दीपक मोहिते,
देश एका भयावह वळणावर… भाग क्र.२,
मोदी यांच्या काळात जुमल्यांचा सुळसुळाट…
१९४७ पासून सत्तेत असलेल्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने गेल्या सत्तर वर्षात काय केले ? असा प्रश्न पंतप्रधान नरेंद्र मोदी गेल्या बारा वर्षात सतत विचारत आहेत.काँग्रेस सरकारने त्यांच्या कार्यकाळात किती विकासकामे केली,त्याची कल्पना मोदी यांनाही आहे,पण आपल्या अपयशावरून जनतेचे लक्ष दुसरीकडे वळवण्याचे त्यांचे प्रयत्न आहेत.पण हा त्यांचा प्रश्न आता कालबाह्य झाला आहे.नेहरू,इंदिरा गांधी,राजीव गांधी व डॉ.मनमोहनसिंग यांच्या कारकिर्दीत एम्स,डी.आर.डि.ओ, आयआयटी,नासा,
आयएमए,लष्कराचे आधुनिकीकरण,पाकशी झालेल्या चार युद्धात प्रत्येकवेळी भारताची सरशी,आण्विक देश झाला,वीज व अन्नधान्य क्षेत्रात देश स्वयंपूर्ण झाला.अनेक ऊर्जा केंद्राची निर्मिती झाली. मनरेगा रोजगार योजना कार्यान्वित झाली,बँकेचे राष्ट्रीयकरण,पाकिस्तानचे दोन तुकडे करून बांगला देशची निर्मिती,अमेरिकेसारख्या बलाढ्य देशाच्या दादागिरीला लगाम घातला,याव्यतिरिक्त लाखो विकासकामे मार्गी लागली,दक्षिण आशियामध्ये भारत एक उभरता बलाढ्य देश म्हणून नावारूपाला आला.अशी स्थिती असतानाही आपले पंतप्रधान विचारतात,काँग्रेसने गेल्या सत्तर वर्षात काय केले ? आता मोदी महाशयांनी गेल्या बारा वर्षात त्यांनी किती देशाच्या प्रगतीसाठी किती योगदान दिले,याबाबतची माहिती घेणे,क्रमप्राप्त ठरते.सर्वप्रथम त्यांच्या जुमल्यावर आपण एक नजर टाकणार आहोत.मोदी यांच्या जुमल्यावर भाष्य करण्याइतपत हे जुमले नक्कीच महत्वाचे नाहीत.सत्तेत आल्या आल्या त्यांनी भारतीय जनतेच्या बँक अकाऊंट मध्ये प्रत्येकी १५ लाख रु.जमा करणार,त्यासाठी परदेशातील बँकात असलेला काळा पैसा आणणार,असे जाहीर केले.पण प्रत्यक्षात त्यांच्या या घोषणेला काडीमात्र किंमत नव्हती.त्यांचे सहकारी देशाचे गृहमंत्री अमित शहा यांना एका मुलाखती दरम्यान मुलाखतकाराने याविषयी विचारणा केली असता,अमित शहा यांनी तो एक निवडणूक जुमला होता,असे पैसे कधी मिळू शकतात का ? असा प्रतिप्रश्न विचारला होता.
गेल्या बारा वर्षातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जुमल्यावर एक नजर….
१ ) दाऊद,माल्या,निरव मोदी, चॊक्सी यांना फरफटत आणणार,
२ ) १५ लाख जमा करणार,
३ ) २ कोटी तरुणांना रोजगार देणार,
४ ) १०० स्मार्ट सिटी उभारणार,
५ ) गंगा नदी साफ करणार,
६ ) चीनला एक इंच जमीन घेऊ देणार नाही,
७ ) मोफत शिक्षण देणार,
८) शेतमालाला आधारभूत भाव देणार,
९ ) मी एकेकाळी चाय विकत होतो,मला सत्तेची हाव नाही,
१० ) भारताला महासत्ता बनवणार,
११ ) दहशतवाद्यांचे कंबरडे मोडणार,
१२ ) देशातून नक्षलवाद हद्दपार करणार,
१३ ) गोहत्या बंदी करणार,
१४ ) शिक्षण व्यवस्था अधिक प्रभावी करणार,
१५ ) डॉलरच्या तुलनेत रुपया मजबूत करणार,
१६ ) गॅस सिलिंडर व इंधनाचे दर सर्वसान्यांना परवडतील, असे करणार,
१७ ) कृषीक्षेत्रात सुधारणा करणार,
१८ ) देशावरील कर्जाचा बोझा वाढू देणार नाही,
१९ ) देशाची अर्थव्यवस्था ५ ट्रिलियन इतकी करणार,
२० ) दहशतवादाला कायमची मूठमाती देणार,
मोदी यांचा हा ” २० कलमी जुमला कार्यक्रम,” येणाऱ्या काळातही कागदावरच राहणार आहे.मोदी यांच्या काँग्रेसने गेल्या सत्तर वर्षात काय केले ? या प्रश्नाचे हे डोळ्यात अंजन घालणारे उत्तर आहे.
क्रमशः

