- Home
- Uncategorized
- आंदोलन
- कृषी
- गुन्हेगारी
- चालू घडामोडी
- जागतिकीकरण
- राजकारण
- शैक्षणिक
- संपादकीय
- क्रीडा
- निवडणूक
- मनोरंजन
- विदेश
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
- राज्यसरकारच्या नाकर्तेपणामुळे औद्योगिक वाढ खुंटली,
- खरीप पिकानंतर रब्बी हंगामातील पिकेही धोक्यात,
- कालच्या घटनेमुळे सुशिक्षित वसई नगरीचा चेहरा पार काळवंडला गेला,
- आज झालेल्या हायव्होल्टेज ड्राम्याने विरारकर नागरिकांचे चांगलेच मनोरंजन,
- लोकशाही म्हणजे अल्पमताचा आदर करणारे बहुमत – ऍड. जयंत जायभावे,
- भूकंपाच्या घटनामध्ये लक्षणीय वाढ ; डहाणू व तलासरीच्या गावांमध्ये भितीचे वातावरण,
- उशीरा का होईना, पण एकदाची पहाट झाली तर…
- क्लस्टर व पुनर्विकासमधील जीवघेण्या स्पर्धेमुळे ठाण्यातील गुन्हेगारीचा वेलू गगनावर…
Author: दीपक मोहिते
दीपक मोहिते, सामाजिक बांधिलकी, अर्नाळा समुद्रकिनारी विद्यार्थ्यांकडून स्वच्छता मोहीम, गणपती विसर्जनानंतर मोठ्या प्रमाणावर निर्माल्य जमा होते सामाजिक बांधिलकीचे भान राखत अर्नाळा समुद्रकिनाऱ्यावर जमा झालेला कचरा आणि निर्माल्याची स्वच्छता करण्यासाठी विवा महाविद्यालय आयक्यूएसी, डीएलएलई, विज्ञान विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने २६ सप्टें. २०२६ रोजी अर्नाळा समुद्रकिनारा स्वच्छता मोहीम राबवली. या मोहिमेला मुक्ता एज्युकेशन ट्रस्ट, विरार (पश्चिम ) आणि वसई-विरार शहर महानगरपालिका यांचे सहकार्य लाभले. अर्नाळा ग्रामपंचायतीचे सरपंच नंदकुमार घरत, मुंबई पोलीस तसेच अर्नाळा सोशल वेल्फेअर असोसिएशन सदस्य प्रदीप सालीयन, स्वच्छता दूत निनाद पाटील, वसई-विरार शहर महानगरपालिका घनकचरा विभागाचे मुख्य आरोग्य निरीक्षक निलेश जाधव, कनिष्ठ आरोग्य निरीक्षक संजय सावंत यांनी या मोहिमेत सहभागी…
दीपक मोहिते, ” हल्लाबोल,” आम्ही स्थानिक भूमिपुत्र अक्षरशः नागवले गेलो… एखाद्या गावांत प्रकल्प येत असल्याची कुणकुण लागली कि जमिनीचे दलाल व खरेदी करणाऱ्या धनदांडग्याचे कान टवकारले जातात आणि मग हे दलाल, तलाठी, मंडळ अधिकारी, तहसीलदार कचेरीतील कर्मचारी हे सारे सातबारा उताऱ्याचे गट्ठे खांद्यावर घेऊन धनदांडग्याच्या कार्यालयाचे उंबरठे झिजवू लागतात.हे असे वर्षानुवर्षे चालत आले आहे. असेच प्रकार पालघर जिल्ह्यातील वाढवण, मुरबे, कोरे भागातील बंदर,व खाजगी कंपनीकडून उभारण्यात येणारे व्यापारी बंदर व अत्याधुनिक विमानतळ तर रत्नागिरी /सिंधुदुर्ग ( बारसु, सलगाव, नाणार रिफायनरी भागात पाहायला मिळत आहेत. पालघर जिल्ह्यातील वाढवण व वरोर मधील जमिनी संपादित करण्यासाठी सरकारने आपल्या थैल्या मोकळ्या केल्या आहेत. पण,…
