दीपक मोहिते,
” हल्लाबोल,”
आजच्या हायव्होल्टेज ड्राम्याने विरारकर नागरिकांचे चांगलेच मनोरंजन,
एखाद्या विकासकामाचे दोन वेळा लोकार्पण सहसा होत नसते, मात्र त्यास वसई विरार हा परिसर अपवाद ठरला आहे. या उपविभागात अनेकदा भूमिपूजने दोन ते तीन वेळा झाल्याचे ऐकीवात आहे. पण लोकार्पण सोहळा एकाच दिवशी दोनदा करण्यात आल्याचे आज पहिल्यांदाच पाहायला मिळाले.
वसईचे माजी आ. हितेंद्र ठाकुर यांच्या ६१ व्या वाढदिवसाचे औचित्य साधत बहुजन विकास आघाडीने आज महानगरपालिकेच्या विरारस्थित क्रीडासंकुल व नालासोपारा येथील नाट्यगृह अशा दोन कार्यक्रमाचा लोकार्पण सोहळा आयोजित केला होता. पण या कार्यक्रमास विरोधी पक्ष असलेल्या भाजपने तीव्र विरोध केला. याप्रकरणी भाजपचे दोन आमदार व खासदारांनी आक्षेप घेतला. त्यामुळे आज सकाळपासून विरार पश्चिमेस असलेल्या क्रीडासंकुल परिसरात काहीसे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी देखील प्रचंड फौजफाटा तैनात केला होता. दोन्ही बाजूचे पदाधिकारी व कार्यकर्ते दाखल झाल्याचे पाहून पोलिसांनी मनपा मुख्यालय प्रवेशद्वारावर बॅरीकेड्स उभारले होते. सकाळी दहा नंतर वातावरण तापण्यास सुरुवात झाली. बहुजन विकास आघाडीच्या लोकांनी क्रीडासंकुलाच्या पहिल्या मजल्यावर ठाण मांडले होते, तर भाजपच्या लोकांना पोलिसांनी खाली रोखून धरले होते, पण भाजपच्या लोकांनी पोलिसांना न जुमानता बॅरिकेड्स तोडून प्रवेश केला. हे नाट्य सुमारे तीन ते चार तास चांगलेच रंगले.आ. स्नेहा दुबे पंडित, आ. राजन नाईक व खा. डॉ. हेमंत सवरा हे तिघेही या व्होल्टेझ ड्राम्यात सहभागी झाले होते. भाजपच्या नेत्यांच्या म्हणण्यानुसार ही दोन्ही विकासकामे गेली बारा वर्षे रखडली होती. ती राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी जातीने लक्ष घालून मार्गी लावली. त्यामुळे या कार्यक्रमाचे उदघाटन करण्याचा नैतिक अधिकार बहुजन विकास आघाडीला नाही, त्यामुळे आम्ही या विकासकामाचे उदघाटन केले.यावेळी भाजपचे आमदार व खासदारांनी बॅरिकेड्स तोडणे चुकीचे असल्याचा आरोप बहुजन विकास आघाडीकडून करण्यात आला. क्रीडा संकुलाचे काम अद्याप अर्धवट अवस्थेत असताना लोकार्पण करण्याचा अट्टाहास कशासाठी ? असा प्रश्न भाजपच्या आमदारांनी मनपा आयुक्ताना विचार
विचारला आहे. आजच्या या हाय व्होल्टेज ड्राम्याने वसई विरारकर नागरिकांचे मात्र चांगले मनोरंजन झाले.

