वसंत भोईर,वाडा
वाडा आगारात दाखल झाल्या पाच नवीन बसेस,
वाडा आगाराच्या ताफ्यात पाच नवीन बसेस दाखल झाल्या असून त्यांचे लोकार्पण आज पार पडले.आज वाडा आगारात खा.डॉ.हेमंत सवरा यांच्या हस्ते दोन बसेसचे लोकार्पण करण्यात आले.तर वाडा एसटी स्थानकात आ. शांताराम मोरे यांच्या हस्ते तीन बसेसचे लोकार्पण करण्यात आले.
या बसेसची व्यवस्थित देखभाल करण्याची जबाबदारी आता प्रवाशांची असल्याचे खा.सावरा यांनी यावेळी बोलताना सांगितले.
यावेळी आगर व्यवस्थापक भूषण बेंद्रे,प्रवासी संघटनेचे विशाल मुकणे,प्रल्हाद शिंदे, प्रा.किरण थोरात आदीसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.या नवीन बसेसमुळे ग्रामीण भागातून दररोज प्रवास करणाऱ्या प्रवाशांना दिलासा मिळाला आहे.