दीपक मोहिते, साहित्याची मेजवानी, २ ऑक्टो. रोजी वसईत साहित्य मेळाव्याचे आयोजन, वसईतून प्रकाशित होणारे सुवार्ता मासिकाचा साहित्य मेळावा येत्या २ ऑक्टो. रोजी आयोजित करण्यात आला आहे. सकाळी ८.३० ते १२.३० या वेळेत हा मेळावा पार पडणार आहे. वसईच्या कृपामाता सभागृहात होणाऱ्या या साहित्य मेळाव्यात प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र अँड गोवा बार कौन्सिलचे अध्यक्ष व प्रसिद्ध विधीतज्ञ ऍड. जयंत जायभावे ( नाशिक ) उपस्थित राहणार आहेत.यावेळी ते ” संविधान व सद्यस्थिती, ” या विषयावर व्याख्यान देणार आहेत. तर पर्यावरण : जबाबदारी कोणाची ? या विषयावर परिसंवाद होणार आहे. सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वसई धर्मप्रांताचे बिशप थॉमस डिसोझा आहेत.गेली सात दशके सुरु असलेल्या…
दीपक मोहिते, ” स्पॉटलाईट,” भाग क्र. २, ( एकूण २० भाग ) असा विकास व बदल कोणच्याही नशिबी येऊ नये, कालच्या भागात आपण वसई तालुक्यातीला शेती व बागायती विषयी थोडक्यात आढावा घेतला.आता या भागात नागरिकरणासाठी जमिनी मोकळ्या करण्याचा राज्य शासनाचा निर्णय स्थानिक भूमिपुत्राच्या मुळावर कसा आला, याविषयी सविस्तर माहिती घेऊ या. ५० वर्षांपूर्वी या परिसरातील लोकसंख्या वाढीचा वेग व घनता खूप कमी होती. थोडीफार लोकसंख्या वाढली ती रेल्वे स्थानक परिसरात, त्यावेळी येथे जन्मदराचा वेग कमी होता. त्यामुळे लोकवस्ती विरळ होती. आर्थिक आवक कमी होती, पण स्थानिक भूमिपुत्र समाधानी होते. विकासाची जी काही कामे होत असत, ती ग्रामपंचायतीच्या माध्यमातून, ” आर्थिकदृष्ट्या…
दीपक मोहिते, ” फ्रंटलाईन, ” यंदा पालघर व ठाणे जिल्ह्यात चांगला पाऊस, राज्यात सुमारे २६५ तालुक्यात दुष्काळ असल्याची राज्य सरकारकडून नुकतीच घोषणा करण्यात आली आहे. संपूर्ण राज्यात १७ % तूट असताना पालघर व ठाणे या दोन जिल्ह्याचा टॉप अतिवृष्टी जिल्ह्यात समावेश आहे. यंदा पालघर व ठाणे जिल्ह्यात अनुक्रमे २३०४. ९ मि.मी. ( सरासरी ११७. ३ % ) तर ठाणे जिल्ह्यात २२७३.० मि.मी. ( सरासरी १०९.६ % ) पावसाची नोंद झाली. त्यामुळे या दोन जिल्ह्यातील १५ तालुके दुष्काळाच्या यादीतून वगळण्यात आले आहेत. या दोन्ही जिल्ह्यातील तालुक्यात झालेल्या चांगल्या पावसामुळे दुष्काळ जाहीर करणे, संयुक्तिक नव्हते.पण विरोधकांनी राज्यात सरसकट दुष्काळ जाहीर करा, अशी…
दीपक मोहिते, पोषणासोबत महिलांना कायदेविषयक मार्गदर्शन, एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प पालघरअंतर्गत तारापूर-२ विभागात पोषण महाअभियानाच्या निमित्ताने पोषण मेळावा तसेच पंचायतराज संस्थांमधील महिलांसाठी कायदेविषयक प्रशिक्षणाचे आयोजन नुकतेच हनुमान नगर ग्रामपंचायत सभागृहात करण्यात आले होते.महिलांचे पोषण, आरोग्य, कायदेविषयक अधिकार आणि बालकांच्या सर्वांगीण विकासाबाबत जनजागृती करण्याच्या उद्देशाने आयोजित या उपक्रमाला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. जिल्हा परिषद माजी अध्यक्षा तथा महाराष्ट्र राज्य अनुसूचित जमाती आयोगाच्या अध्यक्षा वैदेही वाढाण, माजी जिल्हा परिषद सदस्य भावना विचारे, सरपंच गुलाब खरपडे, उपसरपंच यांच्या प्रमुख उपस्थितीत हा मेळावा पार पडला. या कार्यक्रमाचे आयोजन बालविकास प्रकल्प अधिकारी अमोल पवार यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. यावेळी वैदेही वाढाण यांनी पोषण…
