ हरकतींसोबत त्याच स्वरूपाचे २ हजार १३० नागरिकांनी सामुहिकरित्या दाखल केलेल्या एका हरकतीचा समावेश आहे.सदर हरकती व सूचना दाखल…
दीपक मोहिते, ” निव्वळ मुजोरी,” याला पुरुषार्थ म्हणायचा का ? काल राज्याचे तोंडाळ मंत्री म्हणून ओळख असलेल्या,साधी मराठी भाषा व्यवस्थित बोलता न येणारे व अंगी प्रचंड माज असलेले मंत्री,अशी ओळख असलेल्या अजित पवार यांनी एका महिला अधिकाऱ्याला धमकी दिल्याची व्हिडियो क्लिप व्हायरल झाल्यानंतर त्यांच्यावर सर्वत्र टीकेची झोड उठत आहे.लाडक्या बहिणींचा निवडणुकीच्या काळात उदो उदो करणारे अजित पवार यांचा खरा चेहरा काल त्यांच्या लाडक्या बहिणींना पाहायला मिळाला.गैर व भ्रष्ट कारभाराचे जनक असलेले अजित पवार हे पूर्वीपासून गुन्हेगारी प्रवृत्तीचे आहेत.त्यांच्या या अतिरेकी स्वभावामुळे ते अनेकदा अडचणीतही आले आहेत. काल सोलापूर जिल्ह्यातील माढा येथे बेकायदेशीर उत्खननावर कारवाई करत असताना, एका महिला आयपीएस अधिकाऱ्याला…
दीपक मोहिते, निवडणूक पर्व,- प्रभाग क्र.१, प्रभाग क्र.१ हा विकासाच्या बाबतीत अजूनही अंधारातच…. वसई-विरार शहर महानगरपालिकेची प्रभाग रचना गेल्या महिन्याच्या अखेरीस जाहीर झाली.त्यावर हरकती व सूचना मागवण्यात आल्या,काल तिची मुदत संपली.या सर्व प्रक्रियेनंतर राज्य निवडणूक आयोग,निवडणुकीचा कार्यक्रम कधी जाहीर करतो,याकडे आपले सर्वांचे लक्ष लागले आहे.सुमारे २९ प्रभागातील ११५ जागांसाठी या निवडणुका होत आहेत.त्यासाठी ११ लाख ५६ हजार २०९ मतदार आपल्या हक्काचे ५८ नगरसेवक व ५७ नगरसेविका,असे आपले एकूण ११५ लोकप्रतिनिधी निवडणार आहेत.प्रत्येक प्रभागात सरासरी ४० हजार मतदार आहेत.या निवडणुकीची प्रभाग रचना,प्रभागनिहाय मतदारसंख्या,अनु.जाती व जमाती किती मतदार आहेत.तसेच प्रभागात झालेली विकासकामे,राजकीय स्थिती,प्रलंबित नागरी समस्या व मतदारराजाचे म्हणणे,अर्थात त्यांच्या प्रतिक्रिया,याचा समावेश असेल.ही…
दीपक मोहिते, मराठा आरक्षण ; निर्णयाची अंमलबजावणी अशक्य, दोन दिवसापूर्वी राज्य सरकारने मराठ्यांच्या आरक्षण विषयी ऐतिहासिक निर्णय घेतला. या निर्णयाचे सर्वत्र स्वागत करण्यात आले.पण या निर्णयाचा आनंद जास्त काळ टिकणार नाही,अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.मराठ्यांना ओबीसींच्या कोट्यातून सरसकट आरक्षण देण्यात येऊ नये,या मागणीवर ओबीसींचे नेते ठाम असताना,आता त्यांनी मराठ्यांना हैदराबाद गॅझेटियर लागू होऊ नये,यासाठी एल्गार पुकारला आहे.छगन भुजबळ,लक्ष्मण हाके,हरिभाऊ राठोड व बबनराव तायवाडे या ओबीसी समाजाच्या नेत्यानी शासनाच्या या निर्णयाविरोधात आता रान उठवण्यास सुरुवात केली आहे.तर छगन भुजबळ यांनी मंत्रिमंडळाच्या साप्ताहिक बैठकीला दांडी मारत आपल्याच सरकारला ” माहेरचा आहेर,” दिला आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीला उपस्थित न राहता काल त्यांनी आपल्या एमआयटी…
