- Home
- Uncategorized
- आंदोलन
- कृषी
- गुन्हेगारी
- चालू घडामोडी
- जागतिकीकरण
- राजकारण
- शैक्षणिक
- संपादकीय
- क्रीडा
- निवडणूक
- मनोरंजन
- विदेश
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
- मान्सून राज्याच्या उंबरठ्यावर : खरीप हंगामाला सुगीचे दिवस येणार….
- ग्रामीण भागात रस्तेबांधणीच्या कामाला प्राधान्य देण्याची गरज,
- भारतीय संविधानाचे देशाच्या विकासामध्ये मोठे योगदान,
- मनरेगा कामातील बजबजपुरीमुळे आदिवासी स्थिरावतोय अन्य क्षेत्रात,
- प्रादेशिक अस्मितेत लक्षणीय वाढ ; राष्ट्रीय एकात्मकतेला हानिकारक….
- अमेरिकेची दादागिरी अखेर इराणने संपवली,
- ममता बॅनर्जीचा राजीनामा देण्यास नकार, कलम ३५६ चा वापर होण्याची शक्यता,
- कितीही प्रयत्न करा, पण आता परिस्थिती हाताबाहेर गेली आहे,
Author: दीपक मोहिते
दीपक मोहिते, निवडणूक पर्व, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुका ; भाजप खेळतोय तिरक्या चाली, महायुतीमधील भाजपसह शिवसेनेने ( एकनाथ शिंदे ) स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकीची तयारी सुरू केली आहे.मुंबई,ठाणे,कल्याण – डोंबिवली,नवी मुंबई व वसई – विरार शहर महानगरपालिका निवडणुका भाजपने स्वबळावर लढवण्याचे संकेत दिल्यानंतर शिंदे गटानेही आता कंबर कसली आहे.या निवडणुकीत भाजपने शिंदे गटाला आपली वेगळी चूल मांडायला भाग पाडले तर मात्र या निवडणुकीत शिंदे गटाचे काही खरे नाही.वरील पाचही महानगरपालिकेच्या सत्तेत इतर कोणालाही भागीदार करून घेण्यास भाजपचे राज्यनेते तयार नाहीत.तसेच ठाणे व कल्याण – डोंबिवली या दोन महानगरपालिकेत शिंदे गटाचे असलेले वर्चस्व नेस्तनाबूत करण्यासाठी भाजपची यंत्रणा सध्या जोरात…
दिपक मोहिते, निवडणूक पर्व – प्रभाग क्र.६, प्रभाग क्र.६ हा अनधिकृत बांधकामे,अनधिकृत फेरीवाले व अवैध पार्किंग वसुलीमुळे बदनाम, विरार शहराच्या पूर्वेस असलेला हा प्रभाग चाकरमान्यांचा प्रभाग म्हणून ओळखला जातो.सकाळी कामावर जायचे व रात्री घरी परतायचे,असे या चाकरमान्यांचे दैनंदिन जीवन,अनेक समस्यांचे आगर,अशीही एक वेगळी ओळख आहे.येथे होणारे हे मतदान हे कायम नकारात्मक स्वरूपाचे होत असते.या प्रभागात गुंडगिरी ही कायम सुप्तावस्थेत पाहायला मिळते.एका महिला नगरसेविकेच्या पतीने आपल्याच पक्षाच्या पदाधिकाऱ्याला चांगलेच बदडून काढले होते.यावरून आपल्या लक्षात आले पाहिजे की या भागातील गुंडगिरी कोणत्या थराला पोहोचली आहे.आपापसातील मतभेद हे येथील नगरसेवकांच्या पाचवीला पुजले आहे.यावर नियंत्रण आणण्याकामी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी कधीही प्रयत्न केले नाहीत.त्यामुळे गुंडगिरीला…
दीपक मोहिते, उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत एनडीएचे सी.पी.राधाकृष्णन विजयी, भारताचे माजी उपराष्ट्रपती जगदीश धनखड यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर जवळपास दीड महिन्यानंतर आज ही निवडणूक पार पाडली., लोकसभा व राज्यसभेतील पक्षीय बलाबाल लक्षात घेता एनडीएचे सी.पी.राधाकृष्णन हमखास निवडून येतील,असा अंदाज होता.अपेक्षेप्रमाणे सी.पी राधाकृष्णन यांनी इंडिया गटाचे बी.सुदर्शन रेड्डी यांचा १५२ मतांनी पराभव केला. भारताच्या उपराष्ट्रपतींच्या निवडणुकीसाठी काल मतदान झाले.या निवडणुकीत एकूण ९८ टक्के मतदान झाले.त्यामध्ये एनडीएचे उमेदवार सी.पी.राधाकृष्णन आणि इंडिया अलायन्सचे उमेदवार न्या.बी.सुदर्शन रेड्डी यांच्यात थेट लढत झाली.यामध्ये एनडीएचे उमेदवार सी.पी.राधाकृष्णन यांनी एकतर्फी विजय मिळवला. आज सकाळी १०.०० वाजता मतदान सुरू झाले आणि सायंकाळी ५.०० वाजेपर्यंत ते चालले.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वप्रथम…
