दीपक मोहिते,
” फ्रंटलाईन, ”
यंदा पालघर व ठाणे जिल्ह्यात चांगला पाऊस,
राज्यात सुमारे २६५ तालुक्यात दुष्काळ असल्याची राज्य सरकारकडून नुकतीच घोषणा करण्यात आली आहे. संपूर्ण राज्यात १७ % तूट असताना पालघर व ठाणे या दोन जिल्ह्याचा टॉप अतिवृष्टी जिल्ह्यात समावेश आहे.
यंदा पालघर व ठाणे जिल्ह्यात अनुक्रमे २३०४. ९ मि.मी. ( सरासरी ११७. ३ % ) तर ठाणे जिल्ह्यात २२७३.० मि.मी. ( सरासरी १०९.६ % ) पावसाची नोंद झाली. त्यामुळे या दोन जिल्ह्यातील १५ तालुके दुष्काळाच्या यादीतून वगळण्यात आले आहेत. या दोन्ही जिल्ह्यातील तालुक्यात झालेल्या चांगल्या पावसामुळे दुष्काळ जाहीर करणे, संयुक्तिक नव्हते.पण विरोधकांनी राज्यात सरसकट दुष्काळ जाहीर करा, अशी मागणी लावून धरली आहे.
पालघर जिल्हा :-
१ ) वसई – २७०२.३ मि. मी. ( ८०.०५ % )
२ ) वाडा – २६०९.४ मि.मी. ( ८६.०७ % )
३ ) डहाणू – १८९९.९ मि. मी. ( १११.० % )
४ ) पालघर – २४३१.९ मि.मी. ( ८९.०२ % )
५ ) जव्हार – २७०८.९ मि.मी. ( ९२.१ % )
६ ) मोखाडा – २२३६.६ मि. मी. ( ८७.३ % )
७ ) तलासरी – २१३२.३ मि. मी. ( १०८.६ % )
८ ) विक्रमगड – २५७३.५ मि. मी. ( ८८. ४ % )
ठाणे जिल्हा :-
१ ) ठाणे शहर – २९३८ मि. मी. ( ११८ % )
२ ) अंबरनाथ – २६२४ मि. मी. ( १२७ % )
३ ) उल्हासनगर – २५९५ मि. मी. ( १२० % )
४ ) मुरबाड – २८५७ मि.मी. ( १०८ % )
५ ) भिवंडी – २६२२ मि. मी. ( १०६ % )
६ ) कल्याण – २५६७ मि. मी. ( १०२ % )
७ ) शहापूर – २६०९ मि.मी. ( १०७ % )
या दोन्ही जिल्ह्यात बऱ्यापैकी पाऊस झाला असताना विरोधी पक्षांनी कोल्हेकुई करणे, ही बाब न्यायाला धरून नाही. विरोधी पक्षाच्या म्हणण्यानुसार या दोन्ही जिल्ह्यातील शेतकरी सरकारी मदतीपासून वंचित राहणार आहेत. दुष्काळाचा निकष १८ % तुटीचा असला तरी या दोन्ही जिल्ह्यात सरासरीपेक्षा अधिक पाऊस दाखवतो. पण भात प्रत्यक्षात पोटरीत असताना पावसाने मध्येच पाठ फिरवल्यामुळे पीक करपण्याची भिती सर्वत्र व्यक्त करण्यात येत आहे.

