- Home
- Uncategorized
- आंदोलन
- कृषी
- गुन्हेगारी
- चालू घडामोडी
- जागतिकीकरण
- राजकारण
- शैक्षणिक
- संपादकीय
- क्रीडा
- निवडणूक
- मनोरंजन
- विदेश
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
- मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा ; सोहळे मोठे व लक्षण खोटे,
- नाना, कोणालाही न सांगता निघून गेले ; अवघे सिनेजगत स्तब्ध,
- सरकार सुमारे ५० हजार शेतकऱ्यांच्या उरावर उभारतोय शक्तिपीठ महामार्ग,
- केवळ धर्मेंद्र प्रधान व ज्ञानेशकुमारला हटवून व्यवस्था सुधारणार का ? संपूर्ण व्यवस्थेतच बदल हवा,
- पालघर जिल्ह्याच्या राजकारणात भाजपच सरस ठरणार…
- ठाणे जिल्ह्यात शिंदे गटाची प्रतिमा डागाळतेय…
- … अन्यथा शेतकरी आत्महत्येच्या वाटेवर जातील,
- अन्न संकटाचे काळे ढग ; दीर्घकालीन कठोर उपाययोजना करणे गरजेचे….
Author: दीपक मोहिते
दीपक मोहिते, हक्क व अधिकाराची लढाई लढणाऱ्या थोर स्वातंत्र्यसैनिकाला नमन, पत्रकारितेचे भीष्म पितामह असलेले, इंडियन एक्स्प्रेस वृत्तपत्रसमूहाचे संस्थापक अध्यक्ष आणि स्वातंत्र्य चळवळीतील ज्येष्ठ नेते रामनाथ गोयंका यांचा काल स्मृतिदिन साजरा झाला. बिहार राज्यात जन्माला आलेल्या रामनाथ गोयंका यानी १९३६ साली द इंडियन एक्प्रेस वृत्तपत्र समूह सुरु केला.आणिबाणीच्या काळात सरकारच्या विरोधात त्यांनी जो संघर्ष केला,त्याची नोंद जगभरात घेण्यात आली. त्यांच्या वृतपत्र समूहावर प्रचंड कारवाई झाली. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत त्यानी आपला वृत्तपत्र समूह चालवला. सरकारची प्रसिद्धि माध्यमावरील सारी बंधने त्यानी मोठ्या धाडसाने झुगारली व आपल्या व्यवसायाशी ते प्रामाणिक राहिले. त्याकाळात सरकारने माध्यमांची प्रचंड गळचेपी चालवली होती, परंतु त्यास धुप न घालता गोयंका…
दीपक मोहिते, ” फ्रंटलाईन,” राज्य सरकारच्या नाकर्तेपणामुळे औद्योगिक वाढ खुंटली, आर्थिक सुधारणेच्या लाटेत जगभरात बेरोजगारीचे प्रमाण सतत वाढत आहे. आपल्या देशात गेल्या काही वर्षात औद्योगिक क्षेत्रातील मंदी, वाढती बेरोजगारी व सरकारचे उद्योग वाढीकडे करण्यात आलेले दुर्लक्ष, अशा विविध कारणामुळे तरुणवर्ग उदासीनतेच्या गर्तेत सापडला आहे.राज्यातील बेरोजगार तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात, यासाठी ६० ते ७० वर्षांपूर्वी सरकारने अनेक जिल्ह्यात औद्योगिक विकास महामंडळाच्या औद्योगिक वसाहती निर्माण केल्या. सुरुवातीच्या काळात सरकारचा हा प्रयत्न यशस्वी ठरला व अनेक तरुणांच्या हाताला काम मिळाले. पण कालांतराने मालकवर्गाचा उद्दामपणा व स्थानिक राजकीय नेत्याचा मुजोरपणा अशा दोन कारणामुळे या औद्योगिक वसाहतीना अवकळा आली. मालकांनी सरकारच्या सवलती लाटून परराज्यात…
दीपक मोहिते, ” अस्मानी संकट,” खरीप पिकानंतर रब्बी हंगामातील पिकेही धोक्यात, यंदा राज्यात सरासरी २१ % कमी पाऊस झाल्यामुळे ग्रामीण भागात रब्बी पीक घेणाऱ्या शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे.ग्रामीण भागातील शेतकऱ्यांची परतीच्या पावसावर भिस्त होती,पण परतीच्या पावसाने हात दाखवल्यामुळे लागवड कशी करायची अशा विवंचनेत शेतकरी सापडले आहेत. पाऊस यंदा लवकर माघारी फिरल्यामुळे खरीप पिकावर परिणाम झाला असून रब्बी हंगाम देखील अडचणीत आला आहे. दरवर्षी राज्यात साधारणपणे ९०० मि.मी. च्या आसपास पाऊस पडतो, यंदा तो जेमतेम ८०४ मि.मी इतका पडला. पावसाचे प्रमाण कमी राहिल्यामुळे खरीप हंगामातील सोयाबीन, मूग व उडीद इ. पिके हातून गेली आहेत. आता पाऊस माघारी परतल्यामुळे रब्बी हंगामातील…