दीपक मोहिते प्रताप सरनाईक,उदय सामंत व भरत गोगावले यांची मनोर येथे संयुक्त बैठक, आगामी वसई-विरार महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तथा शिवसेनेचे ( एकनाथ शिंदे ) पक्षप्रमुख एकनाथ शिंदे यांनी वसई-विरार शहर मनपाच्या निवडणुकीवर लक्ष केंद्रित केले आहे.या रणनीतीचा भाग म्हणून ११ सप्टें.रोजी सकाळी मनोर येथील सायलेंट रिसॉर्टमध्ये परिवहनमंत्री प्रताप सरनाईक,उदय सामंत व भरत गोगावले यांच्या संयुक्त नेतृत्वाखाली विशेष बैठक होणार आहे. या मोहिमेचा बlभाग म्हणून त्याच दिवशी दुपारी ३.०० वाजता वसई-विरार महापालिका मुख्यालयात लोकदरबाराचेही आयोजन करण्यात आले आहे.या माध्यमातून वसई-विरारकरांच्या समस्या-अडचणी आणि तक्रारींना न्याय देण्याचा एकनाथ शिंदे यांचा प्रयत्न आहे.हा लोकदरबार परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांच्या नेतृत्त्वाखाली आयोजित करण्यात येणार…
दीपक मोहिते, चिंचोटी – भिंवडी राज्यमार्गाच्या दुरूस्तीचा प्रश्न लागला मार्गी… वसई आणि भिवंडी तालुक्याला जोडणाऱ्या चिंचोटी ते भिवंडी हा राज्यमार्ग सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे बांधा-वापरा-हस्तांतरीत या तत्वावर मे.सुप्रीम वसई भिवंडी टोलवेज प्रा.लि.या कंपनीला देण्यात आला होता.सदर कंपनीकडून या रस्त्याची नियमित देखभाल व दुरूस्ती न झाल्यामुळे या राज्यमार्गाची पार दुरावस्था झाली असून तो वाहतुकीसाठी अत्यंत धोकादायक असा बनला आहे.वसई तसेच भिवंडी परिसरातील मोठ्याप्रमाणात असलेल्या कारखान्याच्या मालाच्या दैनंदिन वाहतूकीसाठी हा रस्ता अत्यंत महत्वाचा असा आहे. तसेच चिंचोटी-पोमण-कामण या परिसरात मोठ्या प्रमाणावर आदिवासीपाडे असून दैनंदिन वाहतूकीसाठी त्यांना हा एकमेव रस्ता आहे.गेल्या काही वर्षात या रस्त्यावर पडलेल्या खड्डयांमुळे तेथील नागरिकांना चालणे देखील कठीण झाले आहे.…
दीपक मोहिते, निवडणूक पर्व,प्रभाग क्र.५ या प्रभागात भाजप वरचढ ठरण्याची शक्यता अधिक, प्रभाग क्र.५ हा समाज रचनेच्या दृष्टीने सर्वसमावेशक असा प्रभाग आहे.या प्रभागात बाहेरून येणाऱ्यांचे मोठे प्राबल्य आहे.सध्या या प्रभागात स्थानिक भूमीपुत्रांचा मागमूस देखील पाहायला मिळत नाही.स्थानिक भूमीपुत्रांनी आपल्या वाडवडलांनी जतन करून ठेवलेल्या आपल्या जमिनी बिल्डरांना विकल्या व स्वतःच्या अस्तित्वाला धोका निर्माण करून घेतला.आता या प्रभागात स्थानिक भूमिपुत्र औषधालाही सापडत नाही.अशाप्रकारचे अस्मानी संकट त्यांनी स्वतःहून ओढवून घेतले आहे.आज या भूमीपुत्रांच्या कुटुंबातील तरुण मुले रिक्षा व्यवसायात स्थिरावलेली पाहायला मिळतात.१९७० ते १९८० च्या दशकात वसई – विरार शहरात नागरीकरणाला वेग आला.तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांनी नागरी सुविधांची उपलब्धता लक्षात न घेता,येथील जमिनी…
