- Home
- Uncategorized
- आंदोलन
- कृषी
- गुन्हेगारी
- चालू घडामोडी
- जागतिकीकरण
- राजकारण
- शैक्षणिक
- संपादकीय
- क्रीडा
- निवडणूक
- मनोरंजन
- विदेश
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
- सर्वप्रथम नालासोपारा शहरातील नागरिकांचे दैनंदिन जीवन सुधारा…
- पर्यटकांची जरूर काळजी घ्या, पण शहरातील करदात्यांना वाऱ्यावर सोडू नका,
- सक्रिय नसलेल्या राजकीय पक्षाना हजारो कोटी रु. च्या देणग्या,
- दादांच्या जाण्यावर कोणी राजकारण करू नये – सुनेत्राताई पवार,
- वाढवण बंदर ; तिढा अधिक जटील होत चालला आहे,
- ग्रामीण भागातील खेडी समृद्ध होण्यासाठी शाश्वत विकासाची गरज,
- विरोधी पक्षाकडून ७.८ टक्के जीडीपी वाढीच्या आकडेवारीवर संशय व्यक्त,
- वसईत स्मार्ट मीटर विरोधात ७ सप्टें. रोजी सर्वपक्षीय आंदोलन,
Author: दीपक मोहिते
वसंत भोईर,वाडा अबिटघर ग्रामपंचायतीला आयएसओ मानांकन, सातत्यपूर्ण सामाजिक कार्य आणि नवनवीन लोकोपयोगी व समाजोपयोगी उपक्रमांची आखणी तसेच विविध धोरणात्मक निर्णयाच्या माध्यमातून ग्रामपंचायत अबिटघरच्या सरपंच साक्षी संतोष साठे,उपसरपंच सुप्रिया पाटील व ग्रामपंचायत कार्यकारिणी सोबतच ग्रामपंचायत अधिकारी संजय पाटील यांच्या प्रयत्नाना यश येऊन अखेर अबिटघर ग्रामपंचायतीला आयएसओ (आंतरराष्ट्रीय मानकीकरण संघटन,) दर्जा प्राप्त झाला. विद्यमान सरपंच साक्षी संतोष साठे,उपसरपंच सुप्रिया पाटील,सदस्य भरत जाधव,कुलदीप पाटील, धनश्री पाटील,भावना रायात, कल्याणी साठे,मनिषा मुकणे,निखिल पाटील,स्मिता चिमडा,कल्पेश आमले यांच्या सोबतच ग्रामपंचायत अधिकारी संजय पाटील आणि त्यांच्या समवेत काम करणारे कर्मचारी यांच्या अथक आणि सातत्यपूर्ण कामासोबतच संपूर्ण गावकऱ्यांचे सहकार्य मिळाल्यामुळे आमची ग्रामपंचायत प्रगतीचे एक एक टप्पे पार करत असल्याची…
जव्हार प्रतिनिधी, ” याची देही, याची डोळा,” – जव्हारमध्ये दुसऱ्या वर्षी भव्य जगन्नाथ रथयात्रा संपन्न. जव्हार नगरीत दुसऱ्या वर्षीही “ याची देही, याची डोळा,” या दिव्य अनुभूतीने भरलेली आणि भक्तिरसात न्हालेली भव्य श्रीजगन्नाथ रथयात्रा मोठ्या उत्साहात पार पडली. पुरीच्या चार धामांपैकी एक असलेले जगन्नाथ धाम जव्हारमध्ये साकार होत असून,या प्राचीन परंपरेचा तेजस्वी वारसा इथेही दृढ होत असल्याचे स्पष्ट दिसून आले.रथयात्रेची सुरुवात राजे यशवंतराव मुकणे महाराज यांच्या पुतळ्यापासून झाली. रथाने राम मंदिर आणि प्रगती प्रतिष्ठान मार्गे नगरपरिक्रमा करत शहरात भक्तिभावाचे वातावरण निर्माण केले. रथ ओढताना महिलांपासून लहान मुलांपर्यंत सर्वजण सहभागी झाले होते. रस्त्यावर फुलांची पखरण, गुलालाचे उधळण आणि “ हरे…
दीपक मोहिते, निवडणूक रणसंग्राम, स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका ; अनेक राजकीय पक्षांना स्वकीयांकडून दगाफटका, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम जुलै किंवा ऑगस्ट महिन्यात जाहीर होण्याची शक्यता आहे.प्रभाग रचनेच्या प्रश्नावरून निवडणूक प्रक्रिया पुन्हा न्यायालयात गेली तर या निवडणुका पुन्हा अनिश्चित काळासाठी पुढे ढकलल्या जातील.या निवडणुका पुढे जाव्यात,यासाठी महायुतीचे सरकारकडून प्रयत्न होण्याची शक्यता आहे.जर या निवडणुका लांबणीवर गेल्या तर ते महायुतीमधील घटक पक्षांसाठी फायद्याचे ठरणार आहे.हिंदी सक्तीच्या विषयावर मराठी भाषिक महायुती सरकारवर प्रचंड नाराज आहेत.अशावेळी उद्धव ठाकरे व राज ठाकरे या दोघांना मिळणारा प्रतिसाद हा महायुतीला डोकेदुखी ठरणारा आहे.त्यामुळे या निवडणुका होतील कि नाही,या विषयी सर्वत्र साशंकता निर्माण झाली आहे.अशी स्थिती असतानाही…
