दीपक मोहिते,
वाढती गुन्हेगारी,
क्लस्टर व पुनर्विकासमधील जीवघेण्या स्पर्धेमुळे ठाण्यातील गुन्हेगारीचा वेलू गगनावर…
ठाण्यातील गुन्हेगारी दिवसेंदिवस वाढत असून पोलीस यंत्रणा, नियंत्रण करण्याकामी अपयशी ठरल्याचे दिसून आले आहे. प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणाने पोलीस यंत्रणेची लक्तरे चव्हाट्यावर आली आहेत.

भाजप आ. संजय केळकर यांनी काल पत्रकार परिषदेत सांगितले कि
ठाणे आता ” तलावांचे शहर” राहिले नाही. आनंदनगर ते घोडबंदर पर्यंत प्रचंड पुनर्विकास आणि क्लस्टर डेव्हलपमेंटची कामे सुरू आहेत. प्रत्येक बिल्डिंग मागे ५००-१००० कोटींचा आर्थिक व्यवहार आहे.
केळकर पुढे म्हणाले,” बांधकाम मटेरियल सप्लाय, कामगार, पार्किंग, विक्री यावरून ठाण्यात टोळी युद्ध सुरू झाले आहे.
फक्त एप्रिल २०२६ मध्ये ठाणे आयुक्तालयाच्या ३५ पोलीस ठाण्यात १ हजार ११० मोठे गुन्हे नोंदवले गेले – २२३ चोरी, १८१ हल्ले, ५ खून. स्पा, मसाज सेंटर, ब्युटी पार्लरच्या आडून वेश्याव्यवसाय, इराणी गँगकडून सोनसाखळी चोरी आणि ड्रग्ज रॅकेट मोठ्या प्रमाणात वाढले आहे.
प्रदीप पूर्णेकर हे
शिवसेना ( उबाठा ) चे मानपाडा-मनोरमा नगरचे विभागप्रमुख ( वय ४७ ) स्थानिक पातळीवर ” फियरलेस सामाजिक कार्यकर्ता,” म्हणून त्यांची ओळख होती.२९ सप्टें.रात्री साडेनऊ वाजता, कापूरबावडी हद्दीत गणेश नगर येथील त्यांच्या ऑफिसात घुसून हल्लेखोरांनी त्यांच्यावर ७ गोळ्या झाडल्या, त्यातील ४ लागल्या. एक गोळी मानेतून आरपार, एक छातीत अडकली असे सिटीस्कॅनमधून समोर आले. नंतर कोयत्याने वारही करण्यात आले. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
या हत्येमागे ३ कारणे असल्याचे तपासात समोर आली आहेत.
प्रदीप पूर्णेकर यांचा भाऊ जयनाथ पूर्णेकर म्हणाले, ” ” पूर्णेकर यांनी क्लस्टरविरोधात आघाडी उघडली होती,”
पत्नी विजेता पूर्णेकर म्हणाल्या, मुले व्यसनाधीन होत आहेत, म्हणून त्यांनी आवाज उठवला होता. पूर्णेकर कुटुंबीयांनी थेट शिंदे गटाच्या माजी महापौर मीनाक्षी शिंदे आणि पती राजेंद्र शिंदे यांच्यावर सुपारी दिल्याचा आरोप केला आहे.पुरवणी एफआयआरमध्ये त्यांची नावे समाविष्ट करण्यात आली आहेत. दरम्यान मीनाक्षी शिंदे यांनी आपल्यावर करण्यात आलेले आरोप फेटाळले आहेत.
२३ सदस्यीय विशेष तपास पथक स्थापन करण्यात आले असून उपायुक्त क्राईम अमरसिंह जाधव यांच्या नेतृत्वाखाली तपास करण्यात येत आहे. त्यांच्या पथकाकडून
३ आरोपींना अटक करण्यात आली आहे.पप्या शिंदे ( २००४ पासून गुन्हेगारी इतिहास, ८-९ गुन्हे, मित्रच होता ), निखिल यादव ( गोळ्या झाडणारा ), नितेश पवार उर्फ भावड्या ( कोयत्याने वार करणारा ) – अलिबाग जवळ असलेल्या डेअरीतून पकडले.२ फरार : संतोष कनोजिया उर्फ टल्ली,५ जण मिरा रोडवरून ताब्यात घेण्यात आले.( ३ महिला – दोन गाड्या जप्त – एक भाच्याच्या नावावर आहे, पुनर्विकास आणि क्लस्टर योजनेतील जीवघेणी स्पर्धा हेच ठाण्यातील वाढत्या गुन्हेगारीचे मुख्य मूळ आहे, आणि पूर्णेकर हे त्याचेच बळी आहेत. ते बेकायदा बांधकाम, क्लस्टर आणि ड्रग्जच्या विरोधात बोलत होते म्हणून त्यांना संपवण्यात आल्याचा आरोप करण्यात येत आहे.