दीपक मोहिते, विविध पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचा भाजपामध्ये प्रवेश, देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी,राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून तसेच विकासकामांनी प्रभावित होऊन वसई विधानसभा क्षेत्रातील विविध पक्षांतील कार्यकर्त्यांनी रविवार ०७ सप्टेंबर २०२५ रोजी माझ्या हस्ते भारतीय जनता पार्टीत जाहीर प्रवेश केला. या जाहीर पक्षप्रवेश सोहळ्यात आम आदमी पार्टीचे नालासोपारा अध्यक्ष आदर्श पांडे,बँक मॅनेजर जे. पी.यादव,शिवसेना शाखा प्रमुख आशुतोष चौरसिया,बहुजन विकास आघाडीचे मनीष,तसेच अमन कन्नोजिया आणि शशांक गुप्ता यांच्या नेतृत्वाखाली ४० ते ५० कार्यकर्त्यांनी भाजपामध्ये प्रवेश केला. याप्रसंगी सर्व कार्यकर्त्यांचे भाजप परिवारात हार्दिक स्वागत करून त्यांना पक्षाच्या विचारधारेनुसार देशहित व समाजहितासाठी कार्य करण्याचे आवाहन…
दीपक मोहिते, आ.स्नेहा दुबे पंडित यांची सहसंयोजकपदी नियुक्ती, वसईच्या आ.स्नेहा दुबे पंडित यांची यांची आत्मनिर्भर भारत संकल्प अभियानाच्या सहसंयोजकपदी निवड करण्यात आली आहे.प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी त्यांना काल नियुक्तीचे पत्र दिले आहे.त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांच्यावर ही महत्वपूर्ण जबाबदारी सोपवण्यात आल्याचे पक्षाच्या सूत्राने आज मध्यमाना सांगितले. प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी भाजपच्या पाच जणांची आत्मनिर्भर भारत संकल्प अभियान समितीवर नियुक्त्या केल्या.त्यामध्ये ऍड.माधवी नाईक,प्रदेश सरचिटणीस,ऍड.आ.स्नेहा दुबे पंडित,आ.विक्रम पाचपुते,आ.अमल महाडिक व आ.प्रताप अडसड,या पाच जणांचा समावेश आहे.२५ सप्टें. २०२५ रोजी पंडित दीनदयाळ उपाध्याय जयंती दिनी सुरू होणारे हे अभियान २५ डिसें.२०२५ भारतरत्न श्रद्धेय अटलबिहारी वाजपेयी जयंती दरम्यान हे अभियान पार पडणार आहे.या कालावधीत…
दीपक मोहिते, मराठा आरक्षणाच्या जी.आर.विरोधात छगन भुजबळ उच्च न्यायालयात जाणार, मनोज जरांगे यांच्या आझाद मैदानातील आंदोलनानंतर राज्य सरकारने मराठा आरक्षणासाठी नवा जी.आर. काढला होता.या जी.आर.ला छगन भुजबळांकडून न्यायालयात आव्हान देण्याची तयारी राज्याचे कॅबिनेटमंत्री छगन भुजबळ यांनी चालवली आहे.या सर्व घडामोडी अपेक्षेनुसार घडत आहेत.” मी मारल्यासारखे करतो,तु रडल्यासारखे कर,” अशी ही नौटंकी आहे,आणि या नौटंकी मागचा मास्टर माईंड कोण आहे, हे सर्वाना ठाऊक आहे. मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्त्वाखाली आझाद मैदानावर करण्यात आलेल्या आंदोलनानंतर राज्य सरकारने मराठा आरक्षणासंदर्भात शासन आदेश काढला होता.यामध्ये हैदराबाद गॅझेटियर लागू करण्यासोबत पात्र मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र मिळण्याची प्रक्रिया सोपी करण्यात आली होती. सरकारच्या…
दीपक मोहिते, निवडणूक पर्व – प्रभाग क्र.- ४ , या निवडणुकीतही गेल्या निवडणुकीचीच पुनरावृत्ती होणार.. प्रभाग क्र.४ हा अनधिकृत इमारती व चाळींनी व्यापलेला असा हा प्रभाग असून गेली अनेक वर्षे या प्रभागावर बहुजन विकास आघाडीचे निर्विवाद वर्चस्व आहे.ते मोडून काढण्यासाठी भाजप सध्या जोरदार तयारी करत आहे.या प्रभागातील आघाडीच्या माजी नगरसेविका या स्थानिक नेतृत्वावर प्रचंड नाराज आहेत.आमची कामे होत नसल्याचा आरोप त्यांच्याकडून सतत होत असतो.स्थानिक नेतृत्व हे केवळ दहीहंडी व अन्य उत्सव साजरे करण्यात धन्यता मानत आली आहे.लोकांच्या दैनंदिन अडचणी व समस्यांची उकल करणे,इ.कामाना प्राधान्य दिले जात नाही,त्यामुळे गेल्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीत पक्षाची जबर पीछेहाट झाली.हीच पीछेहाट भाजपचा विश्वास दुण्यावण्यास…