दीपक मोहिते, देश एका भयावह वळणावर… भाग क्र.२, मोदी यांच्या काळात जुमल्यांचा सुळसुळाट… १९४७ पासून सत्तेत असलेल्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने गेल्या सत्तर वर्षात काय केले ? असा प्रश्न पंतप्रधान नरेंद्र मोदी गेल्या बारा वर्षात सतत विचारत आहेत.काँग्रेस सरकारने त्यांच्या कार्यकाळात किती विकासकामे केली,त्याची कल्पना मोदी यांनाही आहे,पण आपल्या अपयशावरून जनतेचे लक्ष दुसरीकडे वळवण्याचे त्यांचे प्रयत्न आहेत.पण हा त्यांचा प्रश्न आता कालबाह्य झाला आहे.नेहरू,इंदिरा गांधी,राजीव गांधी व डॉ.मनमोहनसिंग यांच्या कारकिर्दीत एम्स,डी.आर.डि.ओ, आयआयटी,नासा, आयएमए,लष्कराचे आधुनिकीकरण,पाकशी झालेल्या चार युद्धात प्रत्येकवेळी भारताची सरशी,आण्विक देश झाला,वीज व अन्नधान्य क्षेत्रात देश स्वयंपूर्ण झाला.अनेक ऊर्जा केंद्राची निर्मिती झाली. मनरेगा रोजगार योजना कार्यान्वित झाली,बँकेचे राष्ट्रीयकरण,पाकिस्तानचे दोन तुकडे करून…
दीपक मोहिते, सरकार पडले उताणे, अखेर ठाकरे बंधूनी बाजी मारली, उद्धव ठाकरे व राज ठाकरे यांच्या रेट्यामुळे सरकारला ” हिंदीची सक्ती,” या ज्वलंत प्रश्नावर सपशेल माघार घ्यावी लागली.काल पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर शोकाकुल वातावरणात झालेल्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुमारे वीस मिनिटे नेहमीप्रमाणे महाराष्ट्राच्या जनतेची दिशाभूल करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न केला.एकीकडे फडणवीस यांची पोपटपंची सुरू असताना दुसरीकडे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवार हे सुतकी चेहरे करून बाजूला बसले होते.माघार घेत असल्याचे सांगताना फडणवीस यांचे वागणं हे ” गिर गया,तो फिर भी टांग उपर,” अशा स्वरूपाचे होते. सेना व मनसेचा ५ जुलै रोजी निघणारा मोर्चा,हा रेकॉर्डब्रेक असा असेल,या भितीने…
वसंत भोईर,वाडा वाडा आगारात दाखल झाल्या पाच नवीन बसेस, वाडा आगाराच्या ताफ्यात पाच नवीन बसेस दाखल झाल्या असून त्यांचे लोकार्पण आज पार पडले.आज वाडा आगारात खा.डॉ.हेमंत सवरा यांच्या हस्ते दोन बसेसचे लोकार्पण करण्यात आले.तर वाडा एसटी स्थानकात आ. शांताराम मोरे यांच्या हस्ते तीन बसेसचे लोकार्पण करण्यात आले. या बसेसची व्यवस्थित देखभाल करण्याची जबाबदारी आता प्रवाशांची असल्याचे खा.सावरा यांनी यावेळी बोलताना सांगितले. यावेळी आगर व्यवस्थापक भूषण बेंद्रे,प्रवासी संघटनेचे विशाल मुकणे,प्रल्हाद शिंदे, प्रा.किरण थोरात आदीसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.या नवीन बसेसमुळे ग्रामीण भागातून दररोज प्रवास करणाऱ्या प्रवाशांना दिलासा मिळाला आहे.