दीपक मोहिते, कालच्या घटनेमुळे सुशिक्षित वसई नगरीचा चेहरा पार काळवंडला गेला, काल विकासकामाच्या श्रेयवादावरून दिवसभर उडालेला धुरळा अखेर संध्याकाळी खाली बसला व विरारकर नागरिकांनी एकदाचा निश्वास सोडला. वास्तविक हा जो काही संघर्ष उडाला, त्याच्याशी सर्वसामान्य नागरिकाना बिलकुल देणेघेणे नव्हते. श्रेयवादाच्या या चढाओढीत सामान्य माणूस कुठेही पाहायला मिळाला नाही. त्यामध्ये पक्षाचे पदाधिकारी व सतरंज्या उचलणाऱ्या कार्यकर्त्यांचा सर्वाधिक भरणा होता. सत्ता आणि श्रेय हे एकाच नाण्याच्या दोन बाजू असतात. हे नाणे ताब्यात घेण्यासाठी पक्ष अलीकडच्या काळात एकमेकांच्या उरावर बसत असतात. कालच्या घटनेत आपण तेच दृष्य लाईव्ह बघितले.काल लोकार्पण करण्यात आलेले प्रकल्प वर्षानुवर्षे का रखडले ? त्याचा खर्च कसा नाहक वाढला ? याविषयी…
दीपक मोहिते, ” हल्लाबोल,” आजच्या हायव्होल्टेज ड्राम्याने विरारकर नागरिकांचे चांगलेच मनोरंजन, एखाद्या विकासकामाचे दोन वेळा लोकार्पण सहसा होत नसते, मात्र त्यास वसई विरार हा परिसर अपवाद ठरला आहे. या उपविभागात अनेकदा भूमिपूजने दोन ते तीन वेळा झाल्याचे ऐकीवात आहे. पण लोकार्पण सोहळा एकाच दिवशी दोनदा करण्यात आल्याचे आज पहिल्यांदाच पाहायला मिळाले. वसईचे माजी आ. हितेंद्र ठाकुर यांच्या ६१ व्या वाढदिवसाचे औचित्य साधत बहुजन विकास आघाडीने आज महानगरपालिकेच्या विरारस्थित क्रीडासंकुल व नालासोपारा येथील नाट्यगृह अशा दोन कार्यक्रमाचा लोकार्पण सोहळा आयोजित केला होता. पण या कार्यक्रमास विरोधी पक्ष असलेल्या भाजपने तीव्र विरोध केला. याप्रकरणी भाजपचे दोन आमदार व खासदारांनी आक्षेप घेतला. त्यामुळे…
दीपक मोहिते, लोकशाही म्हणजे अल्पमतांचा आदर करणारे बहुमत, – अॅड. जयंत जायभावे, आज वसई येथील कृपामाता सभागृह, पापडी येथे सुवार्ता साहित्य मेळावा मोठ्या उत्साहात पार पडला. याप्रसंगी बोलताना मुख्य वक्ते म्हणून महाराष्ट्र आणि गोवा बार कौन्सिलचे अध्यक्ष, कायदेतज्ज्ञ अॅड. जयंत जायभावे म्हणाले, ” आपणा सर्वांचे सगळ्यात मोठे राष्ट्रीय कर्तव्य म्हणजे सर्वश्रेष्ठ असलेल्या भारतीय संविधानाची माहिती प्रत्येक भारतीय नागरिकाला असली पाहिजे. लोकांची संविधानाविषयाची निरक्षरता म्हणजे लोकशाहीचा पराभव आहे. ऐतिहासिक परंपरेतून आपल्या भारत देशाची निर्मिती झाली आहे. या देशात निर्माण झालेली सत्ताकेंद्रे वरून निर्माण झाली नसून लोकांच्या अधिकारातून निर्माण झाली आहे. भारत देशातील संविधानाच्या प्रास्ताविकातून न्याय, स्वातंत्र्य, समता या तीन तत्त्वांनी हातात…