दीपक मोहिते, ” स्पॉटलाईट,” भाग क्र. १ एकूण २० भाग, ऐतिहासिक वसई नगरीची अवघ्या काही वर्षात वाताहात झाली… पालघर जिल्ह्यातील नालासोपारा शहराला ऐतिहासिक शूर्पारक नगरी नांव देणे व वसई तालुक्याच्या सीमेवर प्रवेशद्वार उभारणे, असे दोन प्रस्ताव महानगरपालिकेतील सत्ताधारी व विरोधी पक्षाच्या विचाराधीन असल्याचे कळले. गेल्या पाच दशकाच्या काळात या ऐतिहासिक नगरीमध्ये ज्या काही उलथापालथी घडल्या, त्याचा मी एक सर्वसामान्य साक्षीदार आहे. त्यामुळे माझे मन ५० वर्षांपूर्वीच्या त्या निसर्गरम्य, शैक्षणिक, सामाजिक अशी ओळख असलेल्या ऐतिहासिक नगरीमध्ये हिंडू लागले. या काळात जी काही स्थित्यतरे घडली,त्याचा मागोवा घेण्याचे माझ्या मनाने ठरवले व हा लेखप्रपंच मी सुरु केला.नव्या पिढीला आपली जुनी व ऐतिहासिक वसई…
दीपक मोहिते, केल्याने पर्यटन… कोकण कात टाकतोय, फक्त स्थानिकांचे पाठबळ हवे, गेल्या अनेक दशकापासून कोकण परिसर कसा निसर्गसुंदर आहे. बागायती, शेती व मासेमारी या तीन व्यवसायानी कोकणी माणसाला आर्थिकदृष्ट्या कसे समृद्ध केले, याविषयी आपण आजवर अनेक सुरस कथा ऐकत आलो. उत्कृष्ठ हवामान, मुबलक पाऊस व ७२० कि.मी. लांबीचा विशाल समुद्रकिनारा व त्याला लागून असलेल्या नारळी – पोफळीच्या बागा, पण अलीकडच्या काळात या परिसरातील तरुण रोजगाराच्या निमित्ताने मुंबईला स्थलांतरीत होऊ लागले व येथील सौंदर्य काळवंडले गेले. गावच्या गावे ओस पडली. ज्या घरामध्ये माणसांची जत्रा बघायला मिळायची, त्या घरात फक्त वृद्धापकाळाकडे झुकलेले आई वडील निवृत्तीचे जीवन जगत आहेत. होळी, गणपती व गावातील…
दीपक मोहिते, ” फ्रंटलाईन,” आश्रमशाळा ; सरकारला उशिराने पण जाग आली… जुन्या लोकांनी ग्रामीण भागातील जनता राष्ट्राच्या मुख्य प्रवाहात यावेत, असा उद्देश उराशी बाळगत त्याना शिक्षण, आरोग्य व अन्य पायाभूत सुविधा उपलब्ध व्हाव्यात, यासाठी अनेक उपक्रम राबवले. पण, नंतरच्या काळात राज्यकर्ते व शासकीय अधिकाऱ्यांनी ग्रामीण भागाला उर्जीतावस्था आणणाऱ्या या उपक्रमांचा आपल्या करणीने अक्षरशः बट्याबोळ केला. आज आपण राज्यातील शासकीय व खाजगी आश्रमशाळातील बजबजपुरीवर प्रकाश टाकणार आहोत. चांगल्या योजनेचे ही दुकली कशी वाताहत करतात, हे आपण पाहणार आहोत. काही वर्षांपूर्वी ग्रामीण भागातील निरक्षरतेचे वाढते प्रमाण लक्षात घेऊन पूर्वीच्या समाजधुरीण व राज्यकर्त्यांनी जिल्हा परिषद शाळा व निवासी आश्रमशाळा स्थापन करण्याचा ऐतिहासिक निर्णय…
दीपक मोहिते, ” हल्लाबोल, ” अबब…९५७ कोटीचा कचरा घोटाळा ; कचऱ्यात सोने दडलेले असते, वसई विरार शहर महानगरपालिकेत एकामागोमाग अनेक घोटाळे बाहेर पडत आहेत. लोकांच्या पैश्याची अधिकारी व राजकीय नेते कशी उधळपट्टी करतात,हे या प्रकरणावरून उजागर झाले आहे. अनेक आर्थिक घोटाळे व भ्रष्टाचाराची प्रकरणासाठी ही महानगरपालिका राज्यात रोल मॉडेल ठरली आहे.या महानगरपालिकेच्या ९५७ कोटी रु. चा कचरा घोटाळा तुमचे आमचे डोळे दीपवून टाकणारा असाच आहे.सन २०२५ – २६ ते २०३० ते ३१ या पाच वर्षासाठी प्रशासनाने निविदा काढल्या होत्या. दैनंदिन कचरा उचलणे, त्याचे वर्गीकरण करणे व कचरा कुंड्या पुरवणे व दररोज रस्ते व परिसराची साफसफाई करणे,इ. कामासाठी तब्बल ९५७ कोटी…
