दीपक मोहिते,
साहित्याची मेजवानी,
२ ऑक्टो. रोजी वसईत साहित्य मेळाव्याचे आयोजन,
वसईतून प्रकाशित होणारे सुवार्ता मासिकाचा साहित्य मेळावा येत्या २ ऑक्टो. रोजी आयोजित करण्यात आला आहे. सकाळी ८.३० ते १२.३० या वेळेत हा मेळावा पार पडणार आहे.
वसईच्या कृपामाता सभागृहात होणाऱ्या या साहित्य मेळाव्यात प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र अँड गोवा बार कौन्सिलचे अध्यक्ष व प्रसिद्ध विधीतज्ञ ऍड. जयंत जायभावे ( नाशिक ) उपस्थित राहणार आहेत.यावेळी ते ” संविधान व सद्यस्थिती, ” या विषयावर व्याख्यान देणार आहेत.
तर पर्यावरण : जबाबदारी कोणाची ? या विषयावर परिसंवाद होणार आहे. सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वसई धर्मप्रांताचे बिशप थॉमस डिसोझा आहेत.गेली सात दशके सुरु असलेल्या या मासिकाच्या साहित्य मेळाव्याला वसईतील साहित्यप्रेमी नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