दीपक मोहिते, ” भितीचे सावट, ” भूकंपाच्या घटनामध्ये लक्षणीय वाढ ; डहाणू व तलासरीच्या गावामध्ये भितीचे वातावरण, पालघर जिल्ह्यातील डहाणू – तलासरी हे तालुके भूकंप प्रवण तालुके म्हणून ओळखले जातात. गेल्या काही वर्षात या परिसरात भूकंपाचे मध्यम स्वरूपाचे ६० ते ७० धक्के बसले.( ३ ते ४.१ रिष्टर ) या भूकंपामुळे या दोन्ही तालुक्यातील सुमारे १ हजार ९२३ घरांना तडे गेले तर काही घरांच्या भिंती कोसळल्या.२०१९ साली झालेल्या भूकंपात घराबाहेर पडताना एका २ वर्षें वयाच्या मुलीचा मृत्यू झाला होता. गेल्या आठवड्यात म्हणजे २७ सप्टें. रोजी रात्री साडेदहाच्या सुमारास ३.६ रिष्टरचा धक्का बसला. या भूकंपाचा केंद्रबिंदू डहाणू तालुक्यातील मोडगाव या गावात होता.…
दीपक मोहिते, ” हल्लाबोल,” उशीरा का होईना, पण एकदाची पहाट झाली तर… वसई – विरार शहर महानगर पालिकेचे क्रीडा संकुल व नाट्यगृहाचे आज उदघाटन होणार आहे. माजी आ. हितेंद्र ठाकूर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून हा सोहळा पार पडत आहे. अनेक वर्षांपासून रखडलेली नागरिकांची ही मागणी अखेर मार्गी लागल्यामुळे सर्वत्र आनंदाचे वातावरण पसरले आहे. पण आता सत्ताधारी बहुजन विकास आघाडी व विरोधी पक्ष असलेल्या भाजप या दोघामध्ये श्रेय घेण्यावरून ” तू तू मै मै,” सुरु झाले आहे. महापौर अजीव पाटील यांच्या स्वाक्षरीने पाठवण्यात आलेल्या निमंत्रण पत्रिकेवरुन आता भाजपने जोरदार टिकास्त्र सोडले आहे. नालासोपाऱ्याचे आ. राजन नाईक यांनी ही दोन्ही विकासकामे राज्याचे…
दीपक मोहिते, वाढती गुन्हेगारी, क्लस्टर व पुनर्विकासमधील जीवघेण्या स्पर्धेमुळे ठाण्यातील गुन्हेगारीचा वेलू गगनावर… ठाण्यातील गुन्हेगारी दिवसेंदिवस वाढत असून पोलीस यंत्रणा, नियंत्रण करण्याकामी अपयशी ठरल्याचे दिसून आले आहे. प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणाने पोलीस यंत्रणेची लक्तरे चव्हाट्यावर आली आहेत. भाजप आ. संजय केळकर यांनी काल पत्रकार परिषदेत सांगितले कि ठाणे आता ” तलावांचे शहर” राहिले नाही. आनंदनगर ते घोडबंदर पर्यंत प्रचंड पुनर्विकास आणि क्लस्टर डेव्हलपमेंटची कामे सुरू आहेत. प्रत्येक बिल्डिंग मागे ५००-१००० कोटींचा आर्थिक व्यवहार आहे. केळकर पुढे म्हणाले,” बांधकाम मटेरियल सप्लाय, कामगार, पार्किंग, विक्री यावरून ठाण्यात टोळी युद्ध सुरू झाले आहे. फक्त एप्रिल २०२६ मध्ये ठाणे आयुक्तालयाच्या ३५ पोलीस ठाण्यात १…
दीपक मोहिते , ” हल्लाबोल,” राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सत्तासंघर्ष जोमात ; पार्थ पवार विरुद्ध सुनील तटकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि रायगडचे खा. सुनील तटकरे यांचे राजकीय भवितव्य सध्या धोक्यात आले आहे. हल्ली पक्षातील एक गट त्यांचे पंख कापण्याची एकही संधी सोडत नाही. अजित पवार यांच्या निधनानंतर पक्षाची सर्व सूत्रे आपल्या ताब्यात राहावीत, यासाठी पार्थ पवार सध्या जोमाने कामाला लागले आहेत. रायगडमध्ये भरत गोगावले यांना अदिती तटकरे यांना हटवून पालकमंत्रीपद देण्यासाठी याच गटाने महत्त्वाची भूमिका बजावली, अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे. जाने. २०२६ मध्ये उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी निवडणूक आयोगाला पाठवलेल्या राष्ट्रीय पदाधिकाऱ्यांच्या यादीत ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे…
