दीपक मोहिते,
पर्यटकांची जरूर काळजी घ्या, पण शहरातील करदात्यांना वाऱ्यावर सोडू नका,
काल वसई विरार शहर महानगरपालिकेचे आयुक्त पृथ्वीराज बी. पी. यांनी राजोडी समुद्रकिनारी भेट देऊन नुकतीच पाहणी केली. यावेळी स्वच्छतेविषयी विविध उपाययोजनेची माहिती घेतली. या समुद्रकिनारी बीच क्लीनिंग मशीनच्या साहाय्याने सुरु असलेल्या स्वच्छता कामाची त्यांनी पाहणी केली. आयुक्तानी दिलेल्या या भेटीचे नक्कीच कौतुक करायला हवे. पण त्याचबरोबर शहरातील अस्वच्छता, नाल्यातील कचरा व रस्त्यावरील जीवघेण्या खड्ड्याचे साम्राज्य इ. नागरी असुविधाचे काय ? असा प्रश्न तुमच्या आमच्या समोर उभा राहतो, यावर आयुक्ताची भूमिका काय ?
आयुक्ताना समुद्रकिनारी पर्यटनासाठी येणाऱ्या पर्यटकांची काळजी आहे. पण शहरातील करदाते, भरमसाठ कर देऊनही मरणयातना भोगत असतात, त्यांची काळजी या आयुक्ताना नाही. वास्तविक त्यांची ही कृती ” केवळ नौटंकी,” या सदरात मोडणारी आहे.चार वर्षांपूर्वी कोट्यवधी रु. खर्च करून रस्तेसफाईसाठी आणलेल्या स्वयंचलित मशिन्स सध्या कुठे कार्यरत आहेत ? याचा शोधही आयुक्तानी घ्यायला हवा. नाल्यातील कचऱ्यामुळे गेल्या जुलै महिन्यात झालेल्या अतिवृष्टीत करदात्यांनी मरणयातना भोगल्या, रस्त्यावरील खड्ड्यात पडून अनेक तरुणाचे बळी गेले. पर्यटकांची काळजी घेताना वर्षाकाठी कोट्यवधी रु. कर देणाऱ्या करदात्यांचीही त्यांनी काळजी करायला हवी, पण या अधिकाऱ्यांना केवळ कचऱ्याच्या टेंडर्समध्ये इंटरेस्ट आहे. त्यामध्ये सत्ताधारी व विरोधी पक्षांचा समावेश असतो, हे आता लपून राहिलेले नाही. त्यामुळे आयुक्तानी ही नौटंकी ताबडतोब थांबवायला हवी. त्यांना कॊणीतरी सांगायला हवे की अशाप्रकारची नौटंकी करून नागरी समस्या सुटत नसतात. पर्यटकांना अस्वच्छतेचा त्रास होता कामा नये, हे मान्य, पण करदात्यांना देखील वाऱ्यावर सोडू नका,