जव्हार प्रतिनिधी, जव्हार येथे विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप, हेल्पर्स चाईल्ड ग्रुपने पालघर जिल्ह्यातील जव्हार तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा,वडोली येथील १०१ विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य किट आणि खाऊचे नूकतेच वाटप केले.’शैक्षणिक साहित्याच्या अभावी कोणाचेही शिक्षण थांबू नये, अशा उदात्त हेतूने ही संस्था सामाजिक कार्य करत असते.यावेळी हेल्पर्स चाईल्ड ग्रुपचे संस्थापक म्हात्रे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शनपर भाषण करताना, ” खूप खेळा, आणि अभ्यास करा.आपल्या समाजाच्या हितासाठी तुम्ही पण हेल्पर्स बना,” असा संदेश दिला. शाळेच्या शिक्षिका दर्शना मुकणे यांनी विद्यार्थ्यांना मिळालेल्या या शैक्षणिक साहित्याबद्दल मार्गदर्शन केले. त्या म्हणाल्या, “आपण समाजाचे देणेकरी आहोत. आपले कार्य इतरांसाठी आदर्श आणि मार्गदर्शक असावे.” त्यांनी आपल्या भाषणात संस्थेचे…
वसंत भोईर,वाडा हिंदीची सक्ती ; शासन निर्णयाची कुडूसमध्ये होळी, हिंदी सक्ती विरोधात मनसे, शिवसेना( उबाठा )काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आक्रमक झाले असून शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी आज संपूर्ण राज्यभरात हिंदी सक्तीच्या शासन निर्णयाची होळी करून आंदोलन करण्याचे आवाहन केले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत आज कुडूस नाका येथे शासन निर्णयाची होळी केली. यावेळी शिवसेनेच्या उपनेत्या ज्योती ठाकरे,पालघर सहसंपर्क प्रमुख गोविंद पाटील,माजी सभापती अस्मिता लहांगे,माजी पंचायत समिती सदस्य राजेश सातवी,प्रकाश पाटील,योगेश भानुशाली,प्रकाश भोईर, किशोर पाटील,संतोष पाटील, दामोदर लाड,परशुराम भोईर, राकेश खिसमतराव,राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे तालुकाध्यक्ष प्रमोद पाटील, काँग्रेसचे इरफान सुसे,रामदास जाधव,मनसेचे दिलीप सांबरे आदी आंदोलनात सहभागी झाले होते.यावेळी…
सुरेश काटे,तलासरी सूत्रकार येथील पूल अवजड वाहनासाठी बंद, महाराष्ट्र राज्यातील सूत्रकार येथून केंद्रशासित दादरा नगर हवेली राज्यात जाणाऱ्या मार्गांवरील सूत्रकार काकडपाडा येथील पूल आवजड वाहनासाठी बंद करण्यात आला असून येथून येजा करण्यासाठी पर्यायी मार्ग उपलब्ध करण्यात आला आहे. सूत्रकार येथील काळू नदीवरील पूल धोकादायक नसला तरी पूल अरुंद असल्यामुळे अवजड वाहनाच्या सततच्या वाहतूकीमुळे पूल नादुरुस्त होण्याची शक्यता आहे.या पुलाच्या दोन्ही बाजूच्या रस्त्याचे काँक्रीटीकरण पूर्ण झाले असून तांत्रिक कारणामुळे पुलाचे काम बाकी आहे.रस्ता रुंद करण्यात आला असला तरी पुलाचे काम शिल्लक आहे.त्यामुळे या पुलावरून अवजड वाहतूक बंद करण्यात आली आहे. दादरा नगर हवेलीमधून सूत्रकार तलासरीकडे येणारी वाहने उधवा तलासरी मार्गे महामार्गावरून…
दीपक मोहिते, ” हल्लाबोल,” हिंदी भाषेची सक्ती ; मराठी भाषिकांचे दुर्देव म्हणावे लागेल… केंद्र सरकारने गेल्या वर्षी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा बहाल केला.या घटनेमुळे मराठी जनतेच्या आनंदाला पारावर उरला नव्हता.पण त्यानंतर राज्य सरकारने केंद्र सरकारच्या छुप्या अजेंड्याला पाठीशी घालत हिंदीची सक्ती करण्याबाबत हालचालीना सुरुवात केली आहे.त्यामुळे जनतेचा आनंद केवळ अल्पकाळ टिकला.सरकारच्या या निर्णयाविरोधात राज्याच्या जनतेमध्ये संतापाची लाट उसळली आहे.राज्य सरकारच्या या आततायी निर्णयामुळे येत्या ५ जुलै रोजी मराठी भाषिकांचा मोर्चा निघणार आहे.या निमित्ताने उद्धव व राज ठाकरे हे दोघे ठाकरे बंधू एकत्र आले आहेत.त्यांच्या एकत्र येण्यामुळे हा मोर्चा विराट स्वरूपाचा असेल,यामध्ये कोणालाही शंका वाटण्याची गरज नाही.या सर्व घडामोडीमुळे भाजपच्या…
